अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या इंदापूर तालुका सचिव पदी धनंजय कळमकर यांची निवड


इंदापूर (३ नोव्हेंबर) : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघाच्या इंदापूर तालुका सचिव पदी साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक व निर्भीड पत्रकार धनंजय कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. मागील १५ वर्षापासून आपल्या निर्भीड, निःपक्ष लिखाणाने अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम करणाऱ्या कळमकर यांनी पत्रकार क्षेत्रात आपला एक विशेष ठसा उमटविला आहे.

साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक असलेले कळमकर यांनी, "नागरीक समता" या साप्ताहिकाच्या माध्यमातून आपल्या लेखणीची सुरुवात करताना दैनिक बंधुप्रेम, अजोती वैभव, साप्ताहिक सहकारवाणी अशा साप्ताहिकांमध्ये कार्यकारी संपादक म्हणून देखील काम पाहिले आहे. वेब पोर्टलचे तालुकाध्यक्ष शैलेश काटे, इलेक्ट्रॉनिक्स् मिडिया व प्रिंटचे पत्रकार कैलास पवार, ग्रामीण महाराष्ट्र न्यूजचे दीपक खिलारे यांनी त्यांचे नाव सुचवले.

संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा, जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख, शहराध्यक्ष सुरेश जकाते यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.

या निवडीप्रसंगी संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे,शहराध्यक्ष सुरेश जकाते, पत्रकार कैलास पवार,असिफभाई शेख, जितेंद्र जाधव, तात्यासाहेब पवार,प्रदीप पवार,दीपक खिलारे उपस्थित होते.

अखिल मराठी पत्रकार परिषद संघाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी. शेख, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. विकास शहा व कार्याध्यक्ष अतुल तेरखेडकर, साप्ताहिक लक्ष्मी वैभवचे संपादक विलासराव गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना मजबूत करुन ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न सर्वांच्या सहकार्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार - धनंजय कळमकर (सचिव, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट