पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

४० फुटीवर हिंस्र पाळीव कुत्र्याची दहशत; एकाच दिवसात ११ जणांवर हल्ला

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१७ नोव्हेंबर) - इंदापूर नगरपरिषदेच्या पूर्वेकडून जाणाऱ्या ४० फुटी रस्त्यावर एका पाळीव मात्र हिंस्र कुत्र्याने चांगलीच दहशत माजवली असून, काल (१६ नोव्हेंबर) एकाच दिवसात या कुत्र्याने हल्ला करून तब्बल ११ जणांना जखमी केले आहे. मादा जातीच्या या कुत्र्याने याआधीही अनेक जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले होते. नागरिकांच्या अनेक तक्रारी आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध वृत्तानंतरही नगरपरिषद प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कुत्र्याची, परंतु या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यास धजावत नसलेल्या नगरपरिषद प्रशासनावर कोणाची दहशत आहे? कोण यांना धाकात ठेवत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून निघालेल्या विजय शेवाळे यांच्या डाव्या पायाचा चावा घेत या कुत्र्याने त्यांना गंभीर जखमी केले. तर इंदापूरमध्ये नितीन अर्जुन पवार (रा. ४० फुटी रोड, इंदापूर) यांच्या घरी पाहुण्या म्हणून आलेल्या इंदुमती सिताराम आटोळे (रा. शिर्सुफळ, ता. बारामती) या महिलेलाही याच कुत्र्याने गंभीर जखमी केले. उपचारार्थ उपजिल...