महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात बारामती पोलीसांना यश

समीर सय्यद ( उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी)

बारामती (२३ डिसेंबर) : बारामतीमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात बारामती पोलीसांना यश आले आहे.  या टोळीकडून ३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. याप्रकरणी बारामती पोलीसांनी चंद्रकांत लक्ष्मण लोखंडे (वय ३२, रा. निरा,  ता. पुरंदर, जि. पुणे) आणि राहुल पांडुरंग तांबे (वय २८, रा. जेऊर, ता. पुरंदर, जि.पुणे) या दोघांना अटक केली आहे.


सविस्तर  वृत्त असे कि, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरी प्रकरणी तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यात पोलिसांना सूचना केल्या  होत्या. या अनुषंगाने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी नेमण्यात आली आहे. दरम्यान, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्हयामध्ये अटक असलेला आरोपी अक्षय विलास खोमणे (वय २४, रा.कोहाळे बुद्रुक, ता. बारामती,जि. पुणे) याने बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या आरोपीने  पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बारामती शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी गळयातील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून चोरल्याचे सांगितले. या आरोपीकडून बारामती  शहर पोलीसांनी एकूण ३ लाख रुपये किमतीचे सहा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले आहेत.


या गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे करीत आहेत.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट