पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संत तुकोबांच्या पादुकांचे दर्शनही हुकले सोन्याची साखळीही चोरीला

इमेज
रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर घडला प्रकार; इंदापूरमधील प्रसिद्ध हॉटेल मालकाचा  १ लाख ६ हजारांची सोनसाखळी चोरीला मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२७ जून) :- संत तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका भाविकाच्या दोन तोळ्यांच्या सोन्याच्या साखळीवर चोरट्याने हात साफ केला. या साखळीची किंमत १ लाख ६ हजार रुपयांच्या आसपास असून, इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर गुरुवारी (२२ जून) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या संदर्भात डोंगराई सर्कल येथील शिवराज हॉटेलचे मालक समीर हनुमंत सुर्यवंशी (रा. सातपुतेवस्ती, इंदापूर ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी  गुरुवारी (२२ जून) इंदापूर मुक्कामी आली होती. सालाबादप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर दुपारी बारा एकच्या दरम्यान गोल रिंगण पार पडले होते. यावेळी तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी फिर्यादी त्याठिकाणी गेले होते. परंतु आरतीनंतर भाविकांच्या अफाट गर्दीमुळे झालेल्या ढकलाढकलीच्या परिणामी ते पालखीपासून १०-१५ फूट लांब ढकल...

इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी; दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

इमेज
७ लाख रु. किमतीच्या एकूण २१ दुचाकी हस्तगत; १८ गुन्ह्यांचा पर्दाफाश मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२१ जून) :- इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून चोरीच्या २१ दुचाकी हस्तगत करत गुन्हे शोध पथकाने इंदापूर शहरातील विनोद महादेव पवार (रा. सरस्वतीनगर) या २४ वर्षीय युवकासह, अतुल मारूती काळे (वय १९ वर्षे, रा. निमगाव, ता. माढा, जि. सोलापूर) आणि योगेश मच्छिंद्र सुरवसे (वय ३२ वर्षे, रा. बार्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. पैकी एक आणि दोन नंबरचे आरोपी दुचाकी चोरून आरोपी नंबर तीन'ला विक्री करत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या तिघा आरोपींकडून पोलिसांनी पल्सर, युनिकॉर्न, शाईन आणि एच.एफ. डिलक्स अशा ७ लाख रु. किमतीच्या एकूण २१ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे एक दोन नव्हे तब्बल १८ गुन्हे उघडकीस आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यामध्ये इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीच्या १५, तर कुर्डुवाडी, टेंभूर्णी आणि फलटण हद्दीतील प्रत्येकी १ गुन्ह्याचा समावेश आहे. इंदापूर पोली...

हजारो चित्रबलाक पक्षांची इंदापूरमध्ये हत्या? इंदापूर नगरपरिषदेचे बेजबाबदार अधिकारी जबाबदार? नागरिक, पक्षी प्रेमींमध्ये संतापाची लाट

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क जुन्या तहसील कचेरीतील, तथा मालोजीराजेंच्या ऐतिहासिक गढीवरील मुळ्या कमकुवत झाल्याने धोकादायक  बनलेल्या चिंचेच्या झाडासंदर्भात योग्य पद्धतीने उपाययोजना करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मात्र उपाययोजनांच्या नावाखाली इंदापूर नगरपरिषदेने नियमबाह्य व बेजबाबदार पद्धतीने ऐतिहासिक  झाड आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जमीनदोस्त केले. परिणामी झाडावर आश्रित हजारो चित्रबलाक पक्षांचा व वटवाघुळांचा झाडाखाली चिरडून नाहक बळी गेला. त्यामुळे पक्षी प्रेमी आणि नागरिकांमध्ये नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर संबंधित प्रशासनाने जखमी पक्षांवर उपचार करण्याऐवजी त्यांना गडबडीत पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांचे, तथा प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मुळ्या कमकुवत झाल्याने झाड कधीही उमळून पडेल अशी अवस्था निर्माण झाली होती. त्यामुळे हजारो परदेशी पक्षांचे आश्रयस्थान असलेले हे झाड योग्य उपाययोजना करण्यासह कसे वाचवता येईल असा प्रयत्न केला पाहिजे अशी मागणी वारंवार होत होती. मात्र एका चुकीच्या ...

इंदापूर शहरातील ते जीर्ण झाड ठरणार वैष्णवांसाठी धोकादायक

इमेज
अनेकवेळा लक्ष वेधूनही इंदापूर नगरपरिषदेचे दुर्लक्ष; पालखीपूर्व उपाययोजना करणे आवश्यक मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१४ जून) :- २२ जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी लाखों वारकऱ्यांसह इंदापूर शहरात मुक्कामी येणार आहे. मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इंदापूरमध्ये येणाऱ्या वैष्णवांचा जीव धोक्यात सापडणार असल्याचे दिसत आहे. जुन्या तहसील कचेरी परिसरातील धोकादायक अवस्थेतील चिंचेच्या झाडाकडे नगरपरिषदेच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.  इंदापूर शहरातील मालोजीराजेंच्या गढीच्या ढासळलेल्या काठावर आणि जुन्या तहसील कचेरीच्या उत्तरेस अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील या झाडाच्या मुळ्या माती निघून गेल्याने पूर्ण खुल्या झाल्या आहेत. परिणामी अंदाजे ६०-७० फूट उंच आणि ३०-४० फूट घेरा असलेले अनेक टन वजनाचे हे झाड अतिशय धोकादायक बनले आहे. त्यातच सध्या वादळी वाऱ्याचे दिवस असल्याने हा धोका अधिकच वाढला आहे. झाडाखालूनच दौलतनगर ते रामवेस नाका यांना जोडणारा चांदशाहवली मार्ग आहे. याच मार्गावर अनेक रुग्णालये असल्याने पालखी मुक्कामी असताना अनेक वारकरी रुग्णालयांमध्ये येथूनच ये ज...

अदृश्य चेटकीणीचा हात पुन्हा वळवळला; इंदापूर बस स्थानकात दोन महिलांच्या दागिन्यांवर हात साफ

इमेज
बस स्थानकातील चोऱ्या रोखण्यात पोलीस प्रशासन हतबल? एसटी प्रशासनाने प्रवाशांना नुकसान भरपाई द्यावी... मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (११ जून) - इंदापूर बस स्थानकातील चोऱ्यांचे सत्र थांबायला तयार नसून, चोऱ्या रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याने या चोऱ्यांमागे अदृश्य चेटकीणीचा हात आहे का? असा उपहासात्मक सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. बुधवारी (७ जून) दुपारी पाऊणे तीन ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्याने दोन महिला प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. या संदर्भात आशा सुरेंद्र निकम (रा. भाटनिमगाव ता. इंदापूर, जि. पुणे) या ६७ वर्षीय वृद्धेने शुक्रवारी (९ जून) इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बुधवारी फिर्यादी आपल्या मुलासह बार्शीला निघाल्या होत्या. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ८ ग्रॅम सोन्याचे मनी असलेली तब्बल ३० हजार रू. किंमतीची माळ लंपास केली. दरम्यान आपली माळ शोधण्यासाठी बसच्या खाली उतरलेल्या फिर्यादी यांना अमृता किरण जाधव (रा. सुगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी आपल्यासोबतही असाच प्रकार घडल्याचे सांगितले. अमृता जाधव ...

डांबर वर खाली खडी सांगा लोकहो ! बोलायचं कुणी?

इमेज
  रस्त्याची डागडुजीच वारकऱ्यांना ठरणार त्रासदायक; इंदापूर प्रशासनाच्या गलथान कारभाराची पुन्हा प्रचिती मुत्सद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (८ जून) :- संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २२ जून रोजी इंदापूर शहरात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांच्या डागडुजीचे काम संबंधित प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र ही डागडुजीच वारकऱ्यांसाठी जास्त त्रासदायक ठरणार आहे. सोमवारी (५ जून) नगरपरिषद प्रशासनाकडून इंद्रेश्वर मंदिरासमोरच्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र खड्डे न बुजवता केवळ डांबर आणि खडीचा सडा रस्त्यावर मारण्यात आला. संबंधित ठेकेदाराने खडी आणि डांबराचा मेळ न घातल्याने रस्त्याची अवस्था "असून अडचण, नसून खोळंबा" अशी झाली आहे. उन्हामुळे रस्त्यावरील डांबर पूर्ण वितळत असून, नागरिकांना रस्त्यावरून चालणेही अशक्य होत आहे. डांबर नागरिकांच्या चपलांना आणि वाहनांच्या चाकांना चिटकत असल्याने नागरिक संबंधितांना शिव्या श्राप देऊनच पुढे जात आहेत. त्यातच आता २२ जून रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखों वारकरी इंदापूर शहरात मुक्कामी येणार आहेत. आधीच इंदापूर शहर आणि...

तो मोदींच्या छत्रछायेखाली आहे म्हणून; होय तो भाजपचा खासदार आहे म्हणून...

इमेज
  संपादकीय ... भारतीय कुस्ती संघाचा (रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया) अध्यक्ष आणि भाजपचा खासदार ब्रिजभूषण सिंह याच्या विरोधात देशभरात संताप उसळत आहे. कारणही गंभीर आहे. महिला कुस्तीपटुंनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केलाय त्याच्यावर. खेळात मदत करण्याच्या बदल्यात भाजपच्या या खासदाराने शारीरिक संबंधाची मागणी केली असा उल्लेख पोलीस तक्रारीत असल्याचं इंडियन एक्स्प्रेसने म्हटलं आहे.  हिंमत दाखवून तक्रार करणाऱ्यांत अल्पवयीन  कुस्तीपटुही  आहेत. ब्रिजभूषण याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्याच्यावर लैंगिक शोषण, हत्या, हत्येचा प्रयत्न, दाऊद इब्राहिमच्या साथीदारांना शरण देणे असे गुन्हेगारी स्वरूपाचे ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आश्चर्य ! जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीत महिला पैलवानांच्या प्रकरणात गुन्हा दाखल करा म्हणून सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं. मात्र तो अद्यापही मोकाट आहे. कारण स्पष्ट आहे. तो जगातल्या सर्वात मोठ्या पार्टीचा खासदार आहे. होय तो मोदींच्या पार्टीचा, तो भाजपचा खासदार आहे म्हणूनच. पिडीत महिला कुस्तीपटुंचे आंदोलन उखडून टाकण्याचा घटनाक्रमही अस्वस्थ करणारा आ...