सावित्रीबाई फुले जयंतीदिनी इंदापूरमध्ये सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन

समीर सय्यद (उपसंपादक)

इंदापूर (१९ डिसेंबर) : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे १९० व्या जयंतीचे औचित्य साधुन राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले बहुउद्देशिय सेवाभावी संस्था इंदापूर यांच्या वतीने ३ जानेवारी २०२१ रोजी इंदापूर येथील संत सावतामाळी कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्सव व सर्वरोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग (तात्या) शिंदे यांनी इंदापूर येथे काल झालेल्या बैठकीत बोलताना दीली.

इंदापूर येथील संत सावतामाळी कार्यालयामध्ये सावीत्रीबाई फुले यांची १९० वी जयंती व सर्वरोगनिदान शिबीर आयोजित करण्याबाबत तालुक्यातील पदाधीकारी व कार्यकर्त्यांची बैठक काल (१८ डिसेंबर) आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी या संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे बोलत होते. यावेळी भाजपाचे मा. पंचायतराज आघाडी प्रदेश सरचिटणीस युवराज मस्के, बहुजनमुक्ती पार्टी इंदापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, सामाजिक कार्यकर्ते बाबा जाधव, भारत नारायण मिसाळ, नाभिक संघटना इंदापूर तालुकाध्यक्ष अवधुत पवार, माधवीताई सोननिस, मुकुदीनी कडवळे, संगीताताई क्षीरसागर इ. प्रमुख उपस्थित होते.

हे देखील वाचा - बापानेच केला २ महिन्यांच्या मुलीचा खून; इंदापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

सर्वरोगनिदान निदान शिबीराचे उदघाटन अकलुज येथील प्रसिद्ध डाॅ. एम. के. इनामदार यांचे हस्ते होणार आहे. तर अकलुज येथील सहा स्पेशालिष्ट डाॅक्टरांचे पथक व इंदापूर तालुक्यातील तज्ञ डाॅक्टरांकडुन शिबीरात सहभागी शिबीरार्थीची वेगवेगळ्या आजाराबाबतची तपासणीही  ३ जानेवारी २०२१ रोजी मोफत केली जाणार आहे. तपासणीसाठी कोणतीही फी आकारली जाणार नसल्याने तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी शिबीरात उपस्थित राहुन आपली मोफत रोगनिदान तपासणी करून घण्याचे आवाहन पांडुरंग (तात्या) शिंदे यांनी केले आहे.

हे देखील वाचा - ऊसतोड कामगारांकडे अवैध शस्त्रसाठा; अचानक छापा टाकून इंदापूर पोलीसांनी चार जणांना केली अटक

यावेळी गणेश जाधव,नागनाथ व्यवहारे, अशोक व्यवहारे, शिवराज भिसे, चंद्रकांत शेंडे, आदित्य बोराटे, राजेंद्र शिंदे, अंबादास व्यवहारे, इन्नुस बेपारी, मारूती शिंदे, महेश ढगे, नवनाथ शिंदे, जतिन पटेल, विशाल थोरात,विशाल राऊत सुधाकर बोराटे यांचेसह मोठ्या प्रमानात कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट