पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदापूर शासकीय कार्यालये सामान्यांच्या लुटीचे केंद्र? महसूल विभागातील महिला कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

इमेज
२ ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; स्वतः आणि साहेबांसाठी मागितली होती लाच मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क  शासनाचा भरमसाठ पगार असूनही हरामच्या कमाईसाठी शेतकऱ्याला लाच मागणारी इंदापूर महसूल विभागातील लाचखोर महिला कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) दुपारी झालेल्या या कारवाईमध्ये शेतातील रस्त्याच्या प्रलंबित प्रकरणातील कागदपत्रे फिर्यादीला देण्यासाठी २५ हजारांची लाच मागणाऱ्या महसूल विभागात महसूल सहाय्यक पदावर कार्यरत कावेरी विजय खाडे (रा. संघवी नगर, बारामती, जि. पुणे) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या संदर्भात भांडगाव (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील शेतकरी हनुमंत अनिल मदने यांनी २७ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा याकामी फिर्यादीच्या वडिलांनी इंदापूर तहसीलमध्ये २७ जानेवारी २०२० रोजी अर्ज केला होता. या प्रलंबित प्रकरणाच्या निकालाशी निगडित कागदपत्रे बनवून देण्यासाठी खाडे बाईंनी मदने यांच्याकडे ३० हजारांची लाच मगितली होती, जी नंतर २५ हजारांवर डन झाली. मदने यांनी तक...

दिव्य कुरआनातील आदेशाला मूर्त स्वरूप - इंदापूर शहरात मस्जिदमध्ये सुरू झाली अभ्यासिका

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क (समीर सय्यद) इंदापूर (२६ फेब्रुवारी) - दिव्य कुरआनातील इकरअ अर्थात "वाच आपल्या पालनकर्त्याच्या नावाने ज्याने तुला निर्माण केले" या आयतीपासून प्रेरित होऊन इंदापूरमधील मुस्लिमांनी एका अनोख्या, परंतु इस्लाम इतक्याच पुरातन, तथा मुहम्मद पैगंबरांनी मस्जिदे नबवीमध्ये राबविलेल्या आदर्श उपक्रमाला नव्याने सुरुवात केली आहे. इंदापूर शहरातील शेख मोहल्ला स्थित मक्का मस्जिदमध्ये मुस्लिम युवकांसाठी 'इकरअ' या नावाने अभ्यासिका सुरू करण्यात आली. त्यामुळे इंदापूर शहरातील मुस्लिम युवकांना आता मक्का मस्जिदमध्ये आध्यात्मिक आणि आदर्श इस्लामी संस्कारांबरोबरच आधुनिक शिक्षणही घेता येणार आहे. मस्जिदशी संलग्न जवळपास ७५० स्के.फू. जागेतील या अभ्यासिकेत एकाच वेळी २० पेक्षा जास्त मुस्लिम युवक भविष्य घडविण्यासाठी ज्ञानार्जन करू शकणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी या स्टडी सेंटरचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी असोसिएशन, पुणे जिल्ह्याचे पदाधिकारी व राष्ट्रपती पदक प्राप्त निवृत्त एसीपी जानमोहम्मद पठाण, निवृत्त सहाय्यक प...