श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंतीनिमित्त निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१० डिसेंबर) :- तुकारामांची गाथा लिहून काढली | म्हणून अवतरली भूमीवरी || तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीच्या डोहात बुडवल्यानंतर ते पुन्हा शब्दांत उतरवण्याचे महत्वपूर्ण कार्य करणारे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९७ व्या जयंतीनिमित्त काल (९ डिसेंबर) निमगाव केतकी येथे अखिल तेली समाज संघटना आणि तिळवण तेली समाजाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. सोबतच सुवर्णयुग गणेश मंदिर ट्रस्ट मंदिरामध्ये, निमगाव केतकी येथील पोलीस ठाणे व ग्रामपंचायत कार्यालयामध्येही महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून तेथे पेढे वाटप करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
तुकारामांच्या गाथेला मूर्त स्वरूप देण्याबरोबरच दीपिका, शंकर दीपिका, घाण्याचे अभंग, योगाची वाट, निर्गुणाच्या लावण्या, पाचरीचे अभंग, तैलसिंधुसह अनेक ग्रंथांची रचना करणाऱ्या श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्य आणि प्रबोधनात व्यतिथ केले. संतांच्या विभूति | देह कष्टविती परोपकारे || बुडत हे जनन देखवे हे डोळा | येतो कळवळा म्हणोनिया || त्यामुळे समाजोपयोगी कामांच्या माध्यमातूनच त्यांची ३९७ वी जयंती साजरी करण्यासाठी निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
यावेळी निमगाव केतकीचे प्रथम नागरिक प्रवीण भैय्या डोंगरे तसेच अखिल तेली समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष, अमरावती विभागाचे संपर्कप्रमुख सचिन देशमाने, निमगाव केतकी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मिलिंद खाडे, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, सुवर्ण योगेश्वर सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मच्छिंद्र चांदणे, बालाजी पतसंस्थेचे चेअरमन व राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापुरे, श्री गणेश पतसंस्थेचे चेअरमन किशोर पवार, मनोहर भिसे, कालिदास भिसे, सुभाष जठार, भारत शिंदे, नारायण देशमाने, प्रशांत भिसे, मुन्ना देशमाने, महेश जठार, मयूर शिंदे, ओंकार भिसे, अमित भिसे, सुमित देशमाने, पवन देशमाने, अतुल गांधी, ग्रामपंचायत सदस्य संतोष जगताप आणि अनेक नागरिक व समाज बांधव उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा