वेल्लुर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा बेसबॉल संघ इंदापूरमधून रवाना

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

सोमवार (२९ मार्च) : महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांच्या वतीने १५ मार्च ते २७ मार्च दरम्यान इंदापूर येथील देवा बेसबॉल अकॅडमी आणि कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या सहकार्याने ३४ वी राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या पुरुषांच्या महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षण शिबीर इंदापूर येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले होते. आंध्रप्रदेशमधील वेल्लुर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा बेसबॉल संघ  शनिवारी (२७ मार्च) रवाना झाला.

यावेळी क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी खेळाडूंना निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी पाठविलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखविला. याप्रसंगी इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, महाविद्यालयाचे शा. शि. संचालक प्रा. डॉ. भरत भुजबळ, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ढवळे सर, प्रा. घोगरे सर, प्रा. मुलाणी यांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्माताई, सचिव मुकुंदशेठ शहा व सर्व संचालक मंडळ, तसेच प्राचार्य यांनी हे शिबीर  घेण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखनकर सर व देवा बेसबॉल अकॅडमीचे सर्व खेळाडूंनी सर्वांचे आभार व्यक्त करून यापुढेही संस्थेकडून अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट