तर...चायनीज सीमेवर सैनिकांचे आणि इथे इंदापूरकरांचे गळे कापल्याशिवाय राहणार नाही.
चायनाला हद्दपार करण्याची जबाबदारी इंदापूरचे प्रशासन, व्यापारी, नागरिक...सर्वांचीच संपादकीय (३० जुलै) पंचमीला अजून एक महिना अवकाश आहे. मात्र आतापासूनच लहानग्या पतंग वीरांनी चायनीज मांजा आणि नायलॉन दोऱ्याची शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू केली आहे. इंदापूरचा बाजार ते धुंडाळत आहेत. गत पंचमीत ३ ऑगस्ट रोजी इंदापूर शहरातील टेंभूर्णी नाक्यावर चायनीज मांजा हनुवटीवर कापल्याने पाऊणे तीन वर्षाचा विराट उत्तम शिंदे (रा. स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) हा चिमुकला गंभीर जखमी झाला होता. तर संतोष भोई (रा. माळवाडी नं. २) या दुचाकीस्वाराचा अकलूज रोडवरील कचरा डेपोनजीक गळा कापता कापता राहिला होता. नशीब बलवत्तर होते म्हणून हे दोघेही वाचले. किंतु परंतु या दोऱ्यांमुळे भूतकाळात घडलेल्या या दोन्ही घटना चायनाला गांभीर्याने घ्यायला भाग पाडत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासन, व्यापारी आणि नागरिकांनी चायनीज मांजा आणि नायलॉन दोरा वेळीच कापायची तसदी घ्यायला हवी, अन्यथा पुढचा नंबर आपल्याच कुणाचा असेल असं गृहीत धरायला हरकत नाही. चायनीज मांजावर कारवाई संदर्भात पर्यावरण विभागाचा आदेश (क्र. सीआरटी २०१५/सीआर/३७/ टीसी २ ...