पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉ. शिरीष सुरेश साळुंके यांची सशस्त्र दलाच्या 'कॅप्टन' पदावर नियुक्ती; कमांड हॉस्पिटलमध्ये देणार वैद्यकीय सेवा

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) इंदापूर (३१ डिसेंबर) : अवघ्या काही महिन्यांतच गरिबांचे डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळवलेले इंदापूरचे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष साळुंके यांची पुण्यातील सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि कमांड हॉस्पिटल (Southern Command) येथे कॅप्टन पदावर नियुक्ती झाली आहे. Service Commission या भारत सरकारच्या आयोगामार्फत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंदापूर शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असला तरी इंदापूर तालुक्यातील गोरगरीब लोकं एका तज्ञ डॉक्टरच्या सेवेपासून वंचित झाले आहेत. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कंत्राटी बेसिसवर स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून अकरा महिने सेवा देणारे डॉ. शिरीष साळुंके यांनी थोड्या काळातच शासकीय रुग्णालयाविषयी इंदापूर तालुक्यातील गोरगरीब लोकांमध्ये विश्वास निर्माण केला होता. एरव्ही शासकीय रुग्णालयामध्ये इलाज करण्यास कमीपणा समजणाऱ्या प्रतिष्ठित लोकांचा शासकीय रुग्णालयाकडे वाढलेला कल हा त्याचाच भाग.  त्यांनी खाजगी दवाखान्यांमध्ये लाखो रुपये खर्चूनही इलाज न झालेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णालयातच यशस्वी उपचार केले आह...

इंदापूर आय कॉलेजचे प्राध्यापक फिरोज शेख पी.एच.डी. पदवीने सन्मानित

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) बुधवार (३० डिसेंबर) : इंदापूरच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये कार्यरत प्राध्यापक फिरोज नसरुद्दीन शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी. एच. डी. पदवी प्रधान करण्यात आली. त्यांनी इंग्लिश या विषयात "A Study of Speech Acts with Special Reference to Vijay Tendulkar's Selected Plays." या विषयावर प्रबंध सादर केला होता. माजी सहकारमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सेवेत असलेले प्रा. फिरोज शेख यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इंग्रजी विषयातील पी.एच.डी पदवीने सन्मानित करण्यात आले. मेहनत आणि चिकाटीच्या बळावर प्रा. शेख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या Institute of Advanced Studies in English औंध (पुणे) या अभ्यास केंद्रावर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनाई (अहमदनगर) येथील डॉ. संदीप प्रभाकर खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन पूर्ण के...

इंदापूर उपजिल्हा रुग्णालय परिसरात नगरपरिषदेकडून वृक्षारोपण

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) इंदापूर (२८ डिसेंबर) : माझी वसुंधरा अभियानांतर्गत इंदापूर नगरपरिषदेने ६ हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने काल (२७ डिसेंबर) इंदापूर उपजिल्हा रूग्णालय परिसरामध्ये विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये काटेसावर, काटेरीमुकूट, जास्वंद आदी वृक्षांचा समावेश आहे. माझी वसुंधरा अभियान शहरात प्रभावीपणे राबविण्यासाठी इंदापूर नगरपरिष बरीच मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत अंकिता शहा यांच्या हस्ते इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या १६५ मीटरच्या पट्ट्यामध्ये विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने काटेसावर, जास्वंद आणि काटेरी मुकुट या वृक्षांचा समावेश होता. या अभियानांतर्गत शहरामध्ये तब्बल ५ हजार झाडे लावण्याचा संकल्प इंदापूर नगरपरिषदेने केला आहे. यावेळी बोलताना नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी म्हटले की, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवडीमुळे इंदापूर शहराच्या वैभवात न...

अंकिता पाटील यांना सत्यजित तांबे यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही - तानाजीराव भोंग

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) रविवार (२७ डिसेंबर) : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी काल (२६ डिसेंबर) इंदापूर येथे आयोजित युवक मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेता शंकरराव पाटील यांची विचारधारा संधीसाधूपणाच्या वृत्तीमुळे सोडल्याचा आरोप केला होता. यावर पलटवार करताना हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या व काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी सत्यजित तांबे यांना लहान तोंडी मोठा घास घेऊ नये असा टोला लगावला आहे. आता त्यांच्या वक्तव्यावर देखील पलटवार करताना इंदापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीराव भोंग यांनी, अंकिता पाटील यांना सत्यजित तांबे यांच्याविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे म्हटले आहे . काल (२६ डिसेंबर) इंदापूर शहरातील नामदेव मंदिरामध्ये युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर शंकरराव पाटील यांची विचारधारा सोडल्याचा आरोप केला होता. याचे कारण संधिसाधूपणा असल्याचे त्यांनी म्हटले होते. या आरोपावर...

इंदापूर शहरातील रेकॉर्डब्रेक रक्तदान होण्याची शक्यता; सुरुवातीच्या दोन तासांतच १०० पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) शनिवार (२६ डिसेंबर) : राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्याच्या उद्देशाने इंदापूर शहर युवक काँग्रेसचे सचिव सुफियानखान जमादार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नामदेव मंदिरामध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांतच १०० पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे संकलन झाले असून, युवकांची रक्तदानासाठी वाढती झुंबड पाहता शिबिर संपेपर्यंत ५०० बाटल्यांचे रक्त संकलन होण्याची शक्यता दिसत आहे. असे झाल्यास हे इंदापूर शहरातील आतापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक रक्तसंकलन असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि एकूणच नेत्यांकडून युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर इंदापूर शहर युवक काँग्रेसचे सचिव सुफियानखान जमादार यांनी आपल्या २१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूर शहरातील नामदेव मंदिरामध्ये आज (२६ डिसेंबर) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आपण भव्य रक्तदान शिबीर असे नेहमीच ऐकतो. ...

कोरोना काळातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मुत्सुद्देगिरी) इंदापूर (२५ डिसेंबर) : कोरोना काळात आरोग्य विभागावर वाढलेला ताण कमी करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने इंदापूर तालुक्यातील आरोग्य विभागात काम करण्यासाठी आरोग्य सेवक, ऑर्डर बॉय, आरोग्य सेविका आणि सफाई कर्मचारी अशा एकूण ८० जणांची नियुक्ती केली होती. हा नियुक्ती काळ आता संपणार असल्याने उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदांवर आपली कायमस्वरूपी नियुक्त करावी या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन इंदापूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहे. कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य विभागावर वाढलेला ताण कमी करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेमार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पध्दतीने इंदापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवक, ऑर्डर बॉय, आरोग्य सेविका आणि सफाई कर्मचारी अशा विविध पदांवर ८० जणांची नियुक्त करण्यात आली होती. हे कर्मचारी नियमित कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लाऊन आजही काम करत आहेत. कोरो...

महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात बारामती पोलीसांना यश

इमेज
समीर सय्यद ( उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) बारामती (२३ डिसेंबर) : बारामतीमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात बारामती पोलीसांना यश आले आहे.  या टोळीकडून ३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. याप्रकरणी बारामती पोलीसांनी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (वय ३२, रा. निरा,  ता. पुरंदर, जि. पुणे) आणि राहुल पांडुरंग तांबे (वय २८, रा. जेऊर, ता. पुरंदर, जि.पुणे) या दोघांना अटक केली आहे. हे देखील वाचा - जबरी चोरी आणि वाहन चोरी वेगवेगळ्या चार प्रकरणातील तीन आरोपींना भिगवण पोलीसांच्या बेड्या सविस्तर  वृत्त असे कि , पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरी प्रकरणी तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यात पोलिसांना सूचना केल्या  होत्या. या अनुषंगाने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी नेमण्यात आली आहे. दरम्यान, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्हयामध्ये अटक असलेला आरोपी अक्षय विलास खोमणे (वय २४, रा.कोहाळे बुद्रुक, ता. बारामती,जि. पुणे) याने बाराम...

जबरी चोरी आणि वाहन चोरीच्या एकूण चार घटनांतील तीन आरोपींना भिगवण पोलीसांच्या बेड्या

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) भिगवण (२३ डिसेंबर) : भिगवण पोलिसांनी पुणे सोलापूर महामार्गावरील जबरी चोरीच्या दोन आणि दुचाकी वाहन चोरीच्या दोन घटनांमधील तीन आरोपींना गजाआड केले असून, या चोरट्यांकडून चोरी केलेली दोन वाहने आणि एक मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपींचा इतरही चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का, भिगवण पोलीस अधिक तपास करत आहेत. पुणे सोलापूर महामार्गावर जबरी चोरीच्या दोन आणि वाहन चोरीच्या दोन घटनांतील तीन जणांना भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) पोलीसांनी अटक केली आहे. यामध्ये नामदेव बबन चुनाडे (वय ४५, रा. अनिल नगर, पंढरपूर, जि. सोलापूर) या आरोपीकडून अंदाजे १५ हजार रु. किंमतीची स्प्लेंडर प्लस (एमएच ४५ क्यू ७३५७), आणि अंदाजे एक लाख रु. किंमतीची रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट (एम.एच. ४२/९००९)  अशी दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. हे देखील वाचा - वाळू उपसा करणाऱ्या बोटी भिगवण पोलीसांनी उडवल्या भिगवण पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३९२,३४ अंतर्गत दाखल वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात विलास निवृत्ती आरडे (वय २२, रा. तिरवंडी, ता. माळशिरस जि.सोलापूर) आणि सचिन व्यंकट सुळ (...

नुकसान भरपाई देण्यास विमा कंपनीची टाळाटाळ; डॉ. राऊत आर्थिक अडचणीत

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) बुधवार (२३ डिसेंबर) : १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंदापूर शहरातील राम-सिता डायग्नोस्टिक सेंटरमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने डॉ. राऊत यांचे तब्बल तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. वारंवार पाठपुरावा करूनही आयसीआयसीआय लोम्बार्ड ही विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत असून मानसिक तणावामुळे आपल्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास याला आयसीआयसीआय लोम्बार्ड ही विमा कंपनी जबाबदार असेल असे डॉ. बाळासाहेब राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. इंदापूर शहरात १४ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंदापूरमधील डॉ. बाळासाहेब राऊत यांचे राम-सिता डायग्नोस्टिक सेंटर पाण्यात बुडाल्याने, सोनोग्राफी मशीन, डिजिटल एक्स-रे मशीन, १०० KV चे UPS, १६ स्लाईसची सिटी स्कॅन मशिन, कम्प्युटर, फर्निचर सर्वकाही कवडीमोल झाले. यामध्ये डॉ. बाळासाहेब राऊत यांचे तब्बल तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. २० वर्षांपासून विम्याचे हप्ते भरूनही आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनी आता नुकसान भरपाई देण्यास टाळाटा...

सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त इंदापूरमध्ये रक्तदान शिबिर; महिला रक्तदात्यांचाही उस्फुर्त प्रतिसाद

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 'रक्तदान जीवनदान' हे महारक्तदान अभियान राबविण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने आज (२० डिसेंबर) काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने इंदापूरमध्ये रक्तदान शिबिर राबविण्यात आले. यामध्ये १०१ रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले. विशेष म्हणजे महिलांनी देखील यावेळी रक्तदान  करून आपला सहभाग नोंदवला. कोरोनाची महामारी तसेच कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे कडाक्याच्या थंडीत सुरू असलेले आंदोलन पाहता सोनिया गांधींनी यंदा आपला वाढदिवस (६ डिसेंबर) साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा पाहता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘रक्तदान जीवनदान’ या महारक्तदान अभियानांतर्गत राज्यातून २५००० रक्ताच्या पिशव्यांच्या संकलनाचे आवाहन काँग्रेस क...

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आश्वासनानंतर ६ जानेवारीपर्यंत ऍड. राहुल मखरे यांचे आंदोलन मागे

इमेज
  समीर सय्यद (उपसंपादक) रविवार (२० डिसेंबर) :  इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या भ्रष्ट कारभाराला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पाठबळ असून, भरणे यांच्या पाठबळानेच इंदापूर पोलीस ठाणे सर्व सामान्य नागरिकांसाठी अन्यायाचा अड्डा बनत चालला असल्याच्या गंभीर आरोप ऍड. राहुल मखरे यांनी केला होता. दोषींवर कार्यवाहीसाठी ऍड. मखरे यांनी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला होता. मात्र, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मध्यस्थीनेच ऍड. राहुल मखरे यांनी हे आंदोलन ६ जानेवारीपर्यंत स्थगित केले आहे.  ऍड. राहुल मखरे यांनी, इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर आरोप करताना, त्यांच्या बेकायदेशीर आणि भ्रष्ट कारभाराला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे कारणीभूत असल्याचे म्हटले होते. मात्र, अखेर आज दत्तात्रय भरणे यांच्या मध्यस्थीनेच ऍड. मखरे यांनी हे आंदोलन ६ जानेवारी पर्यंत मागे घेत असल्याचे सांगितले. परंतु, सोबत दोषींवर योग्य कार्यवाही न केल्यास राज्य स्तरीय आंदोलनाचा इशाराही दिला आहे. हे देखील वाचा - पोलीस निरीक्षक ना...

पो. निरीक्षक सारंगकर यांच्या भ्रष्ट कारभाराला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पाठबळ - ऍड. राहुल मखरे

इमेज
(ऍड. राहुल मखरे कार्यकर्त्यांसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर उपोषणाच्या ठिकाणी) समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) इंदापूर (२० डिसेंबर) : इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या भ्रष्ट कारभाराला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पाठबळ असून, भरणे यांच्या पाठबळानेच इंदापूर पोलीस ठाणे सर्व सामान्य नागरिकांसाठी अन्यायाचा अड्डा बनत चालला असल्याच्या गंभीर आरोपांचा पुनरुच्चार बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांनी काल (१९ डिसेंबर) इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणादरम्यान केला. कांदलगांव येथील बाबर प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे. राजवर्धन पाटील यांनी ऍड. मखरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, आंदोलनाच्या ठिकाणी राजकीय लोकांची वर्दळ वाढू लागली आहे. तर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (कवाडे गट) पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी सारंगकर यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगत कांदलगांव येथील बाबर प्रकरणात आजपासून धरणे आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे यांनी गुरुवारी (१७ डिस...

सावित्रीबाई फुले जयंतीदिनी इंदापूरमध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक) इंदापूर (१९ डिसेंबर) : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे १९० व्या जयंतीचे औचित्य साधुन राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले बहुउद्देशिय सेवाभावी संस्था इंदापूर यांच्या वतीने ३ जानेवारी २०२१ रोजी इंदापूर येथील संत सावतामाळी कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्सव व सर्वरोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग (तात्या) शिंदे यांनी इंदापूर येथे काल झालेल्या बैठकीत बोलताना दीली. इंदापूर येथील संत सावतामाळी कार्यालयामध्ये सावीत्रीबाई फुले यांची १९० वी जयंती व सर्वरोगनिदान शिबीर आयोजित करण्याबाबत तालुक्यातील पदाधीकारी व कार्यकर्त्यांची बैठक काल (१८ डिसेंबर) आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे बोलत होते. यावेळी भाजपाचे मा. पंचायतराज आघाडी प्रदेश सरचिटणीस युवराज मस्के, बहुजनमुक्ती पार्टी इंदापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, सामाजिक कार्यकर्ते बाबा जाधव, भारत नारायण मिसाळ, नाभिक संघटना इंदापूर तालुकाध्यक्ष अवधुत पवार, माधवीताई सोननिस, मुकुदीनी कडवळे, संगीताताई क्षीरसागर इ. प्रमुख उपस्थित होते. हे देखील ...

ऊसतोड कामगारांकडे अवैध शस्त्रसाठा; अचानक छापा टाकून इंदापूर पोलीसांनी केली अटक

इमेज
  समीर सय्यद (उपसंपादक) शुक्रवार (१८ डिसेंबर) : इंदापूर पोलीसांनी काल रात्री वरकुटे बू।। (आबा करेवस्ती, ता. इंदापूर, जि. पुणे) याठिकाणी ऊसतोडणी करण्यास आलेल्या ऊसतोड कामगारांच्या वस्तीवर अचानक छापा टाकून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात धारदार तलवार, जांबिया कोयते असा अवैध शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. या प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा, कलम ४, २५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी एक आरोपी सराईत गुन्हेगार असून या आरोपीवर कर्जत (जि., अहमदनगर) पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तर एक आरोपी खुनाच्या गुन्ह्यात इंदापूर पोलीसांच्या रडारवर होता. सविस्तर वृत्त असे की , २३ नोव्हेंबरच्या पहाटे आपल्या २ महिन्यांच्या 'पिला' नावाच्या चिमुकलीचा खून करणारा सकट्या उर्फ शक्ती उर्फ शक्तीमान उर्फ चिंटू विकास काळे (रा. भांबूरे ता. कर्जत, जि. अहमदनगर) हा इंदापूर पोलीसांच्या रडारवर होता. या अनुषंगाने काल (१७ डिसेंबर) रात्री अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली इ...

बापानेच केला २ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा खून; इंदापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

इमेज
शुक्रवार (१८ डिसेंबर) : बापानेच आपल्या 'पिला' नावाच्या २ महिन्यांच्या चिमुकलीचा झोपेतच नाक आणि तोंड दाबून खून केल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील करेवाडी या ठिकाणी २३ नोव्हेंबरच्या पहाटे ५ वा. सुमारास घडली होती. सकटया उर्फ चिटू उर्फ शक्ती उर्फ शक्तीमान काळे (वय १८ वर्षे, रा. भांबूरे, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नांव असून, आरोपीच्या पत्नी सोनम यांच्या फिर्यादीवरून आज (१८ डिसेंबर) इंदापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भा.दं.वि.क.३०२, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की , सोनम या गेले दोन महीन्यांपूर्वी त्यांचा नवरा सकट्या उर्फ चिटू उर्फ शक्ती उर्फ शक्तीमान विकास काळे (रा. भांबूरे, ता. कर्जत, जि. अहमदनगर) व त्यांची २ महिन्यांची मुलगी 'पिला' हिच्यासह ऊसतोडीसाठी मालोजी एकनाथ करे (रा. करेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याकडे काम करत होत्या. ते इतर टोळी कामगार यांच्यासह एकनाथ धोंडीबा करे (रा. करेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या मालकिच्या शेतात कोपी करून राहत होते. दिनांक २२/११/२०२० रोजी दिवसभर ऊस...

जीवनात यशस्वी होण्यासाठी आर्थिक नियोजन महत्वाचे - शंकरराव करपे

इमेज
शंकरराव करपे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना इंदापूर (४ नोव्हेंबर) : जीवनात यशस्वी होण्यासाठी मिळवलेला पैसा आणि होत असलेला खर्च यांचा योग्य ताळेबंद करणे आवश्यक असल्याचे  मत शंकरराव करपे यांनी व्यक्त केले आहे. काल (३ नोव्हेंबर) इंदापूर नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये नगरपरिषद कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनपर आयोजित 'आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा आणि मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी देखील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. काल (३ नोव्हेंबर) इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांना, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे, कमावलेल्या पैशांची गुंतवणूक कोठे, कशी आणि किती करावी, खर्चाचे मापदंड काय असावेत? याविषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी साताऱ्याच्या 'गिरिषा वेल्थ मेकर प्रायव्हेट लिमिटेड, या संस्थेचे शंकरराव करपे यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी इंदापूर तालुका शिक्षण मंडळाचे सचिव मुकुंद शहा, आरोग्य निरीक्षक...

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या इंदापूर तालुका सचिव पदी धनंजय कळमकर यांची निवड

इमेज
इंदापूर (३ नोव्हेंबर) : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघाच्या इंदापूर तालुका सचिव पदी साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक व निर्भीड पत्रकार धनंजय कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. मागील १५ वर्षापासून आपल्या निर्भीड, निःपक्ष लिखाणाने अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे काम करणाऱ्या कळमकर यांनी पत्रकार क्षेत्रात आपला एक विशेष ठसा उमटविला आहे. साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक असलेले कळमकर यांनी, "नागरीक समता" या साप्ताहिकाच्या माध्यमातून आपल्या लेखणीची सुरुवात करताना दैनिक बंधुप्रेम, अजोती वैभव, साप्ताहिक सहकारवाणी अशा साप्ताहिकांमध्ये कार्यकारी संपादक म्हणून देखील काम पाहिले आहे. वेब पोर्टलचे तालुकाध्यक्ष शैलेश काटे, इलेक्ट्रॉनिक्स् मिडिया व प्रिंटचे पत्रकार कैलास पवार, ग्रामीण महाराष्ट्र न्यूजचे दीपक खिलारे यांनी त्यांचे नाव सुचवले. संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा, जिल्हा निरीक्षक शौकत तांबोळी, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख, शहराध्यक्ष सुरेश जकाते यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. या निवडीप्रसंगी संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा, पुणे जिल्ह...

शेतकरी विधेयक शेतकरी व संविधान विरोधी; विधेयकाविरोधात इंदापूरमध्ये काँग्रेसची सह्यांची मोहीम

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक) इंदापूर (२९ ऑक्टोबर) : केंद्र सरकारने पारित केलेल्या कामगार व शेतकरी विधेयकाचा विरोधी पक्षांसमवेत देशभरातील अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. तर काँग्रेस पक्ष हे विधेयक शेतकरी, कामगार आणि संविधान विरोधी असल्याचे संबोधत या विधेयकाविरोधात संपूर्ण देशभर तब्बल २ कोटी स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून काल इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सह्यांची मोहीम राबविण्यात आली. केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये शेतकरी व कामगारांशी निगडित ३ विधेयके पारित केली होती. अनेक विरोधी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच देशातील अनेक शेतकरी संघटनांनी या विधेयकाला विरोध केला आहे. तर २५ सप्टेंबरला शेतकरी संघटनांनी बंदही पुकारला होता. तसेच महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात या कायद्याला स्थगिती दिली आहे. याच विधेयकाविरोधात शिरोमणी अकाली दलच्या नेत्या व केंद्रीय मंत्री हरसीम्रत कौर बादल यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. तर राहुल गांधी यांनी या विधेयकाला मोदी सरकारचे ३ काळे अध्यादेश ...

तर इंदापूर शहर काँग्रेस कमिटी नगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडेले

इमेज
मुख्याधिकारी यांना निवेदन देताना काँग्रेसचे पदाधिकारी चेतन चव्हाण (संपादक) बुधवार (२२ ऑक्टोबर) : इंदापूर शहरातील राजेवलीनगर, शेंडेमळा, शाहूनगर, जावईवाडी भागातील गटारी आणि रस्त्यांच्या संदर्भात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आणि बुधवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील रहिवाश्यांच्या घरात पाऊसाचे व गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांचे लाखोंचे नुकसान झाले होते. वरील समस्यांमुळे या भागांतील लोकवस्तीमध्ये आता रोगराई पसरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सदर परिसराशी निगडित विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी इंदापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांना काल निवेदन देण्यात आले.  बुधवारी (१४ ऑक्टोबर) झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाश्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते, ज्याला या भागातील अनेक तक्रारी नंतरही न सोडवण्यात आलेली ड्रेनेजची समस्या कारणीभूत असल्याचा ठपका काँग्रेस कमिटीने काल दिलेल्या निवेदनात ठेवला आहे. तर इंदापूर शहरात निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थ...

भटक्या विमुक्त जाती जमातींचा नागरिकत्व सुधारणा (CAA) कायद्याला विरोध का?

इमेज
कोरोनाने देशातील अनेक समस्यांचा गुणाकार केला असला तरी, अनेकांना सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा (CAA) कायद्यापुढे बाकीच्या सर्व समस्या क्षणिक व क्षुल्लक वाटत आहेत. कोरोनामुळे संविधानाच्या आत्म्याला छेद देणाऱ्या या कायद्याशी संलग्न बाबी काही काळ चर्चेत नसल्या तरी या कायद्यामुळे ऐतिहासिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक या सर्वच स्तरावर शोषण झालेल्या भटक्या विमुक्त जाती जमातींसमोर भविष्यात काय अडचणी निर्माण होणार आहेत, त्यांना या कायद्याबाबत काय वाटते याविषयी सामाजिक कार्यकर्त्या 'दीपा पवार' यांचा 'द वायर' मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख खूप महत्वपूर्ण आहे. हा लेख आम्ही जसाच्या तसा याठिकाणी देत आहोत. भटके विमुक्त म्हणजे शासन प्रशासनासाठी बऱ्याच वेळी गरजेचा नसलेला विषय आणि महत्वपूर्ण नसलेला समुदाय. वोट बँकेला नजरेसमोर ठेऊन मराठा, आदिवासी, मुस्लिम या समुदायाचे विषय किमान चघळले तरी जातात. मात्र राहण्याचा ठिकाणा नसलेला, रोजच्या प्राथमिक प्रश्नांकडे, मग ते शिक्षण असो वा आरोग्य किंवा मग सामाजिक सुरक्षा याची एका चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहणारे, आम्ही भटके विमुक्त हे नेहमीच ...