पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जेसीबीचा दर आता ताशी १२०० रु. तर ब्रेकर १८०० रु. डिझेल वाढीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर जेसीबी युनियनचा निर्णय

इमेज
मुत्सद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (३० ऑक्टोबर) :- वाढत्या इंधन दर वाढीचा फटका प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सर्वांनाच बसत आहे. मागील काही महिन्यांत वाढलेल्या डिझेलच्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर आता इंदापूर शहरातील जेसीबी'च्या (Backhoe Loader) दरांमध्येही जवळपास २० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे काल (२९ ऑक्टोबर) जाहीर करण्यात आहे. त्यामुळे जेसीबीचा दर आता प्रति ताशी १२०० रु. असणार आहे, तर ब्रेकरचा १८०० रु. काल झालेल्या 'इंदापूर जेसीबी युनियनच्या' बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अमोल खराडे यांनी सांगितले. त्यामुळे इंदापूरकरांना आता जेसीबीकरवी काम करून घेण्यासाठी २०० रु ज्यादा मोजावे लागणार आहेत. शहरात सध्या २५ च्या आसपास जेसीबी तर २ ब्रेकर आहेत. मागील अनेक वर्षांपासून जेसीबीचा दर प्रति तास १ हजार रुपये आकारला जात होता. त्यावेळी प्रति लिटर ६० रुपयांच्या आसपास असणाऱ्या डिझेलच्या दराने आज शंभरी ओलांडली आहे. दरमहा १० ते १२ हजारांच्या आसपास असणारा जेसीबी चालकाचा पगारही आता जवळपास १८ ते २० हजारांच्या घरात गेला आहे. त्यातच जेसीबीचा (Mentanance) इतर खर्च आणि बँकांचे हफ्ते पाहता जेसीब...

इंदापूरात डेंग्यू, मलेरियाची साथ, औषध फवारणीसाठी नगरपरिषदेला काँग्रेसची हाक

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२७ ऑक्टोबर) :- कोरोनाचा प्रादुर्भाव टळतो न टळतो तोच आता इंदापूर शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि गोचीडताप सारख्या साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. सध्या इंदापूर शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये याच आजारांशी संबंधित रुग्ण जास्त प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे शहरात या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांची फवारणी करण्याची गरज ओळखून इंदापूर शहर काँग्रेस कमिटीने यासंबंधीची मागणी इंदापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. वरील साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव थांबवण्याची गरज असून, नगरपालिकेने प्रभागनिहाय औषध फवारणी त्वरित चालू करावी अशा आशयाचे निवेदन काल (२६ ऑक्टोबर) इंदापूर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चमनभाई बागवान यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे दिले आहे. हे देखील वाचा - इंदापूर शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दलित स्वयं संघाचे वैद्यकीय कॅम्पचे आयोजन या वेळी काँग्रेस कमिटीचे इंदापूर शहराध्यक्ष चमनभाई बागवान, डॉ. संतोष होगले, काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस जकीरभाई काझी, महादेव लोंढे, आकाश पवार, युवराज गायकवाड, ...

इंदापूर शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दलित स्वयं सेवक संघाकडून वैद्यकीय कॅम्पचे आयोजन

इमेज
कॅम्पमध्ये तपासणीसाठी नागरिकांनी केलेली गर्दी mइंदापूर (२६ ऑक्टोबर) :- कोरोनासारख्या महामारीनंतर आता इंदापूर शहरात डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया आणि गोचीड तापासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्या अनुषंगाने इंदापूर शहरातील दलित स्वयं सेवक संघाने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने इंदापूर शहरातील संबंधित रोगांबाबत संवेदनशील असलेल्या आंबेडकरनगर, साठेनगर, उमाजी नाईक नगर, लोकमान्य नगर, संत रोहिदास नगर, आठबाई मळा, बावडा वेस आणि एकूणच संपूर्ण इंदापूर शहरातील गरजू नागरिकांकरिता आज (२६ ऑक्टोबर)  सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संबंधित साथीच्या रोगाची मोफत तपासणी आणि औषधोपचार कॅम्प आयोजित केला होता. हा कॅम्प सत्यशोधक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवनातील कै. अरुणरावजी ढावरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शहरातील गरीब, कष्टकरी वर्गातील नागरिकांना ज्यांचे दरडोई उत्पन्न अत्यल्प आहे अशा नागरिकांना मोफत औषधोपचार मिळावेत हा या कॅम्प आयोजित करण्यामागचा प्रमुख उद्देश असल्याचे दलित स्वयं सेवक संघाचे इंदापूर शहराध्यक्ष उमेश ढावरे यांनी म्हटले आहे. को...

इंदापूरचा प्रसिद्ध ढोलकीपटू हरपला; बापूराव ढावरे यांचे हृदयविकराच्या तीव्र झटक्याने निधन

इमेज
इंदापूर (२४ ऑक्टोबर) :-  इंदापूर शहर व तालुक्यातील प्रसिद्ध ढोलकीपटू बापूराव ढावरे यांचे वयाच्या ३५ व्या वर्षी आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा, दोन मुली, पत्नी आणि अंध आई आहे. ते इंदापूर तालुक्यात ढोलकी वादक म्हणून प्रसिद्ध होते. बापूराव हे दृष्टिहीन असूनही ढोलकी वाजवण्यात ते एका डोळस व्यक्तीपेक्षाही जास्त प्रवीण होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे मित्र व सहकारी बाळासाहेब सरवदे यांनी व्यक्त केलेल्या भावना माझ्या जिवाभावाचा ढोलकीपटू बापूराव ढावरे यांचे दुःखद निधन आज दिनांक २४ / १० / २०२१ रोजी झाले ही मनाला वेदना देणारी दुःखद घटना आज घडली. लहानपणापासून प्रत्येक लोककलेत आपल्या ढोलकीच्या तालावर भल्याभल्यांना नाचवणारा हूरहन्नरी कलाकाराचे आपल्यातून आकस्मीक निघून जाणे मनाला क्लेशदायक घटना आहे इंदापूर तालुक्यातील उत्कृष्ठ ढोलकीपटू म्हणून बापूराव ढावरे प्रसिद्ध होते. अंध असूनही आपल्या कलेच्या जोरावर प्रपंच चालविणारा बापू आंब...

दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार

इमेज
गुणवंतांचा सत्कार करतानाचा प्रसंग मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२४ ऑक्टोबर) :- इंदापूर शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि इंदापूर तालुका व शहर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गुणवंतांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यामध्ये विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण आणि प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदावर नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डाॅ. प्रा. जीवन सरवदे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष विलासदादा मखरे, माजी प्राचार्य शहाजी मिसाळ, माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे, आरपीआय बारामती लोकसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा इंदापूर तालुका सांस्कृतिक विभाग प्रमुख बाळासाहेब सरवदे, इंदापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका राजश्री मखरे इत्यादी उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभेचे इंदापूर तालुकाध्यक्ष डाॅ. प्रा. जीवन सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात, एम. पी. एस. सी. परीक्षेच्या माध्यमातून आर.एफ.ओ. (वननिरीक्षक ऑफिसर) या पदावर नियुक्...

मनोहर मामानंतर आता जंक्शनचा शेख'बाबा चर्चेत; संत बाळू मामाचा अवतार असल्याचे सांगून लोकांना लाखोंचा गंडा घालत असल्याचा आरोप

इमेज
बाळू मामा अंगात येत असल्याचा दावा करण्याचा आरोप झालेला जमीर शेख  कळस हद्दीत बेकायदेशीर मठाचे काम सुरू असल्याचाही आरोप; मनोहर मामा प्रकरणाची पुनरावृत्ती होणार? मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क शुक्रवार (२२ ऑक्टोबर) :- संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडून लोकांना फसवून लाखोंचा गंडा घातल्याच्या व सध्या खंडणी, बलात्कार अशा अनेक वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांच्या आरोपात अटकेत असणारा करमाळा तालुक्यातील उंदरगावचा मठाधिश मनोहरमामा भोसलेचं प्रकरण अजून ताजं असताना आता संत बाळूमामाचा अवतार असल्याचा दावा करणारा आणखी एक भोंदूबाबा इंदापूर तालुक्यात नावारूपाला येत असल्याच्या चर्चा समोर येऊ लागल्या आहेत. हा बाबा संत बाळूमामाचा अवतार आणि बाळू मामा अंगात येत असल्याचं सांगून अनेक लोकांना लाखोंचा गंडा घालत असल्याचा आरोप होत असून, जमीर दाऊत शेख ( जंक्शन, ता. इंदापूर)  असं या बाबाचं नाव आहे. जमीर शेख  रेडणीमध्ये (ता. इंदापूर) 'दादा सैलानी' नावाचे चिकन शॉप चालवतो. जादूटोणा आणि अनिष्ट पूजाअर्चेच्या माध्यमातून लोकांची भूतबाधा, करणी, भानामती काढण्याचा दावा कर...

त्या त्या वेळी विरोधक हर्षवर्धन पाटील यांच्या त्या विधानाचाही हवाला देतील

इमेज
संपादकीय मावळ येथील एका हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी एकाच व्यासपीठावर उपस्थित पक्ष बदललेल्या वेगवेगळ्या नेत्यांशी खाजगीत झालेल्या चर्चेनंतर ओघाओघात त्याच विषयाला पुढे नेत माजी सहकारमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी 'आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं, काही नाही सगळं मस्त आहे, कुठली चौकशी नाही, चांगली झोप लागते' असं अनाहूतपणे आणि गंमतीने केलेल्या विधानाची गल्ली ते दिल्लीपर्यंत चांगलीच चर्चा झाली. त्यांच्या या विधानात तथ्य असो वा नसो, कुठल्या अर्थी, कोणाला उद्देशून त्यांनी हे विधान केलं हे त्यांनाच ठाऊक. मात्र त्यांच्या या विधानामुळे ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करत असल्याच्या भाजप विरोधकांच्या आरोपांना काहीशी बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे. हर्षवर्धन पाटील तुमच्यात आले आणि पवित्र झाले? - उद्धव ठाकरे पाटील यांच्या या विधानानंतर त्यांचे राजकीय विरोधक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन पाटील आणि भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत...

भीषण अपघात - लोणी देवकर नजीक कंटेनरची दुसऱ्या कंटेनरला मागून धडक; चालक जागीच ठार

इमेज
अपघातग्रस्त दोन्ही कंटेनर लोणी देवकर (१४ ऑक्टोबर ) :- पुणे सोलापूर हायवेवरील लोणी देवकर (ता. इंदापूर) नजीक पुण्याच्या दिशेने निघालेल्या हैदराबाद (तेलंगणा) येथील कॉस्मो कैरीइंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कंटेनरने (AP-13-X-9135) टाटा मोटर्स कंपनीच्या दुसऱ्या एका कंटेनरला (MH-04-GC-5875) मागून धडक दिल्याने अपघात झाला असून, आज रात्री १ वाजण्याच्या आसपास झालेल्या या अपघातात मागून धडक देणाऱ्या हैद्राबाद येथील कंटेनरचा चालक जागीच ठार झाला असल्याची प्राथमिक माहिती सरडेवाडी टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेचे चालक पप्पू जगताप यांनी दिली आहे. हैद्राबाद येथील कंटेनरने मागून धडक देण्याचे नेमके कारण समजले नसून, मृत चालकाची ओळख देखील अद्याप पटू शकलेली नाही. हा अपघात एवढा भीषण होता की, मागून धडक देणाऱ्या कंटेनरचा पुढचा भाग संपूर्ण चक्काचूर झाला असून, क्रेनच्या साहाय्याने ओढून या दोन्ही कंटेनरला वेगळे करण्यात आले, तर मृत चालकाला बाहेर काढण्यासाठी देखील बराच अवधी लागल्याचे पप्पू जगताप यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि सरडेवाडी टोलनाक्याचे रुग्णवाहिका चालक पप्पू जग...

भाजपमध्ये जावे लागले, कोणतीही चौकशी नाही, आता शांत झोप लागते - या वक्तव्यावर हर्षवर्धन पाटील यांचे स्पष्टीकरण

इमेज
इंदापूर (१३ ऑक्टोबर)  :-   मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, अर्थाचा अनर्थ केला गेला. भाजपमध्ये जाण्याचा आणि चौकशीचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मावळमध्ये केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात दिले आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आज इंदापूर अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मावळ (जि. पुणे) तालुक्यातील एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी, 'आम्हाला भाजपामध्ये जावे लागले, सर्व काही मस्त आहे, आता शांत झोप लागते, कोणतीही चौकशी नाही, काही नाही, असे वक्तव्य केले होते. मावळमधील या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके असे वेगवेगळ्या पक्षाचे नेते उपस्थित होते. एकाच व्यासपीठावर असलेल्या वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांशी मनमोकळ्या गप्पा झाल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी भाषण करताना त्या गप्पांशी संबंधित गंमतीने केलेल्या या वक्तव्याची मात्र राजकीय वर्तुळात...

मातंग समाजाचे प्रश्न आक्रमकपणे मांडणार- दत्ता भाऊ जगताप

इमेज
दत्ता भाऊ जगताप यांना निवडीचे पत्र देताना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे इंदापूर (८ ऑक्टोबर) :- भविष्यात आपण मातंग समाजाचे प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचे मत लहुजी शक्ती सेनेचे नवनियुक्त पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांनी म्हटले आहे. केडगाव चौफुला येथे रविवारी लहुजी शक्ती सेनेच्या झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मातंग समाजाच्या विविध प्रश्नांसह अनेक सामाजिक मुद्यांवर यशस्वी आंदोलन करणारे कालठण येथील दत्ताभाऊ जगताप यांची नुकतीच लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याआधी ते इंदापूर तालुकाध्यक्ष म्हणून काम करत होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी संघटनेचे महाराष्ट्राचे कोअर कमिटीचे अध्यक्ष कैलास दादा खंदारे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव दादा भोसले आणि पुणे, सोलापूर, विदर्भ, मराठवाडा अशा अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  निवडीनंतर दत्ता भाऊ जगताप यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना विष्णू भाऊ कसबे यांनी, दत्ता भाऊ जगताप हे मातंग समाजाचे आधुनिक फकीरा असल्याचे म्...

अपघात - पुणे सोलापूर महामार्गावर पंक्चर झालेल्या टेम्पोला मागून धडक; एकजण जागीच ठार

इमेज
अपघातग्रस्त टेम्पोतून मृत व जखमींना बाहेर काढताना (डाळज नंबर - १) :- पुुणे  सोलापूर महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असून,  पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या मालवाहतूक आयशर टेम्पोने (MH-14-GU-7078) डाळज नंबर १ (ता. इंदापूर) येथे टायर पंक्चर झाल्यामुळे साईड पट्टीच्या बाजूला (डावीकडे) उभ्या असलेल्या दुसऱ्या टेम्पोला (MH-16-T-7824) आज रात्री १ वाजण्याच्या सुमारास मागच्या बाजूने धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून, बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात टेम्पो चालकाला समोर उभा असलेला टेम्पो न दिसल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तर या अपघातात धडक देणाऱ्या टेम्पोचा चालक जागीच ठार झाला असल्याची माहिती महामार्ग पोलीसांकडून देण्यात आली आहे. मृत चालकाचे नांव मेहबूब जमादार (रा. रमाई वसाहत, कासारवाडी, पुणे) असल्याची माहिती समोर येत असली तरी, अद्याप पोलीसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तर टेम्पोतील इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, धडक देणाऱ्या टेम्पोचा पुढचा भाग संपूर्ण चक्काचूर झाला असून, मृत चालकाला आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी...

आरोपींनाही अनेक कायदेशीर व मूलभूत अधिकार - ॲड. आशुतोष भोसले

इमेज
उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना ॲड. भोसले इंदापूर (५ सप्टेंबर) :- एखाद्या गुन्ह्यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीलाही अनेक हक्क व अधिकार असून, कायद्यांविषयी असलेली अज्ञानता अनेकांच्या कायदेशीर समस्यांचे कारण असल्याचे मत ॲड. आशुतोष भोसले यांनी व्यक्त केले. कायद्याविषयी जनजागृती आणि आरोपींनाही हक्क व अधिकारांची माहिती व्हावी या पार्श्वभूमीवर 'आझादीच्या अमृत महोत्सवाच्या' निमित्ताने राष्‍ट्रीय विधि सेवा प्राधिकरण (National Legal Services Authority (NALSA) यांच्या सूचनेवरून 'इंदापूर तालुका विधी सेवा समिती' आणि 'तालुका वकील संघ' यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (५ ऑक्टोबर) इंदापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'कायदेविषयक जनजागृती' या कार्यक्रमात ते बोलत होते. न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. डी. वडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला, ॲड. एस. बी. पाटील, ॲड. बी. पी. जगताप, ॲड. आबासाहेब तोरणे, ॲड. अक्रम आसिफ शेख, ॲड. राकेश शुक्ल, ॲड. प्रवीण बारवकर, ॲड. रवी कोकरे, ॲड. माधव शितोळे, ॲड. स...

अपघात - पहाटेच्या सुमाराला लोंढेवस्तीनजीक वॅगनआर गाडी पलटी झाल्याने अपघात

इमेज
अपघातातील जखमी उपचारार्थ रुग्णालयात दाखल  इंदापूर (४ ऑक्टोबर) :- इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर हायवेवरील लोंढेवस्तीनजीक पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका वॅगनआर गाडीचा पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला असून, वाहन पलटी झाल्याने हा अपघात झाल्यानेे या अपघातात वाहन चालक सुधीर रमेश गांगवे (वय ३०), रमेश विठू गांगवे (वय ६५) दोघेही रा. यावली ता. मोहोळ जि. सोलापूर हे किरकोळ जखमी झाले आहेत, तर रमेश गांगुर्डे (वय ६०), कमल विलास गांगवे (वय ६०) आणि कार्तिक लक्ष्मण अंधारे (वय ९) सर्व रा. सोमाटणे फाटा (पुणे) हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून, अपघात झाल्याची माहिती मिळताच सरडेवाडी टोलनाक्याची रुगवाहिका घटनास्थळी पोहोचली. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिकेचे चालक पप्पू जगताप यांनी तात्काळ उपचारार्थ इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पळसदेव - जेवताना ३० हजार हॉटेलमध्येच विसरले, लतीफ होता म्हणून ते परत घावले. आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता-पिता तयाचिया।।

इमेज
पैशाची बॅग महिलेला परत करताना लतीफ मुलाणी आणि इतर समीर सय्यद (मुत्सुद्देगिरी) जेवताना ३० हजार हॉटेलमध्येच विसरले, लतीफ होता म्हणूनच ते परत घावले. होय बरोबर वाचलं. लतीफ होता म्हणूनच ते घावले. घटना आहे पुणे सोलापूर हायवेवरील पळसदेव (ता. इंदापूर) नजीक असलेल्या हॉटेल उदय येथील. एसटी महामंडळाच्या एसटी बसेसचा थांबा असलेल्या हॉटेल उदयवर शुक्रवारी (१ ऑक्टोबर) थांबलेल्या बार्शी पुणे बसमधील प्रवाशी नौशाद मेहबूब शेख (वय ५०) आपल्या नातेवाईक वसीम सय्यद याच्यासोबत जेवणासाठी थांबल्या होत्या. जेवताना जवळ असलेली ३० हजारांची रोकड व महत्वाच्या कागदपत्रांची बॅग नौशाद शेख हॉटेलच्या टेबलावरच विसरल्या. बस पुण्याच्या दिशेने भिगवणपर्यंत पोहोचल्यावर पैशांची बॅग आपण हॉटेलमध्येच विसरल्याचे नौशाद शेख यांच्या लक्षात आल्याने प्रचंड घाबरलेल्या नौशाद शेख वसीम याच्याबरोबर तुरंत दुसऱ्या बसने हॉटेल उदयवर आल्या. दरम्यान, प्रसंग ओळखून लतीफ शेख यांनी ही बॅग आपल्या कस्टडीत घेतली होती. ओळख पटल्यावर बॅग नौशाद शेख यांच्या ताब्यात दिली. लतीफ यांच्या प्रामाणिकपणाची किंमत आपल्याला माणुसकीची पोलखोल करणाऱ्या कोरोना काळात झालेली पैश...

माजी नगरसेवक शेखर पाटील यांनी गोळी झाडली; मात्र जीवे मारण्यासाठी का स्वसंरक्षणासाठी? मारहाण झाल्याची व लुबाडल्याची शेखर पाटील यांचीही क्रॉस तक्रार

इमेज
समीर सय्यद (मुत्सुद्देगिरी) इंदापूर (१ ऑक्टोबर) :- इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं. १ येथे काल (३० सप्टेंबर) भरदिवसा दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शेखर अशोक पाटील यांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, भानुदास पंढरीनाथ सातपुते यांनी शेखर पाटील  यांच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर शेखर पाटील यांनीही भानुदास पंढरीनाथ सातपुते आणि अन्य तिघांनी आपल्याला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण केेल्याची व अंगावरील सोने व रोख रक्कम लुबाडल्याची क्रॉस तक्रार दिल्याने शेखर पाटील यांनी केेलेला गोळीबार जीवे मारण्यासाठी होता का स्वसंरक्षणासाठी होता याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. शेखर  पाटील यांनी जीवे मारण्याची धमकी देत  आपल्यावर बंदुकीमधून गोळी झाडल्याची फिर्याद आधी भानुदास पंढरीनाथ सातपुते यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीसांवर दोन्ही बाजूंनी राजकीय दबाव असल्याची चर्चा असल्याने या घटनेची निष्पक्ष चौकशी होणार का?  असा सवाल नागरिकांमध्ये आहे. भानुदास पंढरीनाथ सातपुते (रा. सातपुतेवस्ती, ता. इंदापूर) यांनी इंदापूर न...