पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा; पोस्टाच्या ५ रुपयाच्या तिकिटावर आता इंदापूरकराचा फोटो

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (३० मे) :-  उत्तम दर्जाचे लेखक व कवी असलेल्या विठ्ठलवाडी (ता. इंदापूर) येथील बापू सोपान भोंग यांच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेत भारत सरकारच्या पोस्ट (डाक) खात्याने त्यांचा फोटो असलेल्या ५ रुपयांचे तिकीट MY STAMP  योजनेंतर्गत प्रकाशित केल्याने इंदापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. बापू  भोंग यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले असून,  ग्रामीण साहित्यिक म्हणून साहित्य क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इंदापूर तालुक्यातील विठ्ठलवाडी या छोट्याशा गावात जन्मलेल्या मात्र ग्रामीण साहित्यिक म्हणून स्वतःला सिद्ध करून प्रसिद्ध झालेल्या बापू भोंग यांनी आपल्या साहित्यिक कलागुणांच्या जोरावर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला असून, अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांना गवसणी घातली आहे. अनेक विषयांत त्यांचे लेखन दखलपात्र असून, ते उत्तम लेखक, पत्रकार, संपादक, दिग्दर्शक, कथालेखक, समीक्षक, प्रकाशक आणि कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नांवे दोन कथा संग्रह आणि द...

इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शाळांना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणार - महेश चावले

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२८ मे) :- भविष्यामध्ये इंदापूर तालुक्यात क्रीडा संस्कृती वाढावी आणि दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी तालुक्यातील प्राथमिक शाळांना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे मनोगत इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले यांनी जि. प. प्रा. शाळा क्र - ४ येथे क्रीडा साहित्य वाटप करतेवेळी व्यक्त केले. काल (२७ मे) या शाळेस क्रीडा विभागाकडून तब्बल तीन लाखांचे क्रीडा साहित्य देण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव पालवे, सचिन वाघमारे आणि दिनेश काळे हे सहकारी शिक्षक उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिक्षकांकडून क्रीडा अधिकारी महेश चावले यांचे हार व पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले. इंदापूर शहरात तारेची शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जि. प. प्रा. शाळा क्र. ४ ला तीन लाखांचे दर्जेदार क्रीडा साहित्य इंदापूर तालुका क्रीडा विभागाकडून काल देण्यात आले. १८६५ साली स्थापना झालेली ही तालुक्यातील सर्वात जुनी प्राथमिक शाळा आहे. विशेष म्हणजे जेष्ठ कवयित्री शांता शेळके तसेच लेखक व विधान परिषदेचे सभापती राहिलेल्या ग. प्र. प्रधान यांची प्राथमिक ज...

कर्मभूमीबरोबर जन्मभूमीलाही न्याय मिळवून द्या; आमदार यशवंत मानेंना ढोलेंचा विनंतीवजा टोला

इमेज
अध्यादेशाच्या प्रति फाडताना इंदापूर तालुका शेतकरी कृती समितीचे कार्यकर्ते मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२७ मे) - इंदापूर तालुक्याचे सुपुत्र व मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी जन्मभूमीपेक्षा कर्मभूमी महत्वाची असल्याचे सांगत इंदापूरकरांच्या विरोधात कडवी भूमिका घेत उजनी पाणी प्रश्नावर सोलापूरकरांची बाजू घेतली होती. माने यांनी कर्मभूमीबरोबरच जन्मभूमीलाही न्याय मिळवून द्यावा असा विनंतीवजा टोला मारत इंदापूर तालुका शेतकरी कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अध्यादेशाच्या प्रति फाडत राज्य शासनाच्या निर्णयाचा विरोध केला आहे. राज्य शासनाचा अध्यादेश २२ एप्रिल रोजी राज्य शासनाने उजनीतून ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्यास मंजुरी दिली होती. इंदापूर तालुक्यातील २२ गावांतील शेतीला याचा फायदा होणार हे इंदापूरकरांचे दिवास्वप्न सोलापूरकरांच्या विरोधामुळे फार काळ टिकू शकले नाही. मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधीं व विविध संघटनांच्या कडव्या विरोधानंतर राज्य शासनाने आज (२७ मे) नवा अध्यादे...

राज्य लोकसेवा आयोगाचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुलांवर अन्यायकारक - तानाजी भोंग

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२७ मे) : स्पर्धा परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी निवड प्रक्रियेत शारीरिक चाचणी संदर्भातील नियमांमध्ये बदल करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला निर्णय म्हणजे शारीरिकदृष्ट्या दिवाळखोरी असलेल्या उमेदवारांना संधी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांवर अन्यायकारक असल्याचे कारण देत महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी भोंग यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नियमांच्या बदलासंदर्भातील सूचना राज्य लोकसेवा आयोगाने मंगळवारी (२५ मे) आपल्या संकेतस्थळावर जारी केल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Service Public Commission) पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदाच्या भरतीसंदर्भातील शारीरिक चाचणीच्या नियमांमध्ये बदलाचा निर्णय घेत, पोलीस उपनिरीक्षक पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत ६० गुण मिळवणे आवश्यक असल्याची माहिती मंगळवारी (२५ मे) परिपत्रक काढत दिली होती. या निर्णयानुसार शारीरिक चाचणीत ६० गुण असतील तरच उमेदवाराला मुलाखत देता येणार आहे. उमेदवाराच्य...

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समिकरणांच्या उलथापालथीचे संकेत

इमेज
संपादकीय २०१९ पासून काँग्रेसकडे पाठ फिरवलेल्या इंदापूरच्या नगराध्यक्षांनी अखेर काँग्रेसच्या कार्यक्रमाला बुधवारी (१९ मे) हजेरी लावली. या कार्यक्रमाला कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना नाष्टा वाटप हा सामाजिक टच असला तरी भूतकाळातील घडामोडी पाहता नगराध्यक्षांनी लावलेल्या या हजेरीचा राजकीय अर्थ लावला जाणे साहजिक असून, आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये राजकीय समिकरणांची उलथापालथ पहायला मिळेल अशी चर्चा सुरू आहे. सध्या इंदापूर नगरपरिषदेवर काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. इंदापूरचे नगराध्यक्ष आणि सत्ता काँग्रेसचीच असल्याचे काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी अनेकवेळा म्हटले असले तरी, सप्टेंबर २०१९ पासून नगरपरिषदेवर हर्षवर्धन पाटील समर्थक गटाची सत्ता असल्याची बाब त्यांना माहीत नसावी हे शक्य नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सोयीनुसार भूमिका घेत नगराध्यक्षांसह इंदापूर नगरपरिषदेचा सत्ताधारी गट काँग्रेसमध्येच राहिला. असे असले तरी विधानसभा निवडणुकीनंतर हा गट काँग्रेसच्या झेंड्याखाली कधीही दिसला नाही. विशेष म्हणजे नगराध्यक्ष...

मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ इंदापूरात आयबीसेफचे आक्रोश निवेदन

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२१ मे) - आरक्षण विरोधी गटाच्या दबावाला बळी पडून महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर व असंवैधानिकरित्या मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील ३३% आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून मागासवर्गीय कोट्यातील पदोन्नतीची ३३% रिक्त पदे भरण्यात यावीत या प्रमुख मागण्यांसह आयबीसेफ'च्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राज्यपालांकडे करण्यात आलेल्या विविध मागण्यांचे 'आक्रोश निवेदन' काल इंदापूरच्या तहसीलदारांना देण्यात आले. सुप्रीम कोर्टाने राज्यातील मराठा आरक्षण नुकतंच रद्द केलं आहे. त्यानंतर राज्य सरकारने २० एप्रिल रोजीचा पदोन्नतीतील ३३% आरक्षण कायम ठेवून खुल्या प्रवर्गातील उर्वरित रिक्त पदे २५ मे २००४ च्या स्थितीनुसार म्हणजेच सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा आपलाच निर्णय ७ एप्रिलच्या अध्यादेशाने रद्द ठरवत मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील संवैधानिक आरक्षण बेकायदेशीरपणे रद्द केले. यामुळे मागासवर्गीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सदरचा असंवैधानिक निर्णय महाराष्ट्र सरकारने आरक्षण व...

इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचा स्तुत्य उपक्रम; कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत नाष्ट्याची व्यवस्था

इमेज
इंदापूर (२० मे) - इंदापूर शहरात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची उपासमार होऊ नये यासाठी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी प्रयत्नशील असून, मागील दहा दिवसांपासून जवळपास दोनशे जणांच्या नाष्ट्याची व्यवस्था काँग्रेस कमिटीकडून केली जात आहे. या कामात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते निस्वार्थीपणे नागरिकांच्या सेवेत कार्यरत असल्याचे दिसत आहेत. या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या इंदापूर नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा अंकिता शहा यांनीदेखील या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. सध्या इंदापूर शहर हे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या उपाचाराचे केंद्र बनले असून, इंदापूर शहरातील शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. साहजिकच या रुग्णांना लागणारी औषधे आणि इतर गरजांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांनादेखील शहरात थांबावे लागत आहे. घरून जेवणाचा डबा दररोज येईलच व वेळेवर येईलच याची खात्री नसल्याने अनेकांची उपासमार होत असल्याचे निदर्शनात आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची उपासमार होऊ नये यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...

इंदापूर लॉकडाऊन - लोकांना घरात डांबून ठेवण्याव्यतिरिक्त अन्य काहीच नाही

इमेज
संपादकीय प्रशासनाच्या देखरेखीखाली झालेल्या इंदापूर शहरातील कालच्या हजारोंच्या अनियंत्रित गर्दीने सात दिवस कडक लॉकडाऊनचे काय होणार याचा अंदाजा बेहत्तर आला आहे. केवळ लॉकडाऊन करणे पर्याप्त नसून, लॉकडाऊन काळात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मजबूत मूठ बांधने आवश्यक आहे ही साधी बाब प्रशासनाच्या लक्षात येऊ नये का? सक्षम यंत्रणेचा अभाव, तुटपुंज्या उपाययोजना, ढिसाळ नियोजन व भोंगळ कारभाराच्या जोरावर या लॉकडाऊनमधून लोकांना घरात डांबून ठेवण्याशिवाय प्रशासनाच्या हाती अन्य काहीच लागणार नसताना हा एक्सपेरिमेन्ट कशासाठी? आधीच कामधंद्याचं वाटोळं झालेलं आहे. छोटे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. खिसा रिकामा, वरून लाईटबिल बोकांडी. हातावरचं पोट असणाऱ्यांची उपासमार होत आहे. मागील एक वर्ष कसाबसा तग धरलेल्या लोकांचा संयम आता ढळू लागलाय. लॉकडाऊन कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना मात्र पुचक्याच लॉकडाऊनमुळे कोरोना नष्ट होत नसून, कोरोनाचा संसर्ग काही काळ थांबवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रशासनाला वेळ मिळावा हा लॉकडाऊनमागचा मूळ उद्देश असतो. या काळात दीर्घकालीन उपाययोजना करण्याबरोबरच वैद्यकीय सुविधांची त्रुटी भरून...

इंदापूर शहरात लॉकडाऊनच्या आयचा घो; तुडुंब गर्दी जमू देणाऱ्या प्रशासनाचा नक्की हेतू काय?

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१० मे) : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात आजपासून पुढील सात दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र इंदापूर शहरात प्रशासनाकडून नागरिकांना आज सकाळी ११ वाजेपर्यंत खरेदीच्या बहाण्याने कोरोना पसरवण्याची खुली छुट देण्यात आली होती की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. सकाळी खरेदीसाठी झालेल्या तुडुंब गर्दी पाहता नागरिकांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा आधीच एका एका बेडसाठी झगडत असलेल्या इंदापूरकरांना पश्चाताप करायला लावणार असल्याचे दिसत आहे. इंदापूर तालुक्यात पुढील ७ दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी ११ वाजेपर्यंत नागरिकांना खरेदीसाठी बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र सकाळी झालेल्या नागरिक आणि वाहनांच्या तुडुंब गर्दीमुळे लॉकडाऊनच्या आयचा घो झाल्याचे इंदापूर शहरात पाहायला मिळाले. लोकांना ही मुभा खरेदीसाठी होती, का कोरोना पसरवण्यासाठी देण्यात आलेली खुली छुट होती अशी शंका व्यक्त केली जात आहे. मुख्य बाजारपेठेसह संपूर्ण इंदापूर शहरात झालेल्या गर्दीमुळे अक्षरशः या गर्दीमध्ये पोलीसांची वाह...

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर व परिचारिकेला मारहाण; कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षणाची गरज

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (९ मे) - योग्य पध्दतीने उपचार करत नसल्याचे कारण देत इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासह एका परिचारिकेला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार काल (८ मे) इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात घडला असून, दोघा युवकांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३४, ३५३, ३२३, ३३२, ४२७, ४५१, ४५२, ५०४, ५०६, १८८, २६९, २७०, साथीचे रोग अधिनियम १८९६ कलम ३, ४, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ आणि महाराष्ट्र सेवा व्यक्ती व संस्था अधिनियम २०१० कलम ४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार होत असलेल्या अशा घटनांमुळे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येत असून,  कोरोनासारख्या युद्धजन्य परिस्थितीत तरी त्यांना पोलीस संरक्षण मिळणे अत्यावश्यक झाले आहे. इंदापूर शहरातील ५६ वर्षीय कोरोना बाधित व्यक्ती बुधवार (५ मे) पासून उपचारार्थ इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल होती. मात्र आज दुपारी १२.३० च्या सुमारास रुग्णाची तब्येत खालावल्याने रुग्णावर उपचार करत असताना वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता सं...

इंदापूर तालुक्यातील आजी माजी मंत्र्यांनी आमदार निलेश लंके यांचा आदर्श घ्यावा - दीपक काटे

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (८ मे) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशातील परिस्थिती बिकट होत चालली असताना स्वखर्चातून ११०० बेडचे कोविड सेंटर उभारून रुग्णांना मायेचा आधार देत आपल्या कुटुंबाप्रमाणे त्यांची सेवा करणारे पारनेर (जि. अहमदनगर) तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार निलेश लंके यांच्या कामातून बोध घेत इंदापूर तालुक्यातील आजी माजी मंत्र्यांसह देशातील सर्व लोकप्रतिनिधींनी काम केल्यास कोरोनावर मात करणे सहज शक्य होईल असे शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी म्हटले आहे. गुरुवारी (६ मे) तेे निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला भेट देण्यासाठी पारनेर येथे गेले होते. निलेश लंके यांच्या स्वखर्चातून ११०० बेडचे अद्यवत कोविड सेंटर देशात कोरोनाचे तांडव सुरू असून, देशभरातील नेतेमंडळी निवडणूका आणि इतर राजकारणात व्यस्त असताना पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार निलेश लंके मात्र पारनेर तालुक्यातील हजारो कोरोना रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जीवाचं रान करताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी जवळपास ११०० ...

मुस्लिम वेष धारण करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी जाणून घेतला पोलीसांचा बर्ताव

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मुत्सुद्देगिरी) शुक्रवार (७ मे) : बुधवारी (५ मे) पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी पोलीसांचा सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेल्या कामाच्या पध्दती आणि बर्ताव जाणून घेण्यासाठी एका मुस्लिम दांपत्याचे वेषांतर करून वेगवेगळ्या समस्यांसह पिंपरी चिंचवड, हिंजवडी आणि वाकड पोलीसांशी मदतीसाठी संपर्क साधला. यामध्ये त्यांना पिंपरी पोलीस ठाण्यात अतिशय वाईट तर हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात चांगला अनुभव आला. बुधवारी रात्री पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे दाढी, लालसर केसांचा विग, पांढरी टोपी, सलवार कुर्ता आणि मास्क असा मुस्लिम व्यक्तीचा वेष परिधान करून 'जमालखान कमालखान पठाण' बनले होते. तर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे ह्या त्यांच्या बेगम बनल्या होत्या. वेषांतर केल्यानंतर पठाण झालेले पोलीस आयुक्त आपल्या बेगम बरोबर पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावर उतरले होते. यावेळी आयुक्तांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून 'आमच्या शेजारी असलेल्या कोविड रुग्णासाठी ऍम्ब्युलन्सवाल्याला कॉल केला तर तो आठ हजार रुपये भ...

"बंगाल की बेटी" भाजपाला पुरून उरली

इमेज
संपादकीय २९४ विधानसभा सीट असणाऱ्या भारताच्या पूर्वकडील पश्चिम बंगालवर लढवय्या, स्ट्रीट फायटर ममता बनर्जींनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून एकहाती सत्ता काबीज करून दाखवली आहे. देशात काँग्रेसची धूळधाण होत असताना एकेकाळी काँग्रेसच्या नेत्या राहिलेल्या ममतांनी सलग दुसऱ्यांदा दोनशेहून अधिक जागा जिंकण्याचा विक्रम देखील केला आहे. बंगालचा इतिहास पाहिला तर, १९५२ ते १९६७ असे सलग १५ वर्ष बंगालवर काँग्रेसचे वर्चस्व होते. तदनंतर इंदिरा गांधींच्या काळातील एक टर्म (१९७२-१९७७) सोडली तर बंगालमध्ये काँग्रेसला आजतागायत कधीच सत्ता मिळवता आली नाही. त्या अनुषंगाने सिद्धार्थ शंकर राय हे काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री (१९७२-१९७७ ) ठरतात. सत्ता तर सोडाच मात्र मागील ४४ वर्ष काँग्रेसला बंगालमध्ये कधीही तिहेरी आकडाही गाठता आलेला नाही. याला अपवाद केवळ १९९६ च्या निवडणूकांचा, ज्यामध्ये काँग्रेसला ८० जागा मिळाल्या होत्या. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणिबाणीनंतर बंगालने काँग्रेसला कायमच नाकारले आहे. काँग्रेसचे १९७७ आणि त्यानंतरचे संख्याबळ पाहिले तर, १९७७ मध्ये २० जागा, १९८२ मध्ये ४९ जागा, १९८७ मध्ये ४० जागा, १९९१ मध्ये ४...

होय ! भारत एवढा असहाय कधीच नव्हता

इमेज
संपादकीय कोरोनाच्या त्सुनामीत सर्वकाही संपेल असेच काहीसे भीतीदायक वातावरण सध्या देशात निर्माण झाले आहे. अक्षरशः देशात मृतांचे ढिगारे जमा होत आहेत. रोज रुग्णसंख्या ४ लाखांच्यावर तर मृतांच्या आकड्यांचे (३४९८) उच्चांक होत आहेत. मृतांचा आकडा दोन लाखांच्या पुढे गेला असतानाही नेत्यांना मात्र सत्तेची हाव आणि लोकांना निवडणुकांच्या निकालाची चिंता आहे. बंगालमध्ये काय होणार? ममता हॅट्रिक करणार की मोदींची जादू चालणार? आज सकाळपासूनच टीव्हीसमोर लोकांची गर्दी आहे. थोड्या वेळात निकालही स्पष्ट होईल. मात्र १४० कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात अर्धा टक्के कोरोना रुग्णांना साध्या आरोग्यविषयी पायाभूत सुविधा न मिळाल्याने मरावे लागत असल्याचे विहंगम दृश्य मन हेलावून टाकत आहे. दुर्दैव आमचं की देशातील विदारक परिस्थिती पाहून पाकिस्तान आपल्यावर तरस खाऊन मदतीची भीक द्यायची का विचारतोय. भूतानकडून मदत घ्यावी लागतेय. वैद्यकीय सुविधांअभावी अक्षरशः रुग्ण रस्त्यांवर तडफडत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांची तगमग सुरू आहे. रेमडेसिव्हरला सोन्याचा भाव आलाय. ऑक्सिजनला ऑक्सिजनची गरज भासत आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर मिळणे तर केवळ कल...