इंदापूर आय कॉलेजचे प्राध्यापक फिरोज शेख पी.एच.डी. पदवीने सन्मानित
समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)
बुधवार (३० डिसेंबर) : इंदापूरच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये कार्यरत प्राध्यापक फिरोज नसरुद्दीन शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी. एच. डी. पदवी प्रधान करण्यात आली. त्यांनी इंग्लिश या विषयात "A Study of Speech Acts with Special Reference to Vijay Tendulkar's Selected Plays." या विषयावर प्रबंध सादर केला होता. माजी सहकारमंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सेवेत असलेले प्रा. फिरोज शेख यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची इंग्रजी विषयातील पी.एच.डी पदवीने सन्मानित करण्यात आले. मेहनत आणि चिकाटीच्या बळावर प्रा. शेख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या Institute of Advanced Studies in English औंध (पुणे) या अभ्यास केंद्रावर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनाई (अहमदनगर) येथील डॉ. संदीप प्रभाकर खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन पूर्ण केले.
हे देखील वाचा - अंकिता पाटील यांना आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही - तानाजीराव भोंग
हा Application Oriented Research असल्यामुळे अनेक मान्यवरांनी त्यांचे व त्यांच्या प्रबंधाचे कौतुक केले आहे. इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रा. फिरोज शेख यांचे अभिनंदन केले.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा