जीवनात यशस्वी होण्यासाठी आर्थिक नियोजन महत्वाचे - शंकरराव करपे
शंकरराव करपे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना इंदापूर (४ नोव्हेंबर) : जीवनात यशस्वी होण्यासाठी मिळवलेला पैसा आणि होत असलेला खर्च यांचा योग्य ताळेबंद करणे आवश्यक असल्याचे मत शंकरराव करपे यांनी व्यक्त केले आहे. काल (३ नोव्हेंबर) इंदापूर नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये नगरपरिषद कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनपर आयोजित 'आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा आणि मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी देखील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. काल (३ नोव्हेंबर) इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांना, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे, कमावलेल्या पैशांची गुंतवणूक कोठे, कशी आणि किती करावी, खर्चाचे मापदंड काय असावेत? याविषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी साताऱ्याच्या 'गिरिषा वेल्थ मेकर प्रायव्हेट लिमिटेड, या संस्थेचे शंकरराव करपे यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी इंदापूर तालुका शिक्षण मंडळाचे सचिव मुकुंद शहा, आरोग्य निरीक्षक...