पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदापूर तालुक्यातील ३ वाळू तस्कर तडीपार; ५०-६० गुन्हेगार पोलीसांच्या हिटलिस्टवर

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक) इंदापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर ऍक्शन मूडमध्ये आले असून, इंदापूर तालुक्यातील ३ वाळू तस्करांना इंदापूर तालुक्यासह दौंड, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड तालुक्यातून पुढील सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेला बाधक ठरू शकणाऱ्या  इंदापूर तालुक्यातील जवळपास ५०-६० गुन्हेगारांची कुंडली इंदापूर पोलीसांनी तयार केली असून, यांच्यावर लवकरच तडीपार अथवा मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे इंदापूर पोलीसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे. इंदापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उजनी जलाशयातून रात्री अपरात्री बेकायदा वाळू तस्करी तसेच गावातील व तालुक्यातील लोकांना गोळा करून मारमारी करण्यासारख्या व अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमुळे योगेश नंदु जगताप (वय २८ वर्षे, रा. हिंगणगाव, ता. इंदापुर जि. पुणे, टोळी प्रमुख), सौदागर बाळासाहेब ननवरे (वय २९ वर्षे, रा. कांदलगाव ता. इंदापुर जि.पुणे, टोळी सदस्य), सुरक्षित वंसत रांखुडे (वय ...

रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या जखमीसाठी डॉक्टरांचा नाही तर पोलीसांचा जीव तळमळताना मी पाहिला

इमेज
इंदापूर पोलीस ठाणे २७ ऑगस्ट २०२१, शुक्रवार, वेळ सायंकाळ ७ ते ७:१५  च्या दरम्यान, ठिकाण लोणी देवकर. पुलावर तिघेजण गाडीच्या प्रतीक्षेत उभे. अचानक एका ब्रेकफेल झालेल्या ट्रकने होत्याचे नव्हते केले. उभ्या असलेल्या तिघांपैकी दोन जण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमींचा पाय मांडीमधून तुटून मांडीचे हाड बाहेर निघालेले. रक्तबंबाळ अवस्थेत रात्री ८ च्या आसपास सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पैकी एक तरुण माझा गाळेधारक असल्याने मी त्या ठिकाणी गेलो. मृताची ओळख पटवण्यासाठी पोलीसांनी मला बघण्यास सांगितले. मी दोन बॉडी पाहिल्या त्यामध्ये एक माझा गाळेधारक विजय बबन शिंदे तरुण व्यावसायिक याला मी ओळखले. पण दोघांची ओळख पटवण्यात सर्वच जण अपयशी ठरले. वेळ निघून जात होती. रात्री ८ च्या दरम्यान आलेल्या जखमीवर प्रथमोपचार झाले. फक्त ड्रेसिंग बरं का. दुसरे काहीही नाही. पुढच्या इलाजासाठी त्याला रात्री १२ - १ वाजेपर्यंत वाट पाहायला लागली असावी. इलाज पण नाही ऍम्ब्युलन पण नाही. रुग्ण तडपडत होता. पोलीस प्रशासनामध्ये तीन कर्तबगार पोलीस अधिकारी श्री. महेश माने साहेब, श्री. आटोळे साहेब, श्री. विक्रमसिंह जाधव स...

सोशल मीडियाच्या आभासी जगाचे वास्तव

इमेज
सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्या हातात आणून ठेवले असून, कोणत्याही क्षणी हव्या त्या पद्धतीने व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य, मनातील असंख्य भावना दुसऱ्यापर्यंत पोहचवण्यासाठीचे व्यासपीठ आणि तंत्रज्ञान आपणास सोशल मीडियामुळे मिळाले. पण शेवटी आहे हे तंत्रज्ञानच ना ! तंत्रज्ञानाचा वापर आपण कशा पद्धतीने आणि कोणत्या हेतूसाठी करतो, यावर त्याची उपयोगिता ठरते. केवळ थ्रिल अनुभवायच्या नादात सोशल मीडियाच्या आभासी जगण्यावर भाळल्यास आयुष्याचे प्रचंड नुकसान होते. आता हेच बघा ना की काही वर्षांपूर्वीपर्यंत निवडणुकांच्या वेळेस राजकीय पक्षांचे कार्यकर्ते घराघरात जाऊन प्रचार करायचे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटी व्हायच्या; पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपासून पूर्ण चित्रच पालटले. २०१४ मध्ये भारतात जवळपास ८ कोटी जनतेकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध होती. २०१८ मध्ये ती वाढून जवळपास ६५ कोटीपर्यंत पोहोचली. आज देशातल्या एकूण ९०% लोकांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप आहे. नेमका हाच मुद्दा लक्षात घेऊन राजकीय लोकांनी याचा फायदा घेतला. आज कोट्यावधी लोकांच्या हातात फेसबुक, ट्रिटर, व्हॉट्सअप इ. सारखे तंत्रज्ञान आले. पण यावर येणारी प्रत्येक गो...

लोणी देवकर पुलावर अपघात; खुळे चौकातील २३ वर्षीय व्यावसायिकासह एकजण ठार तर एक जखमी

इमेज
अपघातात ठार झालेला २३ वर्षीय युवक विजय शिंदे उपजिल्हा रुग्णालयाला स्वतःची रुग्णवाहिका नाही? राज्यमंत्र्यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर दिलेली रुग्णवाहिका गेली कुठे? समीर सय्यद (उपसंपादक) लोणी देवकर - पुणे सोलापूर हायवेवरील लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील पुलावर आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या आसपास झालेल्या अपघातामध्ये इंदापूर शहरातील खुळे चौकातील २३ वर्षीय व्यावसायिकासह एकजण ठार तर एकजण जबर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव विजय बबन शिंदे (वय २३, मुळ गाव बेळवंडी, ता. कर्जत, सध्या राहणार चांडगाव, ता. इंदापूर) असून, तो इंदापूर शहरातील खुळे चौकात तिरुपती स्टील आर्ट्सचे दुकान चालवत होता. या अपघातात दुसऱ्या मयत व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नसून, जखमी झालेला एका व्यक्तीचे नाव किशोर अशोक सपकळ (रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे असल्याचे पोलीसांनी सांगितले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे तिघेही पुण्याला जाण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत लोणी देवकरच्या पुलावर थांबले असताना सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका ट्रकने (MH 16 CC 9...

प्रेयसीला भेटता येत नाही म्हणून गळा चिरला; पण भिगवण पोलीसांनी त्याला २४ तासात पकडला.

इमेज
गळा चिरून खून करण्यात आलेला युवक महेश चव्हाण   नुकताच भिगवण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली कोणतेही पुरावे उपलब्ध नसताना, भिगवण पोलीसांनी अवघ्या २४ तासांत, गळा चिरून करण्यात आलेल्या खुनाचा छडा लावत दोघा आरोपींना अटक करण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. प्रेमप्रकरणातून झालेल्या खुनाप्रकरणी भिगवण पोलीसांनी अनिकेत उर्फ बबलु विकास शिंदे व गणेश हनुमत शिंदे (दोघेही रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) यांना अटक केली आहे. मंगळवारी (२४ ऑगस्ट) सकाळी १० च्या सुमारास भादलवाडी गावाचे हद्दीत निरा-भिमा नदी जोड प्रकल्प येथील डंपिग यार्डमध्ये दगडांच्या ढिगाऱ्यावर एका अनोळखी युवकाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला होता. चौकशीअंती तो मृतदेह महेश दत्तात्रय चव्हाण (वय ३४, रा. रावणगाव, एरीगेशन कॉलनी, कांबळेवस्ती, ता. दौंड, जि. पुणे) या युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले होते. हे देखील वाचा - पोलीसांच्या अंगावर वाळू तस्करांनी ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा केला प्रयत्न सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी, खुनाचा छडा लावण्यासाठी भिगवण पोलीसांच्या ३ वेगवेगळ्...

