पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाच्या इंदापूर तालुकाध्यक्ष पदी सुहास मोरे, तर सरचिटणीस पदी शशिकांत मखरे यांची निवड

इमेज
फोटो - डावीकडून सुहास मोरे, शशिकांत मखरे मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (८ जुलै) :- महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाच्या इंदापूर तालुका कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. गुरुवारी (७ जुलै) पार पडलेल्या या निवड प्रकियेत महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाच्या इंदापूर तालुकाध्यक्ष पदी सुहास मोरे, तर सरचिटणीस पदी शशिकांत मखरे यांची निवड झाली. याबाबत अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे व पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण यांनी मुत्सुद्देगिरीशी बोलताना दिली आहे. या निवड प्रक्रियेवेळी महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाचे राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे, राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे, पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, हवेली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, पुणे मनपा अध्यक्ष कैलास थोरात, पुणे मनपा महासचिव बापू विद्यागज इ. पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाची इंदापूर तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष - सुहास मोरे सरचिटणीस - शशिकांत मखरे कार्याध्यक्ष :...

महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाच्या राज्य संघटक पदी सदाशिव रणदिवे, तर मिलिंद देटगे यांची जिल्हा महासचिव पदी निवड

इमेज
फोटो - डावीकडून सदाशिव रणदिवे,  मिलिंद देटगे आणि रतिलाल कुचेकर   मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (८ जुलै) :- महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवड नुकतीच पार पडली. गुरुवारी (७ जुलै) पार पडलेल्या या निवड प्रकियेत राज्य संघटक पदी सदाशिव रणदिवे यांची, तर पुणे जिल्हा महासचिव पदी मिलिंद देटगे यांची वर्णी लागली आहे. तर जिल्हा संघटकपदी रतिलाल कुचेकर यांची आणि जिल्हा उपाध्यक्षपदी बालाजी मादळे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे व पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण यांनी मुत्सुद्देगिरीशी बोलताना दिली आहे. या निवड प्रक्रियेवेळी महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाचे राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे, राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे, पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, हवेली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, पुणे मनपा अध्यक्ष कैलास थोरात, पुणे मनपा महासचिव बापू विद्यागज इ. पदाधिकारी उपस्थित होते.

इंदापूर पोलिसांना अपघाताने सापडला ५ लाख ६० हजारांचा गांजा

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (६ जुलै) :- इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे सोलापूर हायवेवर अपघातग्रस्त झालेल्या एका परप्रांतीय चारचाकी वाहनात तपासणी दरम्यान पोलिसांना तब्बल ५ लाख ६० हजार रुपयांचा गांजा आढळून आला. सोमवारी (४ जुलै) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अपघाताने उघडकीस आलेल्या या घटनेनंतर राजस्थान पासिंग असलेल्या टोयोटा कंपनीच्या ग्लेंजा या चारचाकी वाहनाच्या अज्ञात मालक आणि चालका विरोधात सहाय्यक फौजदार नितीन तांबे यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे द्रव्य अधिनियम १९८५, कलम २० ब आणि ८ क, तसेच भा. द. वि. कलम २७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री पालखी तळावर पेट्रोलिंग दरम्यान इंदापूर पोलिसांना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या अमोल विष्णू मसगडे या जवानाकडून पुणे सोलापूर हायवेवरील पायल सर्कल नजिक देशपांडे व्हेज समोर पुणे सोलापूर हायवेवर चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने इंदापूर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने अपघातग्रस्त झालेल्या ...

शासनाने डॉ. इनामदार यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करावा - डॉ. श्रेणिक शहा

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (५ जुलै) :- अकलूज येथील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ, तसेच अकलूज आयएमएचे संस्थापक डॉ. एम. के. इनामदार यांचे लक्षवेधी कार्य पाहता शासनाने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करावा असे प्रतिपादन समाजभूषण शरद कुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा यांनी केले. 'डॉक्टर डे'चे औचित्य साधून रविवारी (३ जुलै) इंदापूर येथे इंदापूर इंडीयन मेडीकल असोसिएशन, होमिओपॅथिक व आयुर्वेदिक असोसिएशन, पुणे योद्धा ग्रुप, समाजभूषण शरद कुमार माणिकचंद शहा चॅरिटेबल ट्रस्ट आणि आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने "जल है तो कल है", "आपल्या आरोग्याचे शिल्पकार आपणच" या विषयांवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. इनामदार यांचा इंडीयन मानपत्र देऊन, तर इंदापूर मधील डॉक्टरांना देवदूत सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. एम. के. इनामदार हे रुग्णांसाठी देवदूत असून, केवळ शारीरिक उपचारांसाठीच नव्हे तर रुग्णांना मानसिक बळ देणारे डॉक्टर म्हणूनसुद्धा ते प्रसिद्ध आहेत. वैद्यकीय पेशाशी इमानदारी आणि कठोर परिश्रमामुळे ...

नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात, अश्व धावता रिंगण, नाचे विठू काळजात !!! - वाचा भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या रिंगण सोहळ्यातील काही निवडक वैशिष्टे

इमेज
इंदापूर येथे भक्तिमय वातावरणात पार पडले  संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे दुसरे रिंगण समीर सय्यद (उप संपादक) कोरोना संकटामुळे सलग दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा प्रथमच जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दुसरे अश्वरिंगण (गोल) हजारो वैष्णवांच्या आणि लाख मोलाची ही आठवण डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्यासाठी जमलेल्या इंदापूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत शनिवारी (२ जुलै) इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर पार पडले. यावेळी नाम तुकोबाचे घेता, डोले पताका डौलात, अश्व धावता रिंगण, नाचे विठू काळजात!! अशा भावना अश्व रिंगणाचा सोहळा अनुभवणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि इंदापूर ग्रामस्थांच्या मनात होत्या. शुक्रवारी (१ जुलै) निमगाव (ता. इंदापूर) येथील मुक्कामानंतर शनिवारी (२ जुलै) सकाळी ११ वा. ५२ मिनिटांच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे तुकारामांच्या जयघोषात रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी आगमन झाले. विशेष म्हणजे सकाळी सात आठ वाजल्यापासूनच रिंगण सोहळा पाहण्यासाठी रिंगण स्थळावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हजारो नागरिक रयत शाळेच्या इमारतीवर, शेजारी वेगवेगळ्या रहिवाशी संकुलांवर दे...

नेहरू चौक ते पाणदरा दरम्यानचे खड्डे तात्काळ बुजवण्याची गरज

इमेज
खड्डे ठरू शकतात वारकऱ्यांना त्रासदायक; थोड्या पावसातही खड्ड्यांना डबक्यांचे स्वरूप  मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२९ जून) :- पालखी मुक्कामाच्या वादावर पडदा पडल्याने पालखीचा मुक्काम इंदापूर शहरातील नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. पाणदरा आणि नेहरू चौकातून होत पालखी दरवेळी मुक्काम स्थळी जात असते. मात्र पाणदरा आणि नेहरू चौकादरम्यानचा रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय झाला असल्याने हा रस्ता यंदा वारकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचे दिसत आहे. पालखी येण्यास अवघे दोन दिवस बाकी असल्याने पालिका प्रशासनाने तत्परता दाखवत तात्काळ हे खड्डे बुजवण्याची गरज आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी येत्या २ आणि ३ जुलै रोजी इंदापूर मुक्कामी येणार आहे. रिंगण आटोपल्यानंतर पालखीसह हजारो वारकरी अकलूज नाका, रामवेस, कसबा, संभाजी चौक, पाणदरा, नेहरू चौक, खडकपूरा मार्गे हायस्कूलच्या प्रांगणात जात असतात. मात्र पाणदरा ते नेहरू चौकादरम्यानच्या रस्ताचे काम अनेक महिन्यांपासून अपूर्णावस्थेत आहे. अरुंद असलेला अंदाजे १०० मिटर अंतराचा हा रस्ता सध्या पूर्णपणे खड्डेमय अवस्थेत  आ...

