इंदापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे भ्रष्टाचारी संचालक मंडळ बरखास्त करा - स्वाभिमानी शिक्षक परिवाराची मागणी

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची इमारत

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (४ सप्टेंबर) ऑनलाईन पद्धतीने पार पडली. संचालक मंडळाने काटकसरीने कारभार करत सभासदांना ९% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून ९.२५% उंचाकी लाभांश व सभेचा भत्ता सभा संपताच तात्काळ बँक खात्यावर जमा केल्याचे पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानदेव चव्हाण यांनी म्हटले असले तरी, गाळे डिपॉझिट व भाडे यातील गौडबंगाल आणि अवैध बांधकाम कमिटीची चौकशी करून भ्रष्टाचारी संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करण्याची मागणी स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात इंदापूरची पतसंस्था रसातळाला असताना संस्थेचा कारभार सर्वोत्तम आहे असे सांगण्याचा सत्ताधाऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सभासदांच्या लक्षात आल्याने त्यांनी ही मागणी केल्याचे म्हटले आहे.

स्वाभिमानी शिक्षक परिवाराने गाळे डिपॉझिट, गाळ्यांचे भाडे आणि गाळेधारकांच्या नावांची यादी सादर करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांकडे केली असून, डिपॉझिट रक्कम, भाडे रक्कम यामध्ये प्रचंड अनियमितता असल्याने सत्ताधारी संचालक मंडळाने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला आहे. कार्यालयाचे उत्पन्न मागील तीन वर्षापासून २,४७,५०० रु. येणे बाकी असून, कार्यालयाचे येणे, बाकीचे व्याज यामुळे बुडत असल्याने याला जबाबदार कोण? तीन वर्षात लेखापरीक्षणावर १८ लाख रूपये खर्च केला तरी २२ डेफर्ड टॅक्स याला अपवाद कसा राहतो? संस्थेची जाहिरात शंकरराव पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आप्पासाहेब जगदाळे यांच्या जन्मदिनी का दिली जात नाही? लाभांश देताना मयत शिक्षकांच्या वारसांना १६ लाख रूपये सत्ताधारी देऊ शकत नसेल तर उद्या एखाद्या डीसीपीएस धारक सभासद अडचणीत

हे देखील वाचा - गोरगरीब इंदापूरकरांवर कारवाई, राजकीय कार्यक्रमांना मात्र फुल परवानगी; ही दुटप्पी भूमिका कशासाठी

आल्यास २५ लाख हे मृगजळ ठरणार नाही का?तालुक्यातील सभासदांनी एकवीस संचालकांना निवडून दिले असतानाही अवैध बांधकाम समिती कशासाठी? सभासदांना कर्जभरणा  व्याज आकारणी दिवसांवर करावी, विनाकारण जादा दिवसांचे व्याज सभासदांना भरावे लागत असून, जिल्ह्यातील अन्य पतसंस्थेच्या तुलनेत इंदापूरची पतसंस्था कमी लाभांश का देत आहे? असे अनेक प्रश्न स्वाभिमानी परिवाराने सभेदरम्यान उपस्थित केले असून, संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारावर रोष व्यक्त करणाऱ्या महिला सभासदांचा आवाज देखील सभेदरम्यान सत्ताधाऱ्यांनी मुद्दामहून बंद केल्याचाही आरोप स्वाभिमानी शिक्षक परिवाराने केला आहे. एकंदरीतच भ्रष्ट कारभाराने पतसंस्था रसातळाला नेणारे सत्ताधारी संचालक मंडळ बरखास्त करा अशी मागणी स्वाभिमानी परिवाराने केली आहे.

यावेळी, नानासाहेब नरूटे, अदिनाथ धायगूडे, दत्तात्रय ठोंबरे, बालाजी कलवले, मनीषा मोटे आदि विरोधी संचालकांनी सभासदहिताची भुमिका घेतली. तर सुहास मोरे, अनिल शिंदे, संतोष गदादे, सुप्रिया आगवणे, प्रशांत घुले, तुकाराम बुटे, जयश्री सरके, शशिकांत शेंडे यांनी सभासदांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आणि संस्थेच्या कारभारावर टिकास्त्र सोडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट