सरडेवाडी - राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला ग्रामसंघ लावणार ५०० झाडे
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
सरडेवाडी (२६ डिसेंबर) :- माझी वसुंधरा अभियानाच्या दुसऱ्या टप्पात सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला ग्रामसंघाने ५०० झाडे लावण्याची जबाबदारी घेतली असल्याची माहिती सरडेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम जानकर यांनी दिली आहे. काल (२४ डिसेंबर) ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम जानकर, उपसरपंच हनुमंत जमदाडे, ग्रामपंचायत सदस्या प्रियंका शिद व वैशाली शिद यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन या कौतुकास्पद मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला ग्रामसंघाच्या प्रत्येक महिला सदस्याने एक झाड लावून ते जगवण्याची हमी घेतली असून, या मोहिमेसाठी लागणारी रोपे सरडेवाडीतील अंकुर रोपवाटिकेतून उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी बोलताना सरपंच जानकर यांनी, माझी वसुंधरा अभियानांतर्गत असणारे सर्व निकष आम्ही तत्परतेने पूर्ण करणार असून, महिला ग्रामसंघाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. आम्ही सरडेवाडी गाव ऑक्सिजन पार्क होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी आभार मानले.
यावेळी सदस्या सुप्रिया कोळेकर, गयाबाई तोबरे, वैशाली कोळेकर, अलका कडाळे, सतीश चित्राव, रविंद्र सरडे, गोकुळ कोकरे, विजय शिद, शिवाजी माने, आजिनाथ गायकवाड, सहदेव शिंदे महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा