पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेल्लुर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा बेसबॉल संघ इंदापूरमधून रवाना

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क सोमवार (२९ मार्च) : महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांच्या वतीने १५ मार्च ते २७ मार्च दरम्यान इंदापूर येथील देवा बेसबॉल अकॅडमी आणि कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या सहकार्याने ३४ वी राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या पुरुषांच्या महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षण शिबीर इंदापूर येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले होते. आंध्रप्रदेशमधील वेल्लुर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा बेसबॉल संघ  शनिवारी (२७ मार्च) रवाना झाला. यावेळी क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी खेळाडूंना निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखविला. याप्रसंगी इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, महाविद्यालयाचे शा. शि. संचालक प्रा. डॉ. भरत भुजबळ, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ढवळे सर, प्रा. घोगरे सर, प्रा. मुलाणी यांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्माताई, सचिव मुकुंदशेठ शहा व सर्व संचालक...

निमगाव केतकीमध्ये विविध संघटनांकडून रेशनकार्ड हमीपत्राची होळी

इमेज
निमगाव केतकी प्रतिनिधी निमगाव केतकी (२६ मार्च) : बोगस शिधापत्रिका शोधकामी स्वस्त धान्य दुकानदार भरून घेत असलेल्या हमी पत्राविरोधात इंदापूर तालुक्यातील वातावरण चांगलेच तापू लागले असून, आज निमगाव केतकीमध्ये बहुजन मुक्ती पार्टी, अखिल तेली समाज संघटना आणि शेतकरी संघटनेकडून संयुक्तरित्या सर्व स्वस्त धान्य दुकानांबाहेर हमीपत्राची होळी करण्यात आली. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, अखिल तेली समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष व राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन देशमाने, बहुजन मुक्ती पार्टीचे  निमगाव केतकी शहराध्यक्ष भारत मिसाळ,  सागर मिसाळ, संतोष जगताप, दादा आदलिंग, हनुमंत पवार, मंगेश घाडगे, बाळू शहाणे, आणि मोठ्या संख्येने निमगावकर उपस्थित होते. केंद्र सरकारच्या आदेशान्वये इंदापूर तालुक्यात सध्या बोगस शिधापत्रिका शोधण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांकडून गॅस कनेक्शन नसल्याबाबत हमीपत्र लिहून घेत आहेत. त्याआधारे गॅस कनेक्शन असणाऱ्यांचे धान्य बंद केले जाणार आहे. या प्रक्रियेवर आज निमगाव केतकीमध्ये रेशन दुकानांसमोर विविध संघटनांकड...

इंदापूर तालुक्यातील कोरोनाची आजची परिस्थिती; लॉकडाऊन टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२६ मार्च) : कोरोनाबाबतीत स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली असून, देशभरातील टॉप १० शहरात महाराष्ट्रातील पुण्यासह ९ शहरांचा समावेश आहे. इंदापूर लगत असलेल्या सोलापूर जिल्ह्यात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तर अनेक निर्बंधानंतरही बारामतीची रुग्णसंख्या वाढत असल्याने बारामतीची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने होऊ लागली आहे. इंदापूर तालुक्यातही सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या अर्धतकापार गेल्याने आरोग्य विभागासह एकूणच प्रशासनावर दबाव वाढला आहे. प्रशासनाकडून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे, मात्र लॉकडाऊनची नामुष्की पुन्हा येऊ नये यासाठी इंदापूरकरांनी काळजी घेणे तसेच प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बारामतीसह पूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊनच्या गर्तेत जातो की काय अशी हालत निर्माण झाली असून, सोलापूर जिल्ह्यातही दुकानांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. शनिवार व रविवारी लॉकडाऊन असणार आहे. तर रात्री ७ च्या पुढे कलम १४४ लागू असेल. इंदापूर तालुक्यातही काल आढळलेल्या ६१ रुग्णांसहित सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्या साठीच्या घरात ग...

