तोतया डॉक्टरच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू? तोतया डॉक्टर आणि महाराजावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२९ ऑगस्ट) :- उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथील विविध धार्मिक स्थळांच्या सहलीसाठी गेलेली कांदलगाव येथील एक महिला आयोजकांचा हलगर्जीपणा आणि तोतया डॉक्टरच्या वैद्यकीय उपचाराची बळी ठरली. शोभा देविदास सरडे (रा. कांदलगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, देविदास दगडू सरडे (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून विजय राजेंद्र वलगे (रा. मुंगशी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि अनिरुद्ध उर्फ निखिल रामभाऊ निंबाळकर (रा. बिटरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) या दोघांवर इंदापूर पोलीस ठाण्यात १७ ऑगस्ट २०२४ रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी या घटनेतील आरोपी व तोतया डॉक्टर असल्याचा आरोप असलेल्या विजय राजेंद्र वलगे या आरोपीला काल (२८ ऑगस्ट) अटक करण्यात आली आहे. इंदापूर न्यायालयाने आज त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची घटना १७ जुलै २०२३-२६ जुलै २०२३ दरम्यान घडली असून, कांदलगाव येथील ७, तर इतर ठिकाणच्या एकूण २० महिला व पुरुष वर नमूद राज्यातील विविध धार्मिक स्थळांच्या सहलीसाठी गेल्या होत्या. स...