इंदापूर शासकीय कार्यालये सामान्यांच्या लुटीचे केंद्र? महसूल विभागातील महिला कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात
२ ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; स्वतः आणि साहेबांसाठी मागितली होती लाच मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क शासनाचा भरमसाठ पगार असूनही हरामच्या कमाईसाठी शेतकऱ्याला लाच मागणारी इंदापूर महसूल विभागातील लाचखोर महिला कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी झालेल्या या कारवाईमध्ये शेतातील रस्त्याच्या प्रलंबित प्रकरणातील कागदपत्रे फिर्यादीला देण्यासाठी २५ हजारांची लाच मागणाऱ्या महसूल विभागात महसूल सहाय्यक पदावर कार्यरत कावेरी विजय खाडे (रा. संघवी नगर, बारामती, जि. पुणे) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या संदर्भात भांडगाव (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील शेतकरी हनुमंत अनिल मदने यांनी २७ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा याकामी फिर्यादीच्या वडिलांनी इंदापूर तहसीलमध्ये २७ जानेवारी २०२० रोजी अर्ज केला होता. या प्रलंबित प्रकरणाच्या निकालाशी निगडित कागदपत्रे बनवून देण्यासाठी खाडे बाईंनी मदने यांच्याकडे ३० हजारांची लाच मगितली होती, जी नंतर २५ हजारांवर डन झाली. मदने यांनी तक...