रेशन दुकानांसमोरच होणार हमीपत्राची होळी; बहुजन मुक्ती पार्टीच्या आंदोलनाचा उद्या पहिला टप्पा

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२५ मार्च) : बोगस शिधापत्रिका शोधमोहिमे अंतर्गत शिधापत्रिका धारकांकडून भरून घेतले जाणारे हमीपत्र म्हणजे नागरिकांची शुद्ध फसवणूक असून ही प्रक्रिया तात्काळ न थांबवल्यास या प्रक्रियेविरोधात बहुजन मुक्ती पार्टी आंदोलन करणार असून, या आंदोलनाचा पहिला टप्पा उद्या (२६ मार्च) सर्व रेशन दुकानांसमोर हमीपत्रांच्या होळीच्या स्वरूपात केला जाणार आहे.  सध्या बोगस शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र या प्रक्रियेत शिधापत्रिका धारकांकडून भरून घेतले जाणारे हमीपत्र म्हणजे लोकांची शुद्ध फसवणूक असून, उज्वला योजनेंतर्गत गोर गरिबांना मोफत गॅस देणारे सरकारची आता गॅसच्या मोबदल्यात शिधापत्रिका रद्द करण्याची प्रक्रिया अनाकलनीय असली तरी, यामागे दारिद्र्यरेषेखाली जीवन व्यतिथ करणाऱ्या कोट्यावधी लोकांना उपाशी मारून त्यांचा नरसंहार करण्याचे फार मोठे षडयंत्र केंद्र सरकार आखत असल्याचे बहुजन मुक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. नागरिकांच्या हितार्थ आणि या अनाकलनीय प्रक्रियेविरोधात बहुजन म...

इंदापूर तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती? पहा आकडेवारी

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२३ मार्च) : इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने इंदापूरकरांच्या  चिंतेत भर पडू लागली आहे. एकंदरीत परिस्थिती 'कंट्रोल में' असली तरी, नागरिकांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या निवांतपणामुळे कोरोना एंट्रीच्या वर्षपूर्तीनंतरही गतवर्षीसारखीच गत आताही होईल की काय असे वाटू लागले आहे. त्यामुळे इंदापूरकरांची इच्छा असो वा नसो मात्र कोरोना होऊ नये यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर तुघलकी लॉकडाऊनच्या वर्षपूर्तीनंतरही आपल्याला फिरून पुन्हा भोपळा चौकात यावे लागणार आहे. २०२० मधील 'सर्वात निगेटिव्ह शब्द पॉसिटीव्ह' पुन्हा चर्चेत येत आहे. सध्या इंदापूर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दररोज ६० च्या घरात वाढत असून, अख्खी कुटुंबे कोरोनाबाधित होत आहेत. कोरोना वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर कोरोनाबाबत बंद झालेल्या कोण, कुठे, कधी पॉसिटीव्ह आला? या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. मात्र अजूनही नागरिक आणि पोलीस प्रशासनामध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर इक्का दुक्का ठिकाणी कार्यवाहीचा लपंडाव वगळता 'तेरी भी चूप मेरी भी चूप...

पत्रकार कैलास पवार यांचा आदर्श सेवा पुरस्काराने सन्मान; सामाजिक, पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल

इमेज
"आदर्श सेवा पुरस्कार" स्वीकारताना पत्रकार कैलास पवार (छाया: तुकाराम जाधव) मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क रेडा (२२ मार्च) : नुकताच पत्रकार कैलास पवार (गुलाबनगर (रेडा) ता. इंदापूर, जि. पुणे) यांचा आदर्श सेवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला असून, सामाजिक आणि पत्रकार क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य माध्यम ठरले आहे. हा सन्मान दैनिक तुफान क्रांती तृतीय वर्धापन दिनानिमित्त दैनिक तुफान क्रांती माणदेश नगरी सांगोला समूहच्या वतीने काल (२१ मार्च) दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब मुजावर, नायब तहसीलदार साहेबराव मंडवे यांच्या उपस्थितीत जिजामाता मल्टीपर्पज हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात देण्यात आला. या कार्यक्रमाला सांगोला तालुक्यातील आजूबाजूच्या अनेक तालुक्यातील, तसेच मानदेश नगरीतील अनेक ज्येष्ठ आणि युवा पत्रकार, संपादक, चित्रपट, कला, शैक्षणिक, क्रीडा, आणि नाट्य क्षेत्रातील अनेकांनी उपस्थिती लावली होती. पत्रकारितेत ठसा उमटवणारे तुकाराम जाधव यांनी पत्रकार कैलास पवार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार कैलास पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता पत्रकार कैलास पवार म्हणाले की, इ...

रेशनकार्ड शिक्षक-प्रशासन वाद पेटवणार; शिक्षकांचा तहसीलदारांच्या आदेशावर बहिष्कार

इमेज
शिक्षकांवर ओढवणार नागरिकांचा रोष;  स्वाभिमानी शिक्षक परिवाराचा तुघलकी फर्मानाला विरोध समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) इंदापूर (१८ मार्च) : स्वाभिमानी शिक्षक परिवाराने बोगस शिधापत्रिका शोध मोहिमेवर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केल्याने, आता रेशनकार्डावरून शिक्षक आणि प्रशासनादरम्यान वाद पेटणार असल्याचे दिसत आहे. शैक्षणिक वर्षा अखेरीस शिक्षकांवर कामाचा प्रचंड ताण असताना देखील प्रशासनाकडून बोगस शिधापत्रिका शोध मोहिमेच्या कामाचा अतिरिक्त ताण टाकण्यात आल्याने इंदापूर तालुक्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तहसीलदारांनी सदराचा आदेश त्वरित रद्द करावा अन्यथा स्वाभिमानी शिक्षक परिवार बोगस शिधापत्रिका शोधमोहीमेवर बहिष्कार टाकणार असल्याचे म्हटले आहे. सदर आशयाचे निवेदन आज तहसीलदारांसह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. इंदापूर तालुक्यात सध्या बोगस शिधापत्रिका शोध मोहीम ३० एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार असून, याकामी तहसीलदारांनी इंदापूर तालुक्यातील १९७ प्राथमिक शिक्षकांवर घरोघरी जाऊन अंत्योदय, बीपीएल, केसरी, शुभ्र, अन्नपूर्णा आणि अस्थापणा कार्ड अशा सर्व प्रकारच्या बोगस श...

वाळू माफियांवर भिगवण पोलीसांची मोठी कार्यवाही; परप्रांतीय मजुरांच्या साहाय्याने चालू होता अवैध वाळू उपसा

इमेज
जिलेटीनच्या साहाय्याने ६ बोटींसह एकूण १ कोटी २ लाख ८० हजारांचा माल महसूल विभागाकडून नष्ट समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) भिगवण (१४ मार्च) : पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये भिगवण पोलीसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर धडक कार्यवाही केली असून, आज (१४ मार्च) रात्री ३.१५ मी. सुमारास परप्रांतीय मजुरांच्या मदतीने भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिक्सळ गांवाच्या उजनी पाणलोट क्षेत्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर भिगवण पोलीसांनी केलेल्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या कार्यवाहीमुळे इंदापूर तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. यामध्ये ६ बोटींसह इतर यांत्रिक साधनसामग्री असे एकूण १ कोटी २ लाख ८० हजार रुपयांची साधन सामग्री महसूल विभागाकडून नष्ट करण्यात आली आहे. काल (१३ मार्च) भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना गोपनीय सूत्रांकडून भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डिक्सळ गांवाच्या हद्दीत असणाऱ्या उजनी पाणलोट क्षेत्रात परप्रांतीय मजुरांच्या मदतीने अवैध वाळू उपसा करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या अ...