पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महिलांनो ! एसटीने इंदापूर-पुणे, इंदापूर-अकलूज प्रवास करताय? असाल तर आपले दागिने सांभाळा.

इमेज
इंदापूर-पुणे, इंदापूर-अकलूज एसटीने प्रवासादरम्यान चोरीच्या दोन घटना; एकूण ७ लाख १५ हजारांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास चेतन चव्हाण (संपादक) इंदापूर (२७ फेब्रुवारी) :- २३ आणि २४ फेब्रुवारी या दोन दिवसांत झालेल्या चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पुणे-इंदापूर आणि इंदापूर-अकलूज दरम्यान एसटीने प्रवास करणाऱ्या दोघा महिला प्रवाशांचे तब्बल ७ लाख १५ हजार रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने, महिलांनो ! एसटीतून प्रवास करताय? मग आपले दागिने सांभाळा असे म्हणण्याची वेळ आली आहे. २३ तारखेला दुपारी इंदापूर-अकलूज असा प्रवास करणाऱ्या ५५ वर्षीय शामा चंद्रकांत कुंभार (रा. यशवंतनगर अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी रुमालात बांधून आपल्या पर्समध्ये ठेवलेले तब्बल २ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने इंदापूर अकलूज दरम्यान अज्ञात चोरट्याने लंपास केले. तर २४ तारखेच्या इंदापूर येथील आपल्या भाच्याच्या बारशासाठी स्वारगेट-इंदापूर असा दुपारी एसटीने (एम-एच-२०-बीएल-४१४७) प्रवास करणाऱ्या नेहा नितीन पवार (रा. स्वारगेट, बिबेवाडी, पुणे) या ३६ वर्षीय महिलेचे बॅगेत ठेवलेले तब्बल ४ लाख ७० हजार ४०० रुप...

ग्रामदैवत इंद्रेश्वराची ग्रामयात्रा व रथोत्सव कार्यक्रमाला आजपासून सुरुवात; मंदिराशी निगडित खालील वैशिष्ठे इंदापूरकरांना माहीतच हवीत

इमेज
समीर सय्यद (उप संपादक) ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या इंदापूर शहरातील प्राचीन मंदिर आणि ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर महादेवाची ग्रामयात्रा व भव्य रथोत्सव सोहळ्याला आजपासून (२६ फेब्रुवारी) सुरुवात झाली असून, हा सोहळा २ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पुढील चार दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे इंद्रेश्वर मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र वाशिंबेकर यांनी म्हटले आहे. यामधे पुजन, भजन, बालवर्ग, रथोत्सव, सवाद्य मिरवणूक, नगरभ्रमण, आरती व प्रसाद, किर्तन, महाप्रसाद, असे वेगवगळे कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. २०१७-१८ साली लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोध्दार केल्यानंतर महादेवाची ग्रामयात्रा व रथोत्सव आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली होती. ग्रामयात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे रथोत्सव तथा नगरभ्रमण. महादेवाची पंचमुखी चांदीची मूर्ती आणि संपूर्ण फुलांनी सजवलेल्या आकर्षक लाकडी रथासह हजारो नागरिक संपूर्ण शहरातून भ्रमंती करतात. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी निघणाऱ्या य...

ती उसाने भरलेली ट्रॉली विद्यार्थ्यांच्या अंगावर पडली असती तर? इंदापूर शहरातून धोकादायक पद्धतीने होणाऱ्या ऊस वाहतुकीवर प्रश्नचिन्ह.

इमेज
समीर सय्यद (उप संपादक) इंदापूर (२१ फेब्रुवारी) :- ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची उसाने भरलेली ट्रॉली एका चारचाकीवर उलटल्याने चारचाकीचा चुराडा झाला. सुदैव गाडीत कोणी नव्हतं. अंदाजे १०-१५ टन उसाने भरलेली ही ट्रॉली नागरिक अथवा विद्यार्थ्यांच्या अंगावर पडली नाही हे नशीबच. मात्र पडली असती तर? हा विचार न केलेलाच बरा . रविवारच्या (२० फेब्रुवारी) मध्यरात्री दूरसंचार निगम (टेलिफोन एक्सचेंज) कार्यालयासमोर घडलेल्या या घटनेनंतर इंदापूर शहरातून प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि कारवाई अभावी वाहतुकीच्या नियमांची बँड वाजवत नियमबाह्य व धोकादायक पद्धतीने सुरू असलेली ऊस वाहतूक शहराबाहेरून वळवणे गरजेचे असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. नियमबाह्य पद्धतीने क्षमतेपेक्षा जास्त व धोकादायक पद्धतीने ऊस वाहतुक होत असतानाही प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यामागचे नमके कारण काय असा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागला आहे. इंदापूर शहरातून जाणाऱ्या पुणे सोलापूर हायवेवरील टेलिफोन एक्सचेंजपासून संविधान चौकापर्यंतच्या भागात अनेक शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, न्यायालय, खाजगी व शासकीय दवाखाने, बसस्थानक, व्यापारी गाळे आणि ...

इंदापूर पंचायत समितीमधील महिला कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; यशवंत घरकुल योजनेच्या मंजुरीचा चेक सुपूर्द करण्याच्या मोबदल्यात केली होती ५०० रुपयांची मागणी

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१९ फेब्रुवारी) :- शासनाचा भरमसाठ पगार असूनही अवघ्या ५०० रुपयांच्या मोहापाई इंदापूर पंचायत समितीमधील समाज कल्याण विभागातील कनिष्ठ सहाय्यक पदावर काम करणारी महिला कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली आहे. अश्विनी गणेश भोंग (वय ३६ वर्ष, रा. सरस्वतीनगर, क्रिडा संकुल रोड, इंदापूर) या महिला कर्मचाऱ्याला शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचुन रंगेहात पकडले असून, शासनाकडून मंजूर झालेल्या यशवंत घरकुल योजनेचा २० हजारांचा चेक सुपूर्द करण्याच्या मोबदल्यात या महिला कर्मचाऱ्याने हनुमंत किसन माने (वय ३३ वर्ष, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) यांना ५००  रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात हनुमंत किसन माने यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे) यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) सापळा रचुन अश्विनी गणेश भोंग यांना दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान ५०० रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी हनुमंत माने यांच्या फिर्यादीवरून अश्विनी भोंग यां...

फिरोजखान पठाण... सामाजिक कार्याच्या माध्यमातून उभरतं युवा नेतृत्व

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१८ फेब्रुवारी) :- सामाजिक कार्याच्या माध्यमातून इंदापूर शहरातील एक उभरतं युवा नेतृत्व म्हणजे टिपू सुलतान यंग सर्कल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष फिरोजखान लियाकत पठाण. ह्या संवेदनशील आणि सामाजिक भान असणाऱ्या कृतिशील युवा नेतृत्वाचा गुरुवारी (१७ फेब्रुवारी) ३० वा वाढदिवस साजरा झाला. आजच्या कलयुगात समाज उद्घाराच्या साऱ्या संकल्पना प्रसिद्धीच्या बाजारात मातीमोल ठरत असताना, लोकं स्वहित साधून मोकळे होत असताना काही माणसं वर्तमानाशी दोन हात करत समाजासाठी पुढे येतात. प्रसिद्धी पासून दूर राहतात. तत्वनिष्ठा महत्वाची मानून पुढे चालतात. अशांपैकीच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे फिरोजखान पठाण. आजोबा रशिदखान पठाण स्वातंत्र्यसैनिक, तर वडील लियाकत पठाण हे माजी नगरसेवक. त्यामुळे साहजिकच फिरोज पठाण यांना परंपरागत देशसेवेचा आणि समाजोपयोगी कामाचा वारसा मिळाला.  समाजोपयोगी कामे करता यावी या उद्देशाने २००८ साली स्थापन केलेल्या टिपू सुलतान यंग सर्कल या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून फिरोजखान पठाण यांनी अनेक समाजोपयोगी कामांना मूर्त स्वरूप दिले. यामध्ये प्रामुख्याने महा...

आज परत एकदा सूर्य उगवलाय... नामदेव ढसाळ यांच्या जयंतीनिमित्त लेखिका स्वाती चव्हाण यांनी नामदेव ढसाळ यांना समर्पित केलेली कविता

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क नामदेव लक्ष्मण ढसाळ (जन्मः फेब्रुवारी १५, इ.स. १९४९, पुणे जिल्हा) मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते आहेत. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले आहे.दलितांचे,शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला हा सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार आहे. त्यांनी दलित पँथर ही सशस्त्र संघटना १९७२ मध्ये सुरू केली.१९७३ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह गोलपीठा प्रकाशित झाला. यानंतर आणखी कवितासंग्रह मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले, तुझी इयत्ता कंची?, खेळ, आणि प्रियदर्शीनी प्रसिद्ध झाले. आपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणार्‍या आणि भाषिक दृष्टया प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा वापरून मराठीला समृद्ध करणार्‍या मोजक्या साहित्यिकांपैकी एक प्रतिभाशाली कवी. नामदेव ढसाळांच्या कविता ह्या सत्य परिस्थितीवर कडक  जहाल असे ताशेरे ओढणाऱ्या आहेत,  ढसाळांची लेखणी वरण भातावर पसरवलेल्या साजूक तुपासारखी नसून गोफणगुंडय़ातून सणसणत सुटणारे गोट्यांसाट्यांसारखी आहे. ती एका चळवळीची,...

घोडे बाजार इंदापूरात चर्चा मात्र देशभरात; जाणून घ्या पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडे बाजाराची ठळक वैशष्ट्ये

इमेज
समीर सय्यद (मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क) इंदापूरमध्ये ४ जानेवारी पासून सुरू झालेला घोडे बाजार देशभरातील घोडे शौकिनांसाठी चांगलीच मेजवानी ठरत असल्याने, घोडे बाजार इंदापूरात चर्चा मात्र देशभरात अशी चर्चा सध्या रंगत आहे. या घोडे बाजाराच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इंदापूरचे नांव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असून, २०१८ साली सुरू झालेल्या या घोडे बाजाराचे हे सलग पाचवे वर्ष आहे. मारवाड, पंजाब आणि अरबी जातीच्या घोड्यांसह अनेक वेगवगळ्या जातीचे व गुणांचे घोडे विक्रीसाठी सलग पाचव्या वर्षी इंदापूरमध्ये दाखल झाले आहेत. पुणे जिल्ह्यात भरणारा हा एकमेव घोडेबाजार असून, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून होणारा हा घोडेबाजार फेब्रुवारी अखेर पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव वैभव दोषी यांनी दिली आहे. हौसेला मोल नसते असे नेहमीच म्हटले जाते. स्वतः उत्तम घोडेस्वार व घोड्यांचे शौकीन असलेले इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व पिडीसिसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व उप सभापती यशवंत माने यांच्या प्रयत्नांमुळे मागील पाच वर्षांपासून इंदापूरमध्ये होत असल...

बारामती निर्भया पथकाकडून म्हसोबाचीवाडी येथे महिलांना सूरक्षे संदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१० फेब्रुवारी) :- महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सध्या शासन आणि प्रशासनाकडून महिला सक्षमिकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण विभागाकडून मंगळवारी (८ फेब्रुवारी) भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये बारामती निर्भया पथकाकडून महीला सक्षमिकरणासंबंधी केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देताना महिलांच्या सुरक्षेसंबंधी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी निर्भया पोलीस पथकाच्या प्रतिनिधी हवालदार अमृता भोईटे व पंचायत समितीचे समन्वयक डी. जे. राऊत यांनी उमेद अभियानाची माहिती महिलांना दिली. हवालदार अमृता भोईटे यांनी, निर्भया पथक, पोक्सो कायदा, तक्रार कशी व कोठे द्यायची, न घाबरता व्यक्त व्हावे, अन्याय सहन न करता प्रतिकार करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सोबतच त्यांनी सुरक्षे संदर्भात ११२, १०९१, १०० नंबर डायल करून पोलिसांशी संपर्क करून मदत घ्यावी असे आवाहन...

अरे चोरांनो ! शाळांना तरी सोडा, इथे देशाचे भविष्य घडवले जाते; जिल्हा परिषदेच्या शाळांवरही आता चोरट्यांच्या वाईट नजरा

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (७ फेब्रुवारी) :- इंदापूर तालुक्यातील रेडा गावात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्यावर चोरट्यांनी हात साफ केला असून, शिक्षणाचा बाजार मांडला जात असताना, देशातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा एकमेव आधार असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतच चोरट्यांनी संगणक आणि टीव्हीवर हात साफ केल्याने, अरे चोरांनो ! शाळांना तरी सोडा, 'इथे देशाचे भविष्य घडवले जाते' अशी विनंती चोरट्यांना करण्याची वेळ आली आहे. ही घटना ७ जानेवारी सायंकाळी ५ वा. ते ८ जानेवारी सकाळी ६ वा. दरम्यान घडली असून, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नायकु जाधव (सध्या रा. रेडा, ता. इंदापूर) यांनी शनिवारी (५ फेब्रुवारी) याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेमध्ये रेडा ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी शाळेला भेट दिलेला २५ हजार रुपये किंमतीचा एक ५० इंची एलइडी टीव्ही आणि शासनाकडून मिळालेला १० हजार रुपये किंमतीचा एक संगणक संच असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. ८ जानेवारीच्या सकाळी विद्यार्थ...

पालखी मार्गावरील कामादरम्यान क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत शॉक लागून एका युवकाचा मृत्यू; वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (६ फेब्रुवारी) :- चिखली (ता. इंदापूर) गावाच्या हद्दीतील अर्जुन वस्ती येथील ओढ्याशेजारी सुरू असलेल्या पालखी मार्गाच्या कामादरम्यान  क्रेन चालकाच्या निष्काळजी पणामुळे सुमित मारुती वाडेकर या १८ वर्षीय युवकाला विद्युत शॉक लागल्याने नाहक आपला जीव गमावावा लागल्याची दुर्दैवी घटना ११ जानेवारी रोजी घडली होती. या घटनेच्या जवळपास एका महिन्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी सुरज राजेंद्र क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरून भा. द. वि. कलम ३०४ अ अंतर्गत विशालकुमार प्रभूनाथ यादव या व्ही. एच. खत्री कंपनीच्या क्रेन चालकाविरोधात वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी व्ही. एच. खत्री कंपनीविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचे म्हटले आहे. सविस्तर हकीकत अशी की, सुरज राजेंद्र क्षिरसागर (सध्या रा. बारामती, मुळ रा. संतपेठ, पंढरपूर, जि. सोलापूर) हे व्ही. एच. खत्री कंपनीच्या पोकलेनवर ऑपरेटर म्हणून कामाला आहेत. चिखली गावाच्या हद्दीत अर्जुन वस्ती ओढ्याशेजारी पालखी मार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने या कॅम्पच्या ठिकाणी सुरज क...

एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर गोळीबार; तीन ते चार अज्ञातांनी केला गोळीबार

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क आपल्या बिनधास्त व निर्भिड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध व एक विद्वान खासदार, उत्तम नेता आणि अनेकवेळा उत्तम संसदपटू म्हणून गौरविण्यात आलेले एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर राष्ट्रीय महामार्ग ९ वरील छिजारसी (पिलखुआ) टोल गेटवर गोळीबार झाल्याची घटना घडली असून, त्यांनी काही वेळापूर्वी स्वतः याबाबत ट्विट करत या हल्ल्याची माहिती दिली आहे. तीन ते चार अज्ञातांनी आपल्या गाडीवर चार राऊंड फायर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या बेछूट गोळीबारात त्यांना कोणतीही इजा झाली नसून, या हल्ल्यात त्यांची गाडी पंक्चर झाली असल्याचे व तदनंतर ते दुसऱ्या गाडीत बसून घटनास्थळावरून निघून गेल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पाटील भरणे नाही, आता ठाकरे भरणे वाद; अंकिता ठाकरे यांचा राज्यमंत्र्यांना ठाकरे शैलीत इशारा

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (३ फेब्रुवारी) :- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यातील राजकीय वाद इंदापूरकरांना काही नवा नाही. मात्र सध्या इंदापूर तालुक्यात चर्चा आहे ती बाळासाहेब ठाकरेंची नात सून अंकिता ठाकरे यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना ठाकरे शैलीत दिलेल्या आव्हानात्मक इशाऱ्याची. अंकिता ठाकरे यांनी निमसाखर गटातील विकास कामांच्या भूमीपूजनावेळी (१ फेब्रुवारी) सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलीस प्रशासनाचा वापर करत विकास कामाला अडथळा आणल्याचा आरोप करत, दडपशाहीचे राजकारण आपण चालू देणार नसल्याचा आव्हानात्मक इशारा थेट राज्यमंत्र्यांना दिला आहे. त्यामुळे शांत स्वभावाच्या आणि राजकारणाच्या कारकिर्दीत अपवाद वगळता वादविवादांपासून अलिप्त राहणे पसंत करणाऱ्या अंकिता पाटील यांच्यात ठाकरे घराण्याची सून झाल्याच्या अवघ्या काही दिवसांतच कोणालाही बिनधास्त भिडण्याची ठाकरी वृत्ती दिसू लागल्याची चर्चा इंदापूर तालुक्यात होऊ लागली आहे. राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सदस्या भारती...