पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढला; वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारचा निर्णय

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क गुरुवार (२९ एप्रिल) - राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र महाराष्ट्रात वाढती रुग्णसंख्या पाहता लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा लॉकडाऊन १५ मे पर्यंत कायम राहणार असल्याचे सांगितल्याने लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब झाले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याच्या कारणास्तव लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढवावा अशी मागणी अनेक मंत्र्यांकडून करण्यात आली होती. राज्यात दररोज सत्तर हजारांच्या आसपास रुग्णसंख्या वाढत आहे. कमी होत नसलेल्या रुग्णसंख्येमुळे १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, या निर्णयाची घोषणा उद्या (३० एप्रिल) रोजी केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही सत्तर हजारांच्या आसपास आहे. सोबतच १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा ...

बिग ब्रेकिंग - लोणी देवकर एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडरचा साठा जप्त; इंदापूर पोलीसांची कामगिरी

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मुत्सुद्देगिरी) लोणी देवकर (२६ एप्रिल) : लोणी देवकर (ता. इंदापूर) येथे असणाऱ्या एमआयडीसीतील Y-Axis Structural Steel Pvt. Ltd या कंपनीत आज (२६ एप्रिल) इंदापूर पोलीसांनी छापा टाकून  ऑक्सिजनचे  ७,५५,७०० रु. किंमतीचे  तब्बल ५१ भरलेले सिलेंडर व २१ रिकामे सिलेंडर हस्तगत केले आहेत. कोरोना संकट काळात ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्ण मरत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची साठेबाजी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. आज (२६ एप्रिल) पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत लोणी देवकर या ठिकाणी असलेल्या एमआयडीसीतील एका कंपनीत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन साठा लपवण्यात आला असल्याची माहिती मिळाली होती. या अनुषंगाने इंदापूर पोलीसांनी Y-Axis Structural Steel Pvt. Ltd या कंपनीत छापा टाकला असता ऑक्सिजनचे तब्बल ५१ भरलेले सिलेंडर तर २१ रिकामे ऑक्सिजनचे सिलेंडर आढळून आले आहेत. कंपनीतील उपलब्ध साठ्यावरून एप्रिल महीन्यात एकूण १७९ सिलेंडरची आवक झाली असून त्यामध्ये एकूण १२५३ क्युबेक मिटर इतका ऑक्सिजन आणला गेला आहे. तो कोठून आणला याबाबत अधिक विचारपूस के...

बाबा चौकात फिरस्त्यांची ऑन द स्पॉट कोरोना चाचणी; चाचणीत अनेक जण पॉसिटीव्ह

इमेज
अनेक नागरिक पॉसिटीव्ह असतानाही मोकाट फिरत असल्याचे निदर्शनास; प्रशासनाने लक्ष देण्याची गरज समीर सय्यद (उपसंपादक, मासिक मुत्सुद्देगिरी) इंदापूर (२४ एप्रिल)  : महाराष्ट्र शासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विकेंड लॉकडाऊनची संकल्पना राबवत असताना कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या इंदापूर शहरातील नागरिक मात्र विनाकारण फिरून प्रशासनाच्या प्रयत्नांची खिल्ली उडवत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे इंदापूर पोलीस ठाणे, आरोग्य विभाग आणि एकूणच प्रशासनाकडून विनाकारण फिरणाऱ्यांची ऑन द स्पॉट रस्त्यावरच अँटिजिन चाचणी करून विनाकारण फिरणाऱ्या फिरस्त्यांना चांगलाच धक्का दिला आहे. सुरुवातीच्या अवघ्या काही वेळातच अनेक जण पॉसिटीव्ह सापडल्याने प्रशासनाने उचललेले हे पाऊल चांगलेच यशस्वी ठरले आहे. वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्र शासन, प्रशासन विकेंड लॉकडाऊन सारख्या संकल्पना राबवून अहोरात्र प्रयत्न करत असताना कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या इंदापूर शहरातील नागरिक मात्र प्रशासनाच्या प्रयत्नांना जुमानत नसल्याचे चित्र दिसत आहे. मात्र इंदापूर प्रशासनाने आता अशा फिरस्त्यांना चांगलाच धक्का दिला आहे. अत्यावश्यक सेव...

आंतरराज्य व आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास कसा मिळवता येईल?

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क शुक्रवार (२३ एप्रिल)  : 'ब्रेक दि चेन’ या मोहिमेंतर्गत २२ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून प्रवासावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांसाठी आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास ची सुविधा सुरू करण्यात आली आहे. आता नागरिकांना खालील लिंकवर अर्ज करता येणार आहे. https://t.co/c2fxPS3Qzv अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन पास घेता येणार आहे. मात्र या पासचा वापर केवळ आपात्कालीन परिस्थिती केला जावा असे आवाहन महाराष्ट्र पोलीस विभागाने आपल्या ऑफिसियल ट्विटर हॅण्डल वरून ट्विट करून केले आहे. दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनामुळे उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आणि संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून काही आपात्कालीन पावले उचलण्यात आली आहेत. साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील कलम २ आणि अनुषंगिक आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीन्वये संपूर्ण राज्यभर उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. हे देखील वाचा - काय आहेत प्रवासावरील निर्बंध? वाचा सविस्तर विनाकारण आंतरराज्य व आंतरजिल्हा ...

इंदापूर शहरात कोरोना रुग्णांची शोधमोहीम युद्धपातळीवर; वेगवेगळ्या ३० टिम्स कार्यरत

इमेज
शोधमोहीमेत नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांचाही सहभाग मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२२ एप्रिल)  : इंदापूर शहरात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या सांसर्गिक रोगाच्या अनुषंगाने 'ब्रेक दि चैन' या मोहिमेंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि रुग्णांचा वाढता मृत्यूदर कमी करणे या उद्देशान्वये स्थानिक प्रशासनाकडून आजपासून (२२ एप्रिल) नगरपरिषद कर्मचारी आणि शिक्षकांच्या मदतीने संपूर्ण शहरात कोरोना रुग्णांची शोधमोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. याकामी प्रत्येकी ३ सदस्यांच्या ३० वेगवेगळ्या टिम्स बनविण्यात आल्या असून, यामध्ये शहरात असणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करणे, संशयित रुग्ण आढळल्यास त्याला तपासणी केंद्राकडे घेऊन जाणे, लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे इ. कामकाज पाहिले जाणार आहे. इंदापूर शहरात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांचा आकडा तीनशेपार गेला असून, ३३ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची अधिकृत नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून 'ब्रेक दि चैन' या मोहिमेंतर्गत कोरोना रुग्णांची शोधमोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. या अनुष...

प्रवासावर आता निर्बंध; आज रात्रीपासून काय असतील नवे निर्बंध?

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क मुंबई (२२ एप्रिल) : राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून रोज साठ हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सात लाखांच्या घरात पोहोचली असून, या पार्श्वभूमीवर  आज (२२ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. याबाबत महाराष्ट्र सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. हे निर्बंध १ मे सकाळी ७ पर्यंत लागू असणार आहेत. काय असतील नवे निर्बंध? १) सर्व सरकारी कार्यालये फक्त १५ टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. कोरोनाशी संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात आले आहे. २) अत्यावश्यक सेवेत नसलेले मात्र १३ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या आदेशांमध्ये अपवाद म्हणून वगळण्यात आलेल्या कार्यालयांना १५ टक्के किंवा ५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, त्या क्षमतेने कार्यरत राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. ३) प्रत्यक्ष लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी असेल. ४) लग्नसमारंभ आता फक्त एकाच हॉलमध्ये २ ता...

लॉकडाऊनमुळे त्रस्त एका सामान्य व्यापाऱ्याची सोशल मीडियावर व्यक्त होत असलेली व्यथा

इमेज
सहज मनात आलेले विचार राज्यकर्ते, अधिकारी यांच्या पर्यंत सहज पोहोचवता येत नाही आहेत, म्हणून सोशल मेडीयावर प्रसारित करत आहे. कोणाची वरपर्यंत ओळख असेल तर नक्की पुढे पाठवा.  गेल्या वर्षी कोरोना आला, नंतर एक दिवस, मग एक आठवडा, परत एक महिना असा लॉक डाऊन सुरू झाला व वाढत गेला. नंतरचे एक वर्ष लॉक डाऊन येत जात राहिला. नेमका 2020 च्या मार्च /एप्रिलला सुरू झालेला लॉक डाऊन सर्व व्यावसायिकांचे संपूर्ण आर्थिक वर्ष गिळंकृत करून गेलाच, मार्च / एप्रिल 2021 पर्यंत. कोरोना नवखा होता तेव्हा लॉक डाऊन स्विकारार्ह होता. कारण मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आपल्या भारतीयांना विशेष माहिती नव्हत्या, नक्की कशामुळे कोरोना होऊ शकतो किंवा कशामुळे टाळता येईल याचे ज्ञान नव्हते. म्हणून व्यावसायिकांनी देखील वैयक्तिक नुकसानाचा विषय दुर्लक्षित करून सहभाग घेतला. आता एक वर्ष पूर्ण झाल्यावर मात्र लहान असो वा मोठा, सगळ्याच व्यावसायिकांना धास्ती वाटू लागली आहे लॉक डाऊनची. कारण किती दिवस, आठवडे, महिने व्यवसाय बंद ठेवायचे? कारण कर्मचार्‍यांचे पगार होत रहातात, फार तर थोडे उशीरा होतात. पण बहुतांश व्यावसायिकांचा व्यवसाय हा ...

इंदापूर तालुक्यात कोरोनामुळे युद्धजन्य परिस्थिती; रुग्णांची बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी धावपळ

इमेज
संपादकीय इंदापूर तालुक्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली असून, रुग्णांचा आकडा दोनशे पार करू लागला आहे. उपलब्ध वैद्यकीय सुविधांपेक्षा रुग्णांची संख्या अधिक असल्याने रुग्णवाहिका, बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिव्हर इंजेक्शन्ससाठी रुग्णांना अक्षरशः झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. शासकीय व खाजगी रुग्णालये आणि कोविड सेंटर कोरोना रुग्णांनी फुल झाली आहेत.  अवाजवी बिलासंदर्भात खाजगी रुग्णालये व संबंधित व्यवस्थेवर प्रशासनाचा कसलाही वचक नाही.  रेमडेसिव्हर इंजेक्शन्सविषयी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवले जात आहेत.  मृत्यूदरही वाढतोय. अहोरात्र झटूनही वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत मागास राहिलेल्या इंदापूर तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या हाताळताना  आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. ही 'न भूतो' अशी भयावह परिस्थिती का निर्माण झाली? नागरिकांनी याचा याचा शोध आणि बोध दोन्ही घेतला पाहिजे. कोरोनाने इंदापूर तालुक्यातील वैद्यकीय व्यवस्थेसह एकूणच प्रशासनाच्या कामकाजाची आणि नेत्यांच्या विकासकामांच्या मोठमोठ्या दाव्यांची देखील पोलखोल केल...

कोरोना इम्पॅक्ट - गुढीपाडवा आणि रमजान यावर्षीही घरातच; काय आहेत शासनाचे आदेश?

इमेज
चेतन चव्हाण (संपादक, मुत्सुद्देगिरी) मंगळवार (१३ एप्रिल) : कोरोनाच्या इम्पॅक्टमुळे सलग दुसऱ्या वर्षी हिंदू मुस्लिम बांधवांना गुढीपाडवा आणि रमजान महिना साध्या पध्दतीने साजरा करावा लागणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून तसे परिपत्रक जारी करण्यात आले असून, सलग दुसऱ्या वर्षी हे घडत असल्याने हिंदू मुस्लिम बांधव निराश झाले आहेत. मात्र देशातील एकूण ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांपैकी अर्धे रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातच असल्याने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या आदेशाचे व नियमांचे पालन करणे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ठरणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गतवर्षी जवळपास सर्वच सण, उत्सव, उर्स, जत्रा, जयंत्या अत्यंत साध्या पध्दतीने साजऱ्या करण्यात आल्या होत्या. मात्र यंदाही हेच करावे लागणार असल्याचे दिसत आहे. सध्या देशभरात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १२ लाख ५८ हजारांच्या जवळपास पोहोचली असून, पैकी अर्धे रुग्ण ( ५ लाख ६४ हजारांच्या जवळपास) महाराष्ट्रातच असल्याने महाराष्ट्र शासनाकडून आज साजरा होणारा हिंदू बांधवांचा नववर्ष सोहळा गुढीपाडव...

"सत्यशोधक जोतीबा"

इमेज
भारतीय समाजसुधारकांच्या यादीमध्ये कदाचित सर्वाधिक दुर्लक्षित व्यक्ती म्हणजे महात्मा जोतीबा फुले. देशात बहुजन समाजक्रांतीची बीजे रोवणाऱ्या या क्रांतीसुर्याबद्दल इतरांच्या तुलनेत कमीच लिहिलं किंवा बोललं गेलं आहे. ११ एप्रिल १८२७ ला जन्माला आलेल्या या क्रांतीसुर्याने येणाऱ्या सर्व सुधारकांना एक वैचारिक दिशा देण्याचे काम केले. परंतु त्यांनी ती दिशा स्वीकारलीच नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव! फुलेंच्या कामगिरीचा बारकाईने अभ्यास केल्यास त्यांच्या विचारांचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. महात्मा फुलेंचे शिक्षण आणि मुन्शी गफ्फार बेग विद्यार्थी दशेत असताना फुलेंचे पाऊल कोणत्या दिशेने पडणार आहे, याची जाणीव झाली म्हणून की काय समाजातील काही स्वार्थी जणांनी गोविंदरावांना धर्म कर्तव्यास जागे करून फुलेंचे शिक्षण बंद पाडले. जोतिबांना शाळेतून काढले, शेतीला लावले आणि वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ९ वर्षाच्या सावित्रीशी त्यांचा विवाह लाऊन दिला. ओल्या मातीला हवा तसा आकार देता येतो; कोवळ्या वयात बांधले गेलेले हे बंध वाढत्या वयानुसार दिवसेंदिवस घट्टच होत गेले. याची प्रचीती फुलेच्या जीवन अभ्यासातून पावलोपावली येते....

वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या तालुक्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांची दादागिरी - हर्षवर्धन पाटील

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक, मुत्सुद्देगिरी) इंदापूर (१० एप्रिल)  : कोरोनासारख्या आपत्तीमध्येही शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर वन विभागाने केलेल्या  कार्यवाह्यांमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जगावे का मरावे हा प्रश्न पडू लागला आहे. गुुरुवारी (८ एप्रिल) अजोती येथील ज्ञानदेव गुटाळ या शेतकऱ्याच्या उसाच्या उभ्या पिकावर वनविभागाने बुलडोझर फिरवल्याने सुमन ज्ञानदेव गुटाळ या महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह आणि सद्यस्थितीचे भान नसल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर दादागिरीचा आणि राज्य सरकारवर गोरगरिबांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप केला आहे. वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या तालुक्यात काल वनविभागाने केलेल्या कार्यवाहीला अधिकाऱ्यांची दादागिरी आणि कोरोनासारख्या आपत्तीमध्ये आधीच खचलेल्या गोरगरिबांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप होत आहे. गुरुवारी (८ एप्रिल) अजोती (ता. इंदापूर) येथील ज्ञानदेव गुटाळ यांच्या उसाच्या उभ्या पिकावर वनविभागाने बुलडोझर फिर...

नियोजनाअभावी केदारवस्तीवरील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; गांवकऱ्यांमध्ये नाराजी

इमेज
परभणी प्रतिनिधी : लक्ष्मण चौरे  पाथरी (८ एप्रिल) : पाण्याचा मुबलक साठा असूनही पाथरी (जि. परभणी) तालुक्यातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वरखेड केदारवस्ती किन्होळा या ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या गांवामध्ये पाण्याचा मुबलक साठा आणि सुविधा असूनही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ऐन उन्हाळ्यात केदारवस्तीवरील रहिवाश्यांना पाण्यासाठी विहिरींवर भटकंती करावी लागत असल्याने गांवकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पर्यायी ढिसाळ कामकाज करत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याजागी इतरांची नियुक्ती करण्याची मागणी गांवकऱ्यांकडून होऊ लागली आहे. पाथरी (जि. परभणी) तालुक्यातील वरखेड हे गांव नावारूपाला मोठे असले तरी विकास कामांसाठी मात्र शुन्य असल्याचे दिसत आहे. पाणी ही माणसाची सर्वात मोठी गरज असूनही वरखेड केदारवस्ती किन्होळा या ग्रुप ग्रामपंचायतमधील केदारवस्तीमध्ये मात्र पिण्याच्या पाण्यासाठी गांवकऱ्यांची ऐन उन्हाळ्यात परवड होताना दिसत आहे. पाण्याची टाकी आणि मुबलक प्रमाणात पाणीसाठा असून देखील गांवकऱ्यांना पिण्याचे पाणी सोडले जात नसल्याने एकूणच ग्रामपंचायत कर्म...

नागरिकांच्या शंका व संभ्रम दूर करून लसीकरण वाढवण्यासाठी इंदापूर नगरपरिषद प्रयत्नशील

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (८ एप्रिल) : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सध्यातरी लसीकरण हाच उत्तम पर्याय मानला जात असला तरी कोरोना लसीसंदर्भात नागरिकांमध्ये अद्यापही अनेक शंका व संभ्रम आहेत. समुपदेशन व जनजागृतीच्या माध्यमातून ह्या शंका व संभ्रम दूर करून इंदापूर शहरात वाढता कोरोना लसीकरणाच्या माध्यमातून आटोक्यात आणता येईल यासाठी इंदापूर नगरपरिषद प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. याकरीता भर उन्हातही स्वतः नगराध्यक्षा, नगरसेवक, नगरपरिषदेचे कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते घरोघरी जाऊन लसीसंदर्भात नागरिकांच्या शंका व संभ्रम दूर करून जास्तीत जास्त लसीकरण घडवून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. इंदापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाच्या अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सध्यातरी कोरोनाविरोधक लस घेणे हाच उत्तम पर्याय असल्याचे मानले जात आहे. सध्या शासनाकडून ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र नागरिकांमध्ये अद्यापही लसी संदर्भात, दहा महिन्यात लस तयार झाली आहे, मग काही गडबड तर नाही ना, घाई-गडबडीत लशींना परवानगी मिळाली नाही ना...