गलांडवाडी नं. १ - लक्झरी आणि टेम्पोची समोरासमोर धडक
![]() |
| अपघातानंतर जखमींना बाहेर काढताना नागरिक |
आज रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवरील गलांडवाडी नंबर १ (ता. इंदापूर) पाटीजवळ लक्झरी बस आणि टेम्पोचा अपघात झाला असून, पुण्याच्या दिशेने निघालेल्या लक्झरीचा (KA-51-AF-3262) पुढचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातानंतर काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचलेल्या सरडेवाडी टोलनाक्याच्या आणि अन्य एका रुग्णवाहिकेमधून जखमींना उपचारासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सरडेवाडी टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेचे चालक पप्पू जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वेगात असलेल्या लक्झरीचा पुढचा टायर फुटल्याने ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटून ही लक्झरी विरुद्ध दिशेने निघालेल्या टेम्पोवर (MH-46-Af-9314) जाऊन आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा