इंदापूरमध्ये प्रथमच लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
आजपासून स्पर्धेला सुरुवात; राजवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२० फेब्रुवारी) :- इंदापूर शहरात लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत असून, इंदापूर शहरात पहिल्यांदाच पार पाडणारी ही स्पर्धा शहर व तालुक्यातील क्रिकेट शौकिनांसाठी मेजवानी ठरणार आहे. १७ वर्षाखालील, तथा महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या खेळाडूंचा सहभाग असणारे एकूण ८ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सकाळी ९ वाजता भाजप कोअर कमिटीचे तालुकाप्रमुख, तथा निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. इंदापूर येथील प्रांजली स्पोर्ट्स ॲकॅडमी आयोजित या स्पर्धेमध्ये आरसीसी (उस्मानाबाद), बिटीसीए (बार्शी), बिसीए (सोलापूर), पीएसए चॅलेंजर्स (इंदापूर), एसजे (इंदापूर), पीएसए टायटन्स (इंदापूर), पीएसए नाईट रायडर्स (इंदापूर) आणि पीएसए सुपर किंग्ज (इंदापूर) असे आठ संघ सहभागी होणार आहेत. या सर्व संघांमध्ये इंदापूरसह, सांगोला, मंगळवेढा, अहमदनगर, पुणे, मुंबई, अकलूज, पंढरपूर, बार्शी, मोडलिंब आणि सोलापूर येथून खेळाडू आपल्या खेळ...