इंदापूर येथील पालखीचा मुक्काम नक्की कुठे होणार याबाबत अजूनही अनिश्चितता? देहू संस्थान भूमिका उद्या स्पष्ट करणार

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२७ जून) :- इंदापूर शहरातील पालखी मुक्काम नेमका कुठे होणार याबाबत अद्यापही अनिश्चितता असून, देहू संस्थानाचे विश्वस्त उद्या (२८ जून) पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी (२५ जून) देहू संस्थानाच्या विश्वस्तांना भेटण्यासाठी इंदापूर ग्रामस्थांचे शिष्टमंडळ यवत (ता. दौंड) येथे गेले होते. यावेळी देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्याशी चर्चा झाल्याचे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. त्यामुळे देहू संस्थान उद्या काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी (२४ जून) शासकीय विश्रामगृह या ठिकाणी झालेल्या बैठकीनंतर इंदापूर ग्रामस्थांचे शिष्टमंडळ शनिवारी (२५ जून) देहू संस्थांनाच्या विश्वस्तांना भेटण्यासाठी यवत येथे गेले होते. यावेळी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने ग्रामस्थांची भावना देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्यासमोर स्पष्ट केली होती. मात्र यावर देहू संस्थानाच्या सर्व विश्वस्तांशी चर्चा करून आपण निर्णय देऊ असे स्पष्टीकरण नितीन महाराज मोरे...

इंदापूर ग्रामस्थांचे आज तहसील समोर लाक्षणिक उपोषण, रविवारी मोर्चा; वेळ इंदापूर बंदची येऊ नये हीच अपेक्षा

इमेज
संपादकीय इंदापूर (२३ जून)  :- इंदापूरमध्ये पालखी मुक्कामाच्या स्थळावरून इंदापूर ग्रामस्थ विरुद्ध प्रशासन वाद चांगलाच शिगेला पोहोचला असून, वारकऱ्यांसाठी अनेक दृष्टिकोनातून सोयीस्कर असलेला पारंपरिक पालखी तळ बदलण्याचा निर्णय प्रशासन आणि देहू संस्थानाच्या हेकेखोरपणातून घेण्यात आल्याचा आरोप इंदापूरच्या ग्रामस्थांकडून केला जात आहे. या निर्णयाविरोधात इंदापूर ग्रामस्थांकडून आज (२३ जून) इंदापूर तहसील कार्यालयापुढे एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. तदनंतरही प्रशासनाने भूमिका न बदलल्यास रविवारी (२६ जून) तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आणि आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात पालखी इंदापूर मुक्कामी असताना इंदापूर शहर बंद ठेवण्याचा निर्णय इंदापूर ग्रामस्थांनी जाहीर केला आहे. मात्र या प्रश्नावर योग्य तोडगा निघावा आणि बंदची वेळच येऊ नये अशी अपेक्षा केली जात आहे. प्रशासन आणि देहू संस्थानाने ग्रामस्थांच्या भावनांचा विचार न करता हेकेखोरपणे इंदापूर शहरातील २०० वर्षांचा, तर ७० वर्षांची परंपरा असलेल्या नारायणदास रामदास हायस्कूलमधील पारंपरिक पालखी तळ शहराबाहेरील कचरा डेपो नजीक आयटीआय प्रांगणात नव्याने ...

तर लोक वर्गणीतून प्रती पालखी इंदापूरमध्ये तयार करू; देहू संस्थान अध्यक्षांच्या इशाऱ्यावर इंदापूर ग्रामस्थांचा प्रती इशारा

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२१ जून) :- पालखी मुक्काम स्थळावरून इंदापूरमध्ये रणकंदन माजले असून, देहू संस्थानाच्या अध्यक्षांनी आडमुठी भूमिका घेतल्यास इंदापूरकर लोक वर्गणीतून प्रती पालखी तयार करून इंदापूरमध्ये दोन दिवस पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतील अशी प्रतिक्रिया इंदापूरच्या ग्रामस्थांनी देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्या विधानावर दिली आहे. सोमवारी (२० जून) देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी प्रशासन आणि इंदापूरच्या ग्रामस्थांमध्ये पालखी मुक्कामासंदर्भात तोडगा न निघाल्यास इंदापूरचा पालखी मुक्काम रद्द करून पुढे जाऊ असा इशारा दिला होता. इंदापूर ग्रामस्थांनी आज पालखी मुक्काम संदर्भातील आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात पुणे सोलापूर हायवेवर चक्का जाम करत देहू संस्थानाच्या अध्यक्षांच्या कालच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया दिली आहे. मागील ७० वर्षांपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी इंदापूर शहरातील नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये थांबण्याची परंपरा आहे. यावेळी मात्र प्रशासनाकडून मुक्काम स्थळ बदलण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. परंपरा कायम राहाव...

BIG BREAKING - तर पालखीचा इंदापूर मुक्काम रद्द करून पुढे जाऊ - देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांचे मोठे वक्तव्य

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२० जून) :- इंदापूर शहरातील पालखी मुक्कामाची जागा बदलण्यावरून इंदापूरचे ग्रामस्थ आक्रमक झाले असताना देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पालखीच्या मुक्काम स्थळावरून प्रशासन आणि ग्रामस्थांमधील वाद वेळीच मिटला नाही तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा इंदापूर शहरातील नियोजित मुक्काम आम्हाला रद्द करून पुढे जावे लागेल असे त्यांनी मुत्सुद्देगिरीशी बोलताना म्हटले आहे. असे झाल्यास ही इंदापूरच्या इतिहासाला न शोभणारी व इंदापूरकरांसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट ठरणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात लवकर तोडगा निघणे महत्वाचे ठरणार आहे. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी २ आणि ३ जुलै रोजी इंदापूर मुक्कामी येत आहे. मात्र प्रशासनाने पालखीच्या मुक्कामाची जागा बदलल्याने प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. प्रशासनाने निर्णय न बदलल्यास मंगळवारी (२१ जून) रास्ता रोको, गुरूवारी (२३ जून) इंदापूर तहसील कचेरी समोर लाक्षणिक उपोषण, रविवारी (२६ जून) तहसील कचेरीवर मोर्चा,...

अवैध भिशी प्रकरणात आता भटक्या विमुक्त जमाती संघटना आणि रिपब्लिकन क्रांती सेनेची उडी; गुंतवणूकदार आणि तक्रारदार यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी

इमेज
२७ जून रोजी इंदापूर पोलीस ठाण्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन आणि बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१८ जून) :- अवघ्या महाराष्ट्रात गाजलेल्या इंदापूर शहरातील अवैध भिशी प्रकरणाला जवळपास ५ महिन्यानंतर आता नवे वळण लागले आहे. भिशीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा करून हजारो भिशी धारकांना चुना लावल्याचा आरोप असलेल्या भिशी चालकांबरोबरच आता शासनाची फसवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार आणि गुन्ह्यातील फिर्यादी यांच्यावरही खाजगी सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र राज्य आणि रिपब्लिकन क्रांती सेनेकडून एका निवेदनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणि उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. २० जानेवारी रोजी शिवसेना शहर प्रमुख महादेव सोमवंशी आणि संदीप चित्तरंजन पाटील यांच्या फिर्यादीवरून अनुक्रमे ११ आणि ५ जणांवर इंदापूर पोलीस ठाण्यात १२०/ब, ४०३, ४०८, ४०९ आणि ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता...

नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन

इमेज
  तालुक्यातील हजारो बेरोजगार युवक आणि युवतींना होणार फायदा मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१७ जून) :- इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने युवक आणि युवतींच्या उज्वल भविष्यासाठी शनिवारी (१८ जून) इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवन येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या इंदापूर तालुक्यातील हजारो युवक आणि युवतींना फायदा होणार आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष, तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष गोकुळदास शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा नोकरी महोत्सव पार पडणार आहे. वाढत्या बरोजगारीमुळे युवकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. चांगले शिक्षण आणि गुणवत्ता असूनही अनेक युवक योग्य मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याने बेरोजगारी आणि नैराश्याच्या विळख्यात अडकले आहेत. अशा युवकांसाठी हे नोकरी महोत्सव फायद्याचा ठरणार आहे. शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणाऱ्या या नो...

इंदापूर भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; २० हजारांची लाच घेतल्या प्रकरणी कारवाई

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१५ जून) :- शासनाचा भरमसाठ पगार असूनही हराम कमाईसाठी नागरिकांना नाहक त्रास देणारा इंदापूर भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक (आवक जावक विभाग, उप अधीक्षक कार्यालय) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. काल (१४ जून) सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास झालेल्या या कारवाईमध्ये जमिनीची हद्द कायम करण्याकामी २० हजारांची लाच घेणाऱ्या राजाराम दत्तात्रय शिंदे (रा.  ढोक बाभूळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या लिपिकास २० हजारांची लाच घेतल्या नंतर पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या संदर्भात निंबोडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील शेतकरी ज्ञानदेव संभाजी घोळवे यांनी १० जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ज्ञानदेव संभाजी घोळवे यांच्या चुलत्यांच्या निंबोडी हद्दीत असलेल्या जमिनीची इंदापूर भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक दत्तात्रय शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी मोजणी केली होती. तदनंतर हद्द कायम करण्यासाठी शिंदे यांनी ज्ञानदेव घोळवे यांच्याकडे २५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. शेवटी २० हजारांच्या मोबदल्यात काम क्ल...

हे मुंजा ! हे यमराज ! नवऱ्याला छळणाऱ्या बायकांचं ऐकू नको त्या खोटं बोलत आहेत, या जन्मी नाही, तर पुढच्या जन्मीतरी, अशी बायको देऊ नको - पत्नी पीडित पुरुषांची यमराजकडे मागणी

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१४ जून) :- वट पौर्णिमेच्या सणादिवशी पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पुजा करून ७ जन्म तोच पती मिळावा म्हणून प्रार्थना करत असते. मात्र, आता ही पत्नी आम्हाला ७ सेकंदही नको म्हणून औरंगाबाद येथील पत्नी पिडीत पुरुषांनी वडाच्या झाडाला उलट्या १०८ फेऱ्या मारत यमराजकडे प्रार्थना केली आहे. यावेळी पत्नी पीडित पुरुषांनी ७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको म्हणून घोषणाही दिल्या. दरम्यान, सोमवारी (१३ जून) पत्नीपिडीत पुरुषांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा राज्यभर होत आहे. पिंपळाच्या झाडाला गोल फिरत दोरा बांधून मुंजा असलेल्या पिंपळाच्या झाडाची पूजा या पत्नीपीडित पुरुषांनी केली. पिंपळाच्या झाडाला उलट्या १०८  प्रदक्षिणा घालत पत्नीपीडित पुरुषांकडून नवऱ्यांना  त्रास देणा-या महिलांचा निषेध करण्यात आला. दरम्यान, औरंगाबादच्या वाळूज भागात असलेली पत्नीपीडित नावाची ही संघटना नेहमीच पत्नीच्या छळापासून त्रासलेल्य़ा नवऱ्यांना मदत करण्याचे काम करते. यांच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. हे मुंजा ! हे यमराज आमचे ऐक आम्ही पारा...

समाज विघातक प्रवृत्तीच्या नुपूर शर्मा आणि नविन जिंदाल यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी; इंदापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१३ जून) :- भाजपाच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांनी मुहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा इंदापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करण्यात आला असून, काँग्रेस कमिटीने या दोघांवरही तातडीने कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या संबंधी काँग्रेस कमिटीकडून सोमवारी (१३ जून) इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटीचे इंदापूर तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत, शहराध्यक्ष चमन बागवान, पुणे जिल्हा सरचिटणीस जकीर काझी, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर ,श्रीनिवास शेळके,  महादेव लोंढे सचिव व सदस्य संजय गांधी निराधार योजना, अनूसुचित तालुकाध्यक्ष युवराज गायकवाड, अल्पसंख्याक आघाडीचे नसिर शेख, श्रीनिवास पाटील, तानाजी राऊत आणि ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष आकाश पवार उपस्थित होते. विश्वाला शांती, समता आणि बंधुतेचा संदेश देणारे मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल २७ मे रोजी टाईम नाऊ या वृत्त वाहिनीवर भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल...

इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालये आणि अंगणवाडी इमारतींकरीता ४ कोटी ९१ लाख निधी मंजूर; सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (११ जून) :- इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालये आणि अंगणवाडी इमारतींकरीता तब्बल ४ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. यामध्ये अजोती, लुमेवाडी, सुरवड, कालठण नं.१, भोडणी, व्याहाळी, तरटगाव व खोरोची या गावांचा समावेश असून, या ग्रामपंचायत कार्यालयाकरीता प्रत्येकी १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामांना जिल्हा परिषद स्वनिधी सन २०२२ – २३ अंतर्गत स्व. आर.आर.(आबा) पाटील ग्रामसचिवालय बांधणे या योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे. सोबतच जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत सन २०२२ – २३ अंतर्गत नवीन अंगणवाडी इमारत बांधण्यासाठी ३३ अंगणवाडींकरीता ३ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये चाकाटी, वडापूरी, पवारवस्ती, भाटनिमगाव गावठाण, वरकुटे बु., चितळकरवाडी, रेडणी, कदमवस्ती, कालठण नं.२, गलांडवाडी नं.१, जाधववस्ती, सराटी, गोंदी, ओझरे, हगारेवाडी हनुमानवाडी, भोडणी, भोंगळेवस्ती, बावडा नं.२, कडबनवाडी, काटी शेळके राऊत वस्ती, गंगावळण, लाखेवाडी, थोरवेवस...

मुहम्मद पैगंबर अवमानना प्रकरणी इंदापूर बंदला इंदापूरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद; इंदापूरकर सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या प्रवृत्तींविरोधात असल्याचे स्पष्ट

इमेज
मुस्लिम बांधवांनी मानले सर्व इंदापूरकरांचे आभार; सामाजिक एकोपा दृढ रहावा यासाठी केली प्रार्थना मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क  इंदापूर (११ जून) :- भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांनी मुहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ इंदापूर शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडून शनिवारी (११ जून) इंदापूर शहर बंदची हाक देण्यात आली होती. हा बंद पूर्ण शांततेत पार पडला असून, इंदापूर शहरातील सर्व जाती व धर्मातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी संपूर्ण सहकार्य करत या बंदला उस्फुर्त प्रतिसाद दर्शविला. १००% यशस्वी झालेल्या या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता मुख्य बाजारपेठेसह शहरातील सर्व लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते. भाजपाच्या प्रवक्त्यांनी पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह विधान करून मुस्लिम समाजाच्या नव्हे तर देश व जगभरातील शांतीप्रिय लोकांच्या धार्मिक भावना भडकावून सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसह इंदापूर शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी (१...

शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक काटे यांच्या कार्याचा अखिल भारतीय मराठा महासंघाकडून गुणगौरव

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१० जून) :- संभाजी बिडी वरील संभाजी महाराजांचे नाव हटविण्यात यावे याकरीता यशस्वी आंदोलन करत साबळे वाघिरे कंपनीला गुडघ्यावर आणणाऱ्या, तसेच महापुरुषांच्या नावांचा समावेश नावे व प्रतीके कायदा १९५० अंतर्गत करून महापुरुषांचा होणारा अपमान थांबवा या मागणीसाठी इंदापूर ते मुंबई येथील विधानभवनापर्यंत आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह पायी यात्रा करणारे शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाकडून बुधवारी (८ जून) पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. सदर पुरस्कारासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा युवक अध्यक्ष मयूर आबा सोळसकर यांनी काटे यांची निवड केली. बुधवारी (८ जून) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दौंड तालुका आणि पुरंदर तालुक्याच्या नवनियुक्त कार्यकारणीसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांचा व संस्थांचा गुणगौरव सोहळा केडगाव चौफुला येथील श्री क्षेत्र बोरमलनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अखिल मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत आप्पा पवार, राष्ट्रीय संयुक्त सरचिटण...

मुहम्मद पैगंबर यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या इंदापूर बंदची हाक

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१० जून) :- भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांनी शांततेचे प्रतीक असलेल्या मुहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ इंदापूर शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडून शनिवारी (११ जून) इंदापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. आज (१० जून) सकाळी ११ वाजता दर्गाह मस्जिद चौकात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. तदनंतर मुस्लिम बांधवांनकडून दर्गाह मस्जिद चौक ते इंदापूर प्रशासकीय भवन असा निषेध मोर्चा देखील काढण्यात आला. यावेळी संबंधित विषयावर इंदापूरचे तहसीलदार आणि इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांना निवेदन देण्यात आले. नुपूर शर्मा ह्या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या आहेत. टाइम्स नाऊ चॅनलवरील टीव्ही डिबेटमध्ये त्यांनी मानवजातीचे उद्धारकर्ते व शांततेचे प्रतीक मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. नविन जिंदाल यांनीही त्याचीच री ओढली होती. यावरून संपूर्ण जगभरातून, विशेषतः आखाती देशांतून या वक्तव्याचा मोठ्या प्रमाण...

