पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मांजावर बंदी इंदापूरमध्ये मात्र सर्रास विक्री; बारामतीमध्ये कारवाई, इंदापूरमध्ये कधी?

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मुत्सुद्देगिरी) इंदापूर (२५ जून)  : हनुमंत जगदाळे या व्यक्तीचा चायनीज मांजामुळे गळा चिरल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना  नुकतीच वेळापूर (ता. माळशिरस) येथे  घडली. चायनीज मांजाच्या विक्रीवर बंदी असूनही स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इंदापूर शहरात मात्र या धोकादायक दोऱ्यांची सर्रास आणि खुली विक्री आणि वापर सुरू आहे. मांजा विक्री करणाऱ्या दोघा व्यापाऱ्यांसह पतंग उडवणाऱ्या युवकांवर बारामती पोलीसांकडून काल (२४ जून) कारवाई झाल्याने जीवघेण्या मांजामुळे इंदापूर शहरातील नागरिक गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना होऊनही मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी इंदापूर नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन एखाद्याचा जीव जाण्याची वाट बघत आहे का? असा सवाल इंदापूरकरांना पडू लागला आहे. ही समस्या सर्वांना भेडसावत असली तरी बोलणार कोण? 'कळतं पण वळत नाही' अशी अवस्था इंदापूरकरांची झाली आहे. पतंग उडवण्याचा खेळ आता केवळ एका सणापुरता मर्यादित राहिलेला नाही. कोरोनामुळे गेली दीड वर्ष सर्व शाळा बंद असल्याने टाईमपाससाठी पतंग उडवणे हा मुलांच्या गरजेचा व जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. पतंग ...

पाणी पुरवठा योजनेत केले अनेक मृत कामगारांनी काम; निमगांव केतकीमधील अजब घटना

इमेज
सचिन देशमाने (निमगाव केतकी) निमगांव केतकी (२२ जून ) :- पाणी पुरवठा योजनेत मयत लोकांनी काम केल्याची अजब घटना या ना  त्या माध्यमातून नेहमी चर्चेत असणाऱ्या निमगांव केतकीमध्ये घडली आहे. २०१२-२०१३  मध्ये निमगांव ग्रामपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा समिती मार्फत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत शेंडेवस्ती येथे झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनेत काम करणाऱ्या ११६ कामगारांपैकी अनेक कामगार हे योजना सुरू होण्याआधीच मृत झाले असल्याचा खळबळजनक दावा समता परिषदेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादाराम निवृत्ती शेंडे यांनी केला आहे. सोबतच त्यांनी या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून, दोषींवर कार्यवाही व्हावी यासाठी आजपासून निमगांव ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला आहे. सविस्तर वृत्त असे की, २०१२-२०१३ साली निमगांव केतकी येथील शेंडेवस्ती याठिकाणी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत निमगांव ग्रामपंचायतीच्या नळ पाणी पुरवठा समितीच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात आले होते. मात्र आता या योजनेबाबत समता परिषदेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष  दादाराम निवृत्ती शेंडे यांनी अनेक ...

पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये २५ टक्के कपात करावी; इंदापूरमधील एमआयएम कार्यकर्त्यांची मागणी

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१८ जून) :- 'कोरोना काळ त्यावर इंधनाची दरवाढ' अशा दुहेरी दुश्चक्रात अडकलेल्या जनतेला केंद्र व राज्य शासनाने इंधनावरील कर कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या एका निवेदनाच्या माध्यमातून इंदापूर शहरातील एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी आज केली आहे. जीवनावश्यक वस्तूत गिणती होत असलेले पेट्रोल सध्या शंभरीपार तर डिझेल शंभरीजवळ पोहोचल्याने सामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडत असलेल्या इंधनाच्या करांमध्ये कपात करून इंधनाच्या किंमतींमध्ये २५ टक्क्यांपर्यंत कपात करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. गतवर्षी जगभरात लागलेल्या लॉकडाऊनमुळे तेलाची आंतरराष्ट्रीय मागणी कमी झाल्याने तेलाचे दर अक्षरश: कोसळले होते. या परिस्थितीत भारतात मात्र सलग ८२ दिवस तेल कंपन्यांनी इंधनांचे दर स्थिर ठेवले होते. आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना शासन बरोबरीने करही वाढवत असल्याने इंधन दरवाढीचा डबल फटका ग्राहकांना बसतो आहे. भारतीयांना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याचा फायदाही मिळाला नाही, उलट वर्षभरानंतर दरवाढीचा ...

आयशर टेंम्पोसह २४ लाखांचा अवैध गुटखा जप्त, तिघा जणांवर गुन्हा दाखल

इमेज
मु त्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क भिगवण (११ जून) :- अवैध गुटखा अथवा गुटखा बनवण्याकामी प्रतिबंधित असलेला जवळपास २४ लाखांचा कच्चा माल भिगवण पोलीसांकडून जप्त करण्यात आला असून, रात्री (११ जून)  साडेबाराच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर पेट्रोलिंग दरम्यान भादलवाडी (ता. इंदापूर) हद्दीत भिगवण पोलीसांनी ही कारवाई केली आहे. ज्ञानेश्वर दगडू महाकाळ, सुनिल मारूती बिचकुले आणि अमोल प्रकाश साळुंके अशी अटक करण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील तिघा जणांची नांवे आहेत. सविस्तर वृत्त असे की, रात्री (११ जून) साडे बाराच्या सुमारास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पठाण व होमगार्ड माने पुणे सोलापूर हायवेवर पेट्रोलिंग करीत असताना त्यांना भादलवाडी (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा किंवा गुटखा बनवण्याकामी लागणारा तब्बल २३ लाख ७३ हजार ८४९ रूपायांचा कच्चा माल घेऊन जात असलेला चॉकलेटी आयशर टेंम्पो (एम. एच. ४५ ए.एफ. ५४५४) आढळून आला. भिगवण पोलीसांकडून मुद्देमालासह हा टेंम्पो जप्त करण्यात आला असून, सोलापूर जिल्ह्यातील (बामणी, ता. सांगोला) ज्ञानेश्वर दगडू महाकाळ (वय २५ वर्ष), सुनिल मार...

दुर्घटनेतून जन्माला आले पर्यावरणविषयक कायदे; पर्यावरण दिनी घेतलेला कायद्यांचा आढावा

इमेज
इतिहास तरी हेच सांगतो की घटनेतून शिकण्याऐवजी आपण दुर्घटनेतून जास्त शिकलो आहोत. इथं घटना म्हणजे भारताची राज्यघटना. उत्क्रांती घटना आणि दुर्घटना या दोन्हींमधून पुढे जाते असं आपण म्हणू शकतो.   अर्थात पर्यावरणाचा पहिला कायदा घटनेतूनच आला, दुर्घटनेतून नाही. 1974 साली झालेला जल प्रदूषणाचा कायदा हा आपला स्वातंत्र्योत्तर झालेला सर्वसमावेशक आणि परिणामकारक असा पहिला कायदा. या कायद्यानं देशातल्या प्रदूषण नियंत्रणाला कायद्याची चौकट आणि अंमलबजावणीसाठी मूलभूत रचना दिली. महाराष्ट्राचा आपल्याला भलत्याच बाबतीत अभिमान वाटत असतो. खरा अभिमान वाटावा ती गोष्ट अशी की केंद्राच्या तब्बल पाच वर्ष आधी महाराष्ट्रानं पहिला जल प्रदूषण कायदा देशात पहिल्यांदा 1969 साली केला. 1974 साली केंद्रानं हाच कायदा तिकडे संसदेत नेला. त्यानंतर 1981चा हवा प्रदूषण कायदा आला. हे दोन कायदे घटनेतून आले, दुर्घटनेतून नाही. यानंतरचे कायदे मात्र दुर्घटनेतून आले. 1984 साली भोपाळ दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेतून, त्यापोटी आलेल्या दबावातून 1986 सालचा पर्यावरण संरक्षण कायदा आला. हा कायदा umbrella act समजला जातो. तथापि तो तसा नाही....

तर तुमच्यावर गुन्हा दाखल करेन; पिडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याचा ठेकेदाराला सज्जड दम

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२ जून) :- इंदापूर शहराच्या मध्यातून जाणाऱ्या पुणे सोलापूर हायवेवर अनेक अपघातांना कारणीभूत ठरत असलेली खडी परवापर्यंत जैसे थे अवस्थेत दिसली तर 'तुमच्यावर गुन्हा दाखल करेन' असा सज्जड दम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने हायवेच्या डागडुजीचे काम करत असलेल्या संबंधित ठेकेदाराला दिला आहे. हायवेच्या निष्काळजीपणे केल्या जात असलेल्या डागडुजीच्या कामामुळे वाहने घसरून अनेक अपघात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष आणि पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता धनंजय वैद्य यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केल्यानंतर वरील प्रकार घडला. सध्या इंदापूर शहरातून जाणाऱ्या पुणे सोलापूर हायवेवरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. मात्र संबंधित ठेकेदाराकडून अत्यंत निष्काळजीपणे करण्यात येत असलेल्या या कामामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या कामात ठेकेदाराकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नसून, निष्काळजीपणे चाललेल्या या कामातील खडी मोठ्या प्रमाणात संपूर्ण रस्त्यावर अस्तव्यस्त प...