इंदापूर शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दलित स्वयं सेवक संघाकडून वैद्यकीय कॅम्पचे आयोजन
| कॅम्पमध्ये तपासणीसाठी नागरिकांनी केलेली गर्दी |
mइंदापूर (२६ ऑक्टोबर) :- कोरोनासारख्या महामारीनंतर आता इंदापूर शहरात डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया आणि गोचीड तापासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. त्या अनुषंगाने इंदापूर शहरातील दलित स्वयं सेवक संघाने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने इंदापूर शहरातील संबंधित रोगांबाबत संवेदनशील असलेल्या आंबेडकरनगर, साठेनगर, उमाजी नाईक नगर, लोकमान्य नगर, संत रोहिदास नगर, आठबाई मळा, बावडा वेस आणि एकूणच संपूर्ण इंदापूर शहरातील गरजू नागरिकांकरिता आज (२६ ऑक्टोबर) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संबंधित साथीच्या रोगाची मोफत तपासणी आणि औषधोपचार कॅम्प आयोजित केला होता.
हा कॅम्प सत्यशोधक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवनातील कै. अरुणरावजी ढावरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शहरातील गरीब, कष्टकरी वर्गातील नागरिकांना ज्यांचे दरडोई उत्पन्न अत्यल्प आहे अशा नागरिकांना मोफत औषधोपचार मिळावेत हा या कॅम्प आयोजित करण्यामागचा प्रमुख उद्देश असल्याचे दलित स्वयं सेवक संघाचे इंदापूर शहराध्यक्ष उमेश ढावरे यांनी म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे आर्थिक कंबरडे मोडले असताना इंदापूर शहरात मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेल्या
या कॅम्पसाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास शेळके, डॉ. चंदनशिवे, रुग्णालयाचे कर्मचारी, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, नगरसेवक बाळासाहेब ढवळे, अजिंक्य जावीर, अक्षय सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी दलित स्वयं सेवक संघाचे इंदापूर शहराध्यक्ष उमेश ढावरे, कार्याध्यक्ष मयुर ढावरे, कार्यकारी सदस्य बापू अडसूळ, सामाजिक कार्यकर्ते गोरख ढावरे, लकी सागर, राजू शेख, राजू दिनकर शिंदे, किरण सागर, पप्पू केंगार, विशाल ढावरे, मुकुंद शिंदे, आकाश साठे, गोपाळ लोखंडे, आप्पा खंडाळे, बाळासाहेब अडसूळ, चंद्रकांत सोनवणे, राजू सागर यांनी विशेष मेहनत घेतली. तर पत्रकार शिवाजी शिंदे यांनी भेट दिली व जेष्ठ मार्गदर्शक अनिल बाबा ढावरे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा