पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सामान्य जनतेला काय हवंय हे जाणलेल्या असामान्य कर्तृत्वाच्या या नेत्याच्या गाडीची काच कधीच वर नसते...

इमेज
संपादकीय १ जून १९६८ रोजी इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात जन्मलेले दत्तात्रय विठोबा भरणे यांचा छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ते महाराष्ट्र राज्याच्या विविध खात्यांचे राज्यमंत्री असा प्रवास थक्क करणारा आहे. गर्भश्रीमंत व सघन शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही अत्यंत संयमी, शांत आणि गर्वाचा लवलेशही नसलेल्या या नेत्याने अल्पावधीत इंदापूर तालुक्यातील जनतेच्या ह्रदयात आपली जागा निर्माण केली आहे. सत्ता नसतानाही कोट्यवधींचा निधी तालुक्यात आणण्याची किमया त्यांनी साधली आहे. मंत्री पदाच्या अवघ्या दोन वर्षाच्या अल्प कार्यकाळात तालुक्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारा नेता म्हणून त्यांची ख्याती तालुक्यात निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 'न भूतो न भविष्यती' इतका निधी इंदापूर तालुक्याला उपलब्ध करून दिला आहे.  परिणामी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'तुम्ही केवळ इंदापूर तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहात थोडा निधी बारामतीलाही द्या असे म्हणावे लागले.' कोणताही प्रबळ राजकीय वारसा नसताना भरणे यांनी महाराष्ट्राच्या र...

इंदापूरमध्ये जनावरांवर झालेला तो हल्ला बिबट्याचा नव्हे लांडग्याचा; वन अधिकाऱ्याचा निर्वाळा

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (३१ मे) :- काल रात्री (३१ मे) इंदापूर शहरातील शेंडे मळा परिसरात राहणाऱ्या प्रवीण चंद्रकांत शेंडे या शेतकऱ्याच्या शेतातील म्हशीच्या रेडकुंवर झालेल्या हल्ल्यानंतर हा हल्ला बिबट्याने केला असल्याच्या चर्चांनी संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र हा हल्ला बिबट्याचा नसून लांडग्याने अथवा त्या सारख्या तत्सम प्राण्याने केला असल्याचा निर्वाळा वन अधिकारी अजित सुर्यवंशी यांनी दिला आहे. काल रात्री झालेल्या या हल्ल्यात प्रवीण शेंडे यांच्या म्हशींच्या तीन रेडकुंपैकी दोन रेडकू ठार झाले आहेत, तर एक गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्यात शेंडे यांचा कुत्राही ठार झाला आहे. या घटनेत प्रवीण शेंडे यांचे अंदाजे ४०-५० हजारांचे नुकसान झाले असून, पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेनंतर संपूर्ण शहरात बिबट्यानेच हा हल्ला केला असल्या संदर्भात चर्चा सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर देखील बिबट्या असल्या संदर्भात घेटनेचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. त्यामुळे साहजिकच सकाळ पासून संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण दिसत आहे. ही घटना समजताच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटन...

बुद्धांना दलित बनवण्याचे षडयंत्र हाणून पाडायला हवे

इमेज
(प्रासंगिक लेख) सत्य, अहिंसा आणि समतेवर आधारित बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध यांचा आज जन्मदिवस. जगाच्या पाठीवर बुद्धांचा जन्मदिवस भारतासह श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, मलेशिया, तिबेट, मंगोलिया, कोरिया, जावा, सुमात्रा, कंबोडिया, अफगाणिस्तान, आणि तुर्कस्तान अशा अनेक देशांमध्ये साजरा होत असला तरी भारतात जन्मलेले हे अनमोल बुद्धत्व भारतातच दलित होऊन राहिलं आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे. बौद्ध धम्माचा उगम, विकास भारतात होऊनही हवी तितकी रुजवणूक न झाल्याने धम्माचा शेवटही भारतातच झाल्याचे दिसते. जगाच्या नकाशात बुद्धांचा देश म्हणून मिरवणारा भारत देश स्वतःच्या भूमीत मात्र तथागतांच्या तत्त्वज्ञानाला रुजवण्यात कमी पडला. बौद्ध साहित्य संपदाही भारतात अल्प, मात्र इतर देशांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येते. त्यामुळे साहजिकच या सर्व कारणांची मीमांसा करणे अत्यावश्यक आहे. किंबहुना बुद्धांचे अनुयायी म्हणणाऱ्यांची ही नैतिक जबाबदारी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आजही हजारो वर्षानंतर काळाच्या कसोटीवर  टिकून आहेत. भारतात विषमतेवर आधारित अ...

माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रथम स्मृतीदिनी आजी माजी मंत्र्यांसह अनेक दिग्गजांची हजेरी

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१५ मे) :- इंदापूरचे माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या प्रथम स्मृतीदिनाचा कार्यक्रम शनिवारी (१४ मे) भिमाई आश्रमशाळेत पार पडला. या कार्यक्रमाला इंदापूर तालुक्याच्या आजी माजी मंत्र्यांसह विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावत दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी अस्थींचे पुजन, प्रतिमापूजन व तदनंतर बुद्ध पुजा व प्रवचनाचा कार्यक्रम भंते धम्मसार, बौद्धाचार्य बाळासाहेब धावारे, बाळासाहेब सरवदे यांच्या हस्ते संपन्न झाला. पूजेस शकुंतला रत्नाकर मखरे, ॲड. राहुल मखरे, संतोष मखरे, ॲड. समीर मखरे व कुटुंबीय उपस्थित होते. तर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी रत्नाकर मखरे यांच्या स्मृतीस उजाळा देताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, तात्या हे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू, लढवय्ये नेते व कार्यकर्ते होते. त्यांच्या निधनाने समाजकार्यात पोकळी निर्माण झाली. त्यांचे माझ्यावर व्यक्तीश: प्रेम होते. मी नेहमीच त्यांचे मार्गदर्शन घ्यायचो. ते माझ्या कामावर खूश व्हायचे, कधी चुकलो तर मलाही सुनवायचे. खऱ्याला खरं...

दुचाकींच्या समोरा समोर झालेल्या धडकेत इंदापूर शहरातील २५ वर्षीय युवकाचा मृत्यू; अन्य तिघे गंभीर जखमी

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१४ मे) :- आज (१४ मे) सायंकाळी ७ वा. ३० मिनिटांच्या सुमरास इंदापूर शहरातील खुळे चौकात असणाऱ्या ज्योती स्टील सेंटर या दुकानासमोर दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये इंदापूर शहरातील तौफिक हारून सय्यद या २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर सज्जाद युनूस शेख (वय २५ वर्ष, रा. कसबा पेठ, इंदापूर) गंभीर जखमी झाला. समोरून धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोघा युवकांना देखील गंभीर इजा झाली असून, जखमींना उपचारार्थ अकलूजच्या खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.  प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तौफिक हारून सय्यद आणि त्याचा मित्र सज्जाद युनूस शेख हे दोघे आपल्या दुचाकीवरून खुळे चौकाच्या दिशेने डाव्या बाजूने चालले होते. दरम्यान ज्योति स्टील सेंटर समोर आले असता विरुद्ध दिशेने (राॅंग साईडने) आलेल्या यामाहा आर १५ एम (एमएच ४२ बीजी ०३५८) या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार यामाहा आर वन गाडीवरील दोघे युवक अकलूजच्या दिशेने निघालेल्या डस्टर या चारचाकीला अतिशय वेगाने ओव्हरटेक करत होते. यावेळी दुचाकीचा वेग ताशी १२५ किमी असावा असा अंदाज...

