हे मुंजा ! हे यमराज ! नवऱ्याला छळणाऱ्या बायकांचं ऐकू नको त्या खोटं बोलत आहेत, या जन्मी नाही, तर पुढच्या जन्मीतरी, अशी बायको देऊ नको - पत्नी पीडित पुरुषांची यमराजकडे मागणी

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१४ जून) :- वट पौर्णिमेच्या सणादिवशी पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पुजा करून ७ जन्म तोच पती मिळावा म्हणून प्रार्थना करत असते. मात्र, आता ही पत्नी आम्हाला ७ सेकंदही नको म्हणून औरंगाबाद येथील पत्नी पिडीत पुरुषांनी वडाच्या झाडाला उलट्या १०८ फेऱ्या मारत यमराजकडे प्रार्थना केली आहे. यावेळी पत्नी पीडित पुरुषांनी ७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको म्हणून घोषणाही दिल्या. दरम्यान, सोमवारी (१३ जून) पत्नीपिडीत पुरुषांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा राज्यभर होत आहे.

पिंपळाच्या झाडाला गोल फिरत दोरा बांधून मुंजा असलेल्या पिंपळाच्या झाडाची पूजा या पत्नीपीडित पुरुषांनी केली. पिंपळाच्या झाडाला उलट्या १०८  प्रदक्षिणा घालत पत्नीपीडित पुरुषांकडून नवऱ्यांना  त्रास देणा-या महिलांचा निषेध करण्यात आला. दरम्यान, औरंगाबादच्या वाळूज भागात असलेली पत्नीपीडित नावाची ही संघटना नेहमीच पत्नीच्या छळापासून त्रासलेल्य़ा नवऱ्यांना मदत करण्याचे काम करते. यांच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.

हे मुंजा ! हे यमराज आमचे ऐक

आम्ही पारायणे केली, परंतु सर्व काही निष्फळ ठरत आहे. अखेर आज वटपौर्णिमेच्या पूर्व संध्येला आम्ही मुंजाला साकडे घातले की, हे मुंजा ! हे यमराजा ! उद्या आमच्या बायका येऊन तुला खोटे साकडे घालतील. त्यामुळे त्यांचे काही एक ऐकू नकोस. अशा बायकांच्या ताब्यात जाण्यापेक्षा तुझाच सहारा चांगला. त्यामुळे त्यांचे काही एक ऐकू नको. अशा बायका आम्हाला सात जन्म तर काय, पण सात सेकंद देखील नको. असे म्हणून पत्नी पीडित पुरुष आश्रमात एकत्र येत पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली आहे.


टिप्पण्या

  1. पिपंळ वृक्ष शंभर टक्के ऑक्सिजन देणारा बोधीवृक्ष आहे!!त्यामुळे २१व्या शतकात वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करणं गरजेचं आहे!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट