इंदापूरचा इतिहास जाणून घेण्यासाठी फायदेशीर ठरणार ' माझ्या शाळेच्या आठवणी' हे पुस्तक
हर्षवर्धन पाटील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करता प्रसंगी मालोजीराजेंचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इंदापूर शहरातील हिंदू मुस्लिम आणि एकूणच सामाजिक एकोप्याचा महत्वाचा धागा मानले जाणारे सेवानिवृत्त शिक्षक महादेव चव्हाण यांनी लिहिलेले 'माझ्या शाळेच्या आठवणी' या आत्मचरित्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी प्रकाशन करण्यात आले. शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले यांच्यासह इंदापूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आणि प्रशासकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्तेदेखील या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत असून, याआधीही महादेव चव्हाण यांचे 'देवमय' हे काव्यसंग्रह महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले होते. ग्रामीण बोलीभाषेतील 'देवमय' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ८ नोव्हेंबर २०२० रोजी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यांची अजूनही काही पुस्तके प्रकाशनाधीन आहेत, ज्यामध्ये 'ईर्षा' (ग्रामीण कथासंग्रह), 'जावे त्यांच्या गावा' (प्रवासवर्णन) आण...