साहेब ! शेती परवडंना, गांजा लावायची परवानगी द्या; शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांना नम्र विनंती

इमेज
गांजा लागवड कायद्याने अपराध शासन शेतमालाला हमीभाव देत नसल्याने कवडीमोल विकाव्या लागत असलेल्या शेतीमालामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शिरापूर (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील अनिल आबाजी पाटील या शेतकऱ्याने अक्षरशः दोन एकर कायद्याने बंदी असलेल्या गांजाची लागवड करण्याची सशर्त परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. ही मागणी शेतकऱ्यांमधील नैराश्याची भावना दर्शवत आहे. पाटील यांची शिरापूर येथे (गट नं. १८१/४) जमीन असून, कोणतंही पीक घेतले तरी शेतीमालाला शासन हमीभाव देत नसल्याने शेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण देत त्यांनी ही मागणी बुधवारी (२५ ऑगस्ट) जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. हे देखील वाचा - वाळू तस्करी पोलीसांच्या जीवावर; ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न मशागतीसाठी केलेला खर्चही निघत नाही, उसाच्या बिलालाही वर्ष वर्ष वाट बघावी लागत असल्याने गांजा लावण्याखेरीज आता दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबर पर्यंत दोन एकर गांजा लागवड करण्यास परवानगी न दिल्यास १६ सप्टेंबर रोजी प्रशासनाने परवानगी दिली असे गृहीत धरून गांजा लागव...

टेंभुर्णी - बेमाप पैशांनी वाळू तस्करांची वाढली हिम्मत; वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलीसांच्याच अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

इमेज
वाळू तस्कराने पोलीसांच्या अंगावर घातलेला ट्रॅक्टर एक पोलीस कर्मचारी जखमी, एकाला अटक तर दोघे फरार भीमा नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना वाळू तस्करांनी ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार टाकळी टें (ता. माढा, जि. सोलापूर) येथे बुधवारच्या मध्यरात्री घडला. तुकाराम माने-देशमुख असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नांव असून, ट्रॅक्टर चालक महादेव लक्ष्मण शेळके, सुधीर सोरटे व ट्रॅक्टर मालक समाधान जरक यांच्याविरोधात ३०७, ३५३, ३७९ अशा विविध कलमान्वये टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी मध्यरात्री भीमा नदीच्या पात्रातून वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीसांना मिळाली होती. या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी पोलीस शिपाई तुकाराम माने-देशमुख व बाळराजे घाडगे हे टाकळी (टें) येथील महादेव मंदिराच्या नजीक जाऊन थांबले होते.  अवघ्या २ वर्षांच्या या निरागस मुलीची काय चूक? का आणि कोणी फेकलं असेल तिला बेवारस मरण्यासाठी? अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर घ...

या निरागस मुलीचा मृत्यू कसा झाला असेल? हत्या आहे का अन्य काही? स्थानिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा

इमेज
ओढ्यानजीक मृतावस्थेत आढळलेली २-३ वर्ष वयाची मुलगी आज  (२५ ऑगस्ट) सरडेवाडी (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीतील बामणस्थळ ओढ्याच्या कडेला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका २-३ वर्षाच्या अनोळखी मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मुलीची ओळख पटली नसून, ती स्थानिक परिसरातील नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत सरडेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम किसन जानकर यांनी दिलेल्या माहितीआधारे इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात मयत व अनैसर्गिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली आहे. जनावरे चरवण्यासाठी ओढ्याच्या कडेला गेलेल्या स्थानिक रहिवाशांना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही मुलगी ओढ्याकडेला मृतावस्थेत आढळून आली होती. दरम्यान, सोमनाथ कोळेकर यांनी याबाबत फोनवरून सरडेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम जानकर यांना माहिती देताच त्यांनी उपसरपंच हनुमंत जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य सतिश चित्राव, रवींद्र सरडे यांच्यासमवेत घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली व त्वरित इंदापूर पोलीसांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान, घटना स्थळी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अविनाश बोरसे, विनोद पवार, टोल...

इंदापूर पोलीसांनो गोळ्या घाला - आंदोलन दडपल्याने प्रभाकर देशमुखांचा राग अनावर

इमेज
जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन दडपतानाचा इंदापूर पोलीस इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे डीपी सोडवून वीजपंपाची वीज खंडित करण्याच्या महावितरणच्या कारवाईविरोधात महावितरण कार्यालयासमोर आज हलगीनाद आंदोलनाची भूमिका घेणाऱ्या जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन इंदापूर पोलीसांनी अवघ्या १५ मिनिटांत उधळून लावले. यावेळी प्रभाकर देशमुख आणि जनहितचे ओमराजे कदम, रविराज काळे, अजय कदम या कार्यकर्त्यांना पोलीसांकडून जबरदस्तीने आंदोलनाच्या ठिकाणाहून इंदापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महावितरण अधिकाऱ्यांच्या सूचना आणि आश्वासने मान्य न झाल्याने देशमुख यांनी महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलनाला बसण्याची भूमिका घेतली होती. पोलीस आंदोलकांची धरपकड करत असताना पहिलेच आंदोलन असलेले इंदापूर तालुक्यातील जनहितचे कार्यकर्ते मात्र चांगलेच भांबावलेल्या अवस्थेत दिसले.  आंदोलनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा यावेळी उपस्थित होता. दरम्यान, पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना जबरदस्तीने ओढत पोलीस वाहनात बसवले. यावेळी प्रभाकर देशमुख यांचा राग अनावर झाल्याचे दिसले. यावेळी त्यांनी, आमचे आंदोलन लोकश...

महावितरण कार्यालयापुढे शेतकऱ्यांचे हलगीनाद आंदोलन

इमेज
महावितरण अधिकारी रघुनाथ गोफणे यांना आंदोलन व मागण्यांचे निवेदन देताना जनहित शेतकरी संघटनेचे पदाधिकारी इंदापूर तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असतानाही महावितरण शेतकऱ्यांना दुय्यम नागरिकाप्रमाणे वागणूक देत बेकायदेशीररित्या डीपी सोडवून शेतीपंपाची वीज खंडित करत शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ करत असून, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकू येत नसलेल्या महावितरण अधिकाऱ्यांच्या बसलेल्या कानठळ्या उघडण्यासाठी जनहित शेतकरी संघटना येत्या मंगळवारी (२४ ऑगस्ट) इंदापूरच्या महावितरण कार्यालयासमोर हलग्या वाजवत हलगीनाद आंदोलन छेडणार आहे. शुक्रवारी (२० ऑगस्ट) तहसील कार्यालयात तहसीलदार आणि महावितरणाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेली चर्चा फिस्कटल्यानंतर जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरभैय्या देशमुख यांनी या आंदोलनाची घोषणा केली. महावितरण डीपी सोडवून वीजबिल वसुलीसाठी तगादा लावत असून, घर आणि घराचे वासेही फिरलेल्या शेतकऱ्यांवरील या कारवाईच्या निषेधार्थ शुक्रवारी (२० ऑगस्ट) जनहित शेतकरी संघटनेने इंदापूर महावितरण कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन छेडले होते. दरम्यान, तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या उपस्थितीत महावितरण...

बिग ब्रेकिंग - धन्यकुमार गोडसे यांची बदली; आर्थिक तडजोडीशिवाय यावा नवा अधिकारी

इमेज
पोलीस निरीक्षक धन्यकुमार चांगदेव गोडसे समीर सय्यद (उपसंपादक) इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार चांगदेव गोडसे यांची बदली करण्यात आली असून, त्यांची नियुक्ती आता सोलापूर ग्रामीणला करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. त्यांनी जानेवारी (२०२१) महिन्यात इंदापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. तत्पूर्वी त्यांच्याकडे बारामती विभागाच्या वाहतूक शाखेचा पदभार होता. त्यांनी मागील काही दिवसांत वाळू माफियांवर धडक कारवाई करत उडवलेल्या जवळपास १९ यांत्रिक बोटी तालुक्यात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. त्यांच्या या धडक आणि धाडसी कारवाया त्यांच्या बदलीचा संकेत असल्याची कुजबुज शहरात काही दिवसांपासून सुरू होती. इंदापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी गणेश पवार टोळीतील पाच जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करत गुन्हेगारांना 'हद मे रहो' असा इशारा दिला होता. विशेष म्हणजे इंदापूर शहराच्या इतिहासात मोक्का कायद्यानंतर्गत कारवाई झाल्याची ही पहिलीच घटना होती. उजनी पाणी प्रश्नावरून विना परवानगी इंदापूर तहसील कचेरीसमोर जनहित शेतकरी संघटनेचे होणारे आ...

इंदापूरकरांची सवय श्रीकांत पाटील मोडतील?

इमेज
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा झेंडा फडकवून आपल्या दुसऱ्या इनिंगची सुरुवात करणारे तहसीलदार श्रीकांत पाटील पहिल्या इनिंगमध्ये इंदापूर तालुक्यातील वाळू आणि गौण खनिज माफियांचा कर्दनकाळ ठरलेले श्रीकांत कल्लप्पा पाटील यांनी इंदापूर तहसीलवर भारतीय स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकावण्याआधीच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेल्या उपोषणाचा तिढा सोडवून आपल्या दुसऱ्या इनिंगचा झेंडा दिमाखात फडकवला असून, आज सुरू झालेल्या त्यांच्या दुसऱ्या इनिंगबाबत सामान्यांना बऱ्याच आशा आहेत. पाटील येणार हे निश्चित झाल्यानंतर अनेकांनी साखर वाटून आनंद साजरा केला, तर अनेक वाळू माफियांचा आराम हराम झाल्याचे बोलले जात असून, यांचाच काळ सुखाचा असतो असंही काही वाळू माफियांचं म्हणणं असल्याच्या संमिश्र चर्चा अधून मधून कानावर येत आहेत. वायरल झालेली ऑडिओ क्लिप, भिगवण येथील कारवाईची आरोपात्मक चर्चा, रस्त्यांच्या वहिवाटीसंदर्भातील प्रकरणांमध्ये दिरंगाई, असे अपवादात्मक आरोप वगळता 'शासकीय काम सहा महिने थांब' या म्हणीला खोटं ठरवून इंदापूर तहसील कार्यालय लोकाभिमुख करणारा, प्रशासनावर वचक ठेवणारा, सामाजिक कामात सहभागी होणारा, ...

कर्ज वसुली अधिकाऱ्यांनो सावधान ! शेतकरी संघटना तुम्हाला झोडपायच्या तयारीत

इमेज
विभागीय आयुक्त जयश्री कटारिया यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी वसुली अधिकारी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याची शेतकरी संघटनेची मागणी कोरोनाकाळातील एकंदरीत परिस्थिती आणि वित्तीय संस्थांनी शेतकऱ्यांच्या मागे लावलेल्या कर्ज वसुलीच्या तगाद्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. वित्तीय संस्थांनी कर्ज वसुलीचा तगादा थांबवला नाही तर शेतकरी संघटना वसुली अधिकाऱ्यांना झोडपून काढेल असा इशारा शेतकरी संघटनेने दिला असून, या आणीबाणीच्या परिस्थितीला सर्वस्वी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील असेही शेतकरी संघटनेने विभागीय आयुक्तांना बुधवारी (११ ऑगस्ट) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सद्याची हलाकीची परिस्थिती आणि वित्तीय संस्थांचा कर्जवसुलीचा तगादा अशा दुधारी तलवारीखाली मान असलेल्या शेतकऱ्यांना निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह सर्वच पक्षीय नेत्यांनी कर्जमाफीची दिलेली आश्वासने न पाळून शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत ढकलले असून, वित्तीय संस्थांनी जबरदस्तीने चालवलेली कर्ज वसुली अन्यायकारक आहे. मुदतीच्या कायद्याचा विचार केल्यास कालबाह्य झालेले...