लाकडी निंबोडी योजनेस मंजुरीमुळे इंदापूर बारामतीच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांना यश

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१३ मे) :- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या लाकडी निंबोळी उपसा जलसिंचन योजनेस अखेर मंजुरी मिळाली. साहजिकच यामुळे इंदापूर आणि बारामतीच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेमुळे इंदापूर आणि बारामती तालुक्यातील जवळपास सात हजार पेक्षा जास्त हेक्टर ओलिताखाली येणार आहे. मागील पंचवीस ते तीस वर्षापासून तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत हा विषय चर्चेत येत होता. अखेर हा विषय मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या ३४८.११ कोटी इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या या विषयासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. या योजनेमुळे इंदापूर तालुक्यातील १० गावांमधील ४३३७ हेक्टर क्षेत्र, तर बारामती तालुक्यातील ७ गावांमधील २९१३ हेक्टर क्षेत्र असे एकूण ७२५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील दुष्काळी व जिरायती शेती बागायत...

इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठीच्या निधीत आणखी साडे आठ कोटींची भर

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (११ मे) :- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांमुळे इंदापूर तालुक्यातील विकास कामांच्या निधीत आणखी  साडे आठ कोटींची भर पडली आहे. या निधीतून नागरी सुविधा योजनेंतर्गत तालुक्यातील मंजूर झालेली विविध विकास कामे केली जाणार आहेत. यामध्ये नागरी सुविधांमधून १ कोटी ५७  लाख, लेखाशीर्ष ३०५४ गट ब व क मधून २ कोटी, तर २५१५ योजनेतून ५ कोटी रुपये असा एकूण ८ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती भरणे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नागरी सुविधा अंतर्गत मंजूर कामे खालीलप्रमाणे सणसर येथील समर्थ नगर थोरात घर रस्ता ६ लाख, अंथुर्ण शिंदे मळा अंतर्गत रस्ता १५ लाख,अंथुर्णे येथील ४८ फाटा ते दळवी वस्ती रस्ता २० लाख, काटी येथील प्राथमिक शाळा ते महादेव मंदिर रस्ता १० लाख, लासुर्णे येथील ग्रा.पं. लासुर्णे ते माळी मळा रस्ता १० लाख, बिजवडी येथील काळेल वस्ती अंतर्गत रस्ता १० लाख, बेलवाडी येथील कुंभारवस्ती रस्ता १० लाख, लासुर्णे अंतर्गत बंदिस्त गटार १० लाख, सणसर येथील शब्बीर काझी यांचे घराकडे जाणारा रस्ता १० लाख, अंथुर्णे आण्णाभाऊ साठेनगर येथे रस...

हिंदू जननालायकाच्या सभेसाठी प्रशासनाच्या २४ तास बैठका सुरू होत्या मात्र...

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (८ मे) :- हिंदू जननालायकाच्या सभेसाठी प्रशासनाच्या २४ तास बैठका सुरू होत्या मात्र निर्ममपणे हत्या करण्यात आलेल्या मनोज आव्हाड याच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नव्हता अशी तिखट प्रतिक्रिया देत लहुजी शक्ती सेना या राष्ट्रव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांनी औरंगाबाद खून खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी मागणी शासन आणि प्रशासनाकडे केली आहे. औरंगाबाद खून खटल्या प्रकरणी शुक्रवारी (६ मे) लहुजी शक्ती सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद येथील मेघावाले सभागृहात साफसफाईचे काम करणाऱ्या २७ वर्षीय मनोज शेषराव आव्हाड या युवकावर लॉनमधील फोकस लाईट चोरल्याचा आरोप करत टोळक्याने २० एप्रिल रोजी त्याचे हात पाय बांधून लाकडी दांडक्याने मारहाण केली होती. यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संविधान पुंजाराम जाधव, सागर गणपत खरात, सनी गणपत खरात, सतीश भास्कर खरे, आनंद लक्ष्मण गायकवाड, आनंद भाऊसाहेब सोळसे, अष्टपाल रमेश गवळी, शिवम नरेंद्र तुपे अशा अनेक...

दुर्दैवी - बंधाऱ्यात पोहताना बुडून इंदापूरमधील युवा डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू; कसबा परिसरावर शोककळा

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मुत्सुद्देगिरी) इंदापूर (५ मे) :- सीना नदीवरील बंधाऱ्यात पोहताना पाण्यात बुडून एका तरुण डॉक्टराचा दुर्दैवी मृत्यू झाला. डॉ. रेहान आरिफ सय्यद (वय २६, रा. कसबा पेठ, इंदापूर, जि. पुणे) असे या युवा डॉक्टरचे नाव असून, बुधवारी (४ मे) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास रिधोरे पापणस (ता. माढा, जि. सोलापूर) येथील बंधाऱ्यात पोहताना ही दुर्दैवी घडली. या संदर्भात अवेज जलिल मुलाणी (वय २९, रा. कसबा पेठ, इंदापूर, जि. पुणे) यांच्या खबरवरून कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डॉ. रेहान सय्यद हे सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. रमजान ईद साजरी करण्यासाठी ते इंदापूर येथील आपल्या घरी आले होते. सुट्टी असल्याने ते आपल्या कुटुंबीयांसह ते त्यांच्या वडिलांचे मित्र संजय सरोदे (रा. म्हैसगाव, ता. माढा) यांच्या फार्महाऊसवर गेले होते. डॉ. रेहान, लहान भाऊ अमन, चुलत भाऊ जिब्रान आणि सलमान हे चौघे भाऊ पोहण्यासाठी रिधोरे पापणस बंधाऱ्यातील सीना नदीपात्रात गेले होते. मात्र पोहताना नकळत डॉ. रेहान हे बंधाऱ्याच्या दाराजवळ पोहोचले. बंधाऱ्याच्या दाराच्या दिशेन...

इंदापूर तालुक्यातील दलित वस्ती नागरी सुविधांसाठी २५ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (५ मे) :- पुणे  जिल्हा परिषद दलित वस्ती सुधारणा योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील दलित वस्ती नागरी सुविंधासाठी २५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १५ कोटी ५० लाख, तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून १० कोटी असे एकूण २५ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये वालचंदनगर, अंथुर्णे, भरणेवाडी, वडापुरी, शेटफळगडे, भवानीनगर, गिरवी, कळाशी, कडबनवाडी, चांडगाव, सणसर, निमसाखर, लासूर्णे, आजोती, पोंधवडी, काझड, निरगुडे, लुमेवाडी, डाळज नं १,३, तक्रारवाडी, गलांडवाडी, नृसिंहपूरसह तालुक्यातील अनेक गावांतील दलित वस्त्यांना या निधीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. यामध्ये काँक्रीटीकरण, बंदिस्त गटारे, सौर प्रकाश यंत्रणा, समाज मंदिर, वाचनालये, सुशोभीकरण, सामाजिक सभागृहे यांच्यासह विविध कामे या निधीतून क...

ब्रेकिंग - स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क नवी दिल्ली (४ मे) :- महराष्ट्रातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिल्या आहेत. ओबीसी आरक्षणा संदर्भातील अंतिम सुनावणीत सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत. विकास गवळी यांनी सुप्रीम कोर्टात या संदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर अंतिम सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात सरकारची भूमिका काय असणार हे बघावे लागणार आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास राज्य सरकारने, तसेच विरोधकांनीही असहमती दर्शविली होती. यासंदर्भात विधिमंडळात कायदाही मंजूर करण्यात आला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.  सर्वोच्च न्यायालयाने  २०२० च्या जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. सध्या  ज वळपास १४ महापालिका, २५ जिल्हा परिषदांसह अने...

इंदापूर शहरातील ईद ठरली सामाजिक सलोखा वाढवणारी; वाचा काय होती वैशिष्टे

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (४ मे) :- कोरोनामुळे मागील दोन वर्ष मुस्लिम बांधवांना ईदची नमाज सामुहिकरीत्या पठण करता आली नव्हती. यावेळी मात्र कोरोनाचा प्रभाव ओसरल्याने मुस्लिम बांधवांनी इंदापूर शहरातील ईदगाह मैदानांवर उस्फूर्तपणे ईदची नमाज सामुहिकरीत्या पठण केली. शहरातील मदिना मस्जिद आणि श्रीराम सोसायटीच्या मागे असलेला ईदगाह अशा दोन ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. विशेष म्हणजे देशभरात धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न राजकीय मंडळी आणि काही समाजद्वेषी संघटनांकडून होत असताना इंदापूर मात्र सामाजिक सलोखा अबाधित कसा राखावा याबाबत आदर्श ठरत आहे. काल (३ मे) मुस्लिम बांधवांनी मुस्लिमेतर बांधवांसाठी आयोजित केलेली शिरखुर्मा पार्टी, मंडपाच्या कमानींवर साकारलेले महापुरुषांचे फ्लेक्स, मुस्लिमेतर बांधवांनी मुस्लिमांना ईदगाह मैदानावर येऊन दिलेल्या शुभेच्छा, ईदगाह मैदानावरून परतताना मुस्लिम बांधवांनी शिवरायांना अर्पण केलेला पुष्पहार अशा विविध कारणांनी यंदाची ईद खऱ्या अर्थी सामाजिक सलोखा वाढवणारी ठरली. सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर सर्वच ठिकाणी दिव्य कुरआनातील विविध आयतीं...

दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच इंदापूरच्या ईदगाह मैदानावर अदा होणार ईदची सामूहिक नमाज; उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांची ईदगाह मैदानांना भेट

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२ मे) :- रविवारी (१ मे) चंद्रदर्शन न झाल्याने आज पवित्र रमजानच्या उपवासाची सांगता शेवटच्या (३० व्या) उपवासाने करण्यात आली. सलग दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे रमजान महिन्यातील अनेक बाबींसह रमजान ईदची नमाज मुस्लिम बांधवांना सामूहिकरित्या ईदगाह मैदानावर अदा करता आली नव्हती. यंदा मात्र कोरोना प्रतिबंधात्मक नियम शासनाने जवळपास हटवल्याने दोन वर्षातून प्रथमच उद्या ईदगाह मैदानावर ईदची नमाज अदा सामुहिकरीत्या अदा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट देत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. वर्षातून दोन वेळा (रमजान ईद, ईद उल अजहा) मुस्लिम बांधव सामुहिकरीत्या ईदगाह मैदानावर नमाज अदा करत असतात. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे शासनाच्या नियमांचे पालन करणाऱ्या मुस्लिम बांधवांनी सलग दोन वर्ष ईदची नमाज आपापल्या घरीच अदा केली होती. यंदा मात्र शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियम संपूर्णपणे हटवल्याने साहजिकच मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. इंदापूरचा सामाजिक सलोखा संपूर्ण देशासाठी आदर...

भिशी घोटाळा - भिशी धारकांचा इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणाचा पावित्रा; फरार भिशी चालकांना त्वरित अटक करण्याची मागणी

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१ मे) :- संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या इंदापूर येथील अवैध भिशी प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी या प्रकरणातील फिर्यादीसह अनेक भिशी धारकांनी आता आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला आहे. इंदापूर पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एकूण १७ आरोपींपैकी १४ आरोपी अद्याप फरार असल्याचा दाखला देत फिर्यादी महादेव सोमवंशी यांच्यासह अनेक भिशी धारक आजपासून (१ मे) इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. कोट्यावधींच्या अवैध भिशी प्रकरणात २० जानेवारीला शिवसेनेचे इंदापूर शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी आणि संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून अनुक्रमे ११ आणि ५ अशा एकूण १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर २३ मार्च रोजी रणजित तोडमल यांच्या फिर्यादीमुळे आरोपींच्या संख्येत आणखी एकाची भर पडली होती. त्यामुळे भिशी प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या १७ झाली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता हा गुन्हा पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. एकूण १७ आरोपींपै...