विधान परिषद - हर्षवर्धन पाटील आज सहाव्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार?

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (९ जून) :- २० जून रोजी १० जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी कालच (८ जून) भाजपने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली होती. मात्र आता भाजप सहाव्या जागेसाठी उमा खापरे यांच्यासह सहावा उमेदवार देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपकडून सहाव्या जागेसाठी हर्षवर्धन पाटील यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती येत आहे. गुप्त मतदानाच्या आधारावर सहा उमेदवार निवडून आणण्याचा भाजपकडून दावा केला जात आहे. बुधवारी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामध्ये प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजपने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली, तर उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना संधी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. माजी मंत्री राम शिंदे यांनाही भाजपने संधी दिली आहे. यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचे नाव वगळण्यात आल्याने इंदापूर तालुक्यातील पाटील समर्थकांमध्ये नाराजी, तर विरोधकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र पाटील यांनी काल माध्यमांना, 'कार्यकर्त्यांनो जोमाने कामाला लागा भाजपमध्ये सर्...

न्यायप्रविष्ट प्रकरणात हस्तक्षेप करून अल्पसंख्यांक समाजावर अन्याय करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी - इंदापूर एमआयएमची मागणी

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (८ जून) :- प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही पोलीस प्रशासनाच्या मदतीने हुकूमशाही पद्धतीने अकलूज येथील अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांची घरे उध्वस्त करण्याच्या पापात सहभागी नीरा उजवा कालवा पाटबंधारे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंदापूर येथील एआयएमआयएम पक्षाकडून करण्यात आली आहे संबंधित मागणीचे निवेदन सोमवारी (६ जून) इंदापूर तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले. यावेळी पक्षाचे इंदापूर युवक शहराध्यक्ष आझम खान पठाण, अख्तर मुलाणी, अरबाज पठाण, शाहिद शेख, स्वालेद कोरबू, सैफअली पठाण, सलीम पठाण आणि अक्रम जहागिरदार उपस्थित होते. आनंदनगर-गिरमेवस्ती (अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील नऊचारी भागात नीरा उजवा कालवा पाटबंधारे विभागाने शुक्रवारी (३ जून) कारवाई करत सदर भागात राहणाऱ्या सय्यद साहेबलाल शेख, आणि अल्लाबक्ष साहेबलाल शेख यांचे राहते घर जमीनदोस्त केले. त्यामुळे जवळपास १५ सदस्य असलेली अल्पसंख्यांक समाजातील दोन कुटुंबे ऐन पावसाळ्यात उघड्यावर आली आहेत. विशेष म्हणजे सदर प्रकरण माळशिरस येथील न्यायालय...

काँग्रेसमध्ये होते खास भाजपमध्ये अजूनही वेट ॲण्ड वॉच; विधान परिषदेसाठी भाजपने हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा डावलले

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (८ जून) :- आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना भाजपने पुन्हा एकदा डावलल्याने 'काँग्रेसमध्ये होते खास भाजपमध्ये अजूनही वेट ॲण्ड वॉच' अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. २० जून रोजी १० जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने बड्या नेत्यांना डावलत अनपेक्षितरित्या भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा व गोपीनाथ मुंडे यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या उमा खापरे आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस तसेच देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना संधी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तर कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे आणि विरोधी पक्षनेते म्हणून प्रवीण दरेकर, तसेच प्रसाद लाड यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. जुलै महिन्यात रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपचे एकूण संख्याबळ पाहता ४ उमेदवार सहज निवडून येथील अशी परिस्थिती आहे. मात्र भाजपकडून ५ उमेदवार दिले जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. पैकी हर्षवर्धन पाटील यांचे नाव आघाडीवर असल्य...