मध्यरात्री राजेवलीनगर भागात चोरट्यांचा हैदोस; अनेक फ्लॅट, बंद खोल्या फोडल्या; नागरिकांमध्ये दहशत
कायद्याचा धाक राहिला नसल्याचे, उपाययोजनांची तथा पोलिसांची गस्त आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (३० ऑगस्ट) :- जोगवा मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून राजेवलीनगर भागातील एका महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली होती. ही घटना अजून ताजी असतानाच आज (३० ऑगस्ट) मध्यरात्री चार चोरट्यांनी याच भागातील वेगवेगळ्या तीन ते चार अपार्टमेंटमधील बंद असलेले फ्लॅट फोडून हैदोस घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एसटी डेपो समोरील अशोक अपार्टमेंटमधील परदेशी यांचा फ्लॅट, कलीम शेख यांचा बंद हॉल आणि सूरज हाईट्स अपार्टमेंटमधील लॉक असलेल्या स्टोअर रूमचा समावेश आहे. जवळपास सर्वच भागात चोरट्यांची मध्यरात्री बिनधास्त रात्र गस्त चालू होती. मात्र कोणालाही कानोकान खबर लागली नाही. विशेष म्हणजे चोरट्यांनी लॉक तोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. शहरात वाढत्या चोऱ्या पाहता चोरट्यांवर कायद्याचा वचक राहिला नसल्याची, तथा गावातील सुव्यवस्थेला सुरुंग लागल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. सूरज हाईट्स या अपार्टमेंटच्या पार्किंगमधील स्टोअर रूमचे कुलूप तोडून चो...