पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ट्रॉलीतील ऊस अंगावर पडल्याने एकाचा जागीच मृत्यू; इंदापूर तालुक्यातील धोकादायक ऊस वाहतूकीकडे प्रशासनाचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष

इमेज
समीर सय्यद (उपसंपादक) इंदापूर (२९ मार्च) :- धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील ऊस अंगावर पडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना इंदापूर तालुक्यातील निरा भीमा कारखान्यानजीक ६ मार्च रोजी सायंकाळी ७ वा.३० मिनिटांच्या सुमारास घडली होती. या घटनेत नारायण रामचंद्र जाधव (रा. बोराटवाडी, ता. इंदापूर) यांचा जागीच मृत्यु झाला होता. या संदर्भात संजय मधुकर फडतरे (वय २६ वर्ष, रा. बोराटवाडी, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून रविवारी (२६ मार्च) सतिश सिताराम बोडके (रा. पिंपरी बु. ता. इंदापूर) या ट्रॅक्टर चालकाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर शहरासह संपूर्ण तालुक्यातून धोकादायक व नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या ऊस वाहतुकीकडे संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष अशा घटनांसाठी कारणीभूत ठरत आहे. या अपघातातील मयत आणि फिर्यादी दोघेही ट्रॅक्टर चालक असल्याने ऊसाने भरलेले ट्रॅक्टर निरा भीमा साखर कारखान्याच्या यार्डमध्ये सोडून नेहमीप्रमाणे एकाच दुचाकीवर (एम एच ४२ व्हि १५२७) रेडा मार्गे आपल्या घरी निघाले होते. यावेळी ओव्हरलोड ऊस भरलेल्...

इंदापूर तालुक्यासाठी अर्थसंकल्पातून १६० कोटींचा निधी मंजूर - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२८ मार्च) :- नुकत्याच पार पडलेल्या (मार्च २०२२) अधिवेशनाच्या अर्थसंकल्पामध्ये इंदापूर तालुक्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत १६० कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. रविवारी (२७ मार्च) गिरवी काटी परिसरातील जवळपास २० कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन  व उद्घाटनानंतर काटी येथे पार पडलेल्या जाहीर सभेत त्यांनी ही माहिती दिली. अवघ्या दोन वर्षांच्या मंत्रिपदाच्या कालखंडात दत्तात्रय भरणे यांनी न भूतो न भविष्यति इतका कोट्यवधींचा निधी इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी खेचून आणला आहे. हे देखील वाचा - तालुक्यासाठी निधी कसा आणायचा याची हातोटी दत्तात्रय भरणे यांच्याकडे दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांमुळे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातून महाराष्ट्रात सर्वाधिक निधी इंदापूर तालुक्यासाठी मंजूर झाला आहे. निंबूत (ता. बारामती) येथील सभेत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दत्तात्रय भरणे यांना उद्देशून म्हटले 'तुम्ही राज्याचे मंत्री आहात, केवळ इंदापूर तालुक्याच...

विकास कामांसाठी निधी कसा आणायचा याची हातोटी भरणे यांच्याकडे; रविवारी होणार काटी, रेडा, रेडणी भागात २० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

इमेज
दुपारी १ वा. गिरवी, तर  सायंकाळी ७ वा. काटी येथे होणार जाहीर सभा. मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२६ मार्च) :- विकास निधी कसा आणायचा याची हातोटी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे असल्याचे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी १८ मार्च रोजी गोखळी येथील जाहीर सभेत म्हटले होते. याची अनुभवात्मक प्रचिती आता इंदापूरकरांना येऊ लागली आहे. भरणे यांच्या विकास कामांच्या भूमीपूजनाचा आणि उद्घाटनाचा सपाटा लगातार सुरूच असून, येत्या रविवारी देखील काटी, रेडा, रेडणी, गिरवी, वरकुटे अशा विविध भागात २० कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. १९ मार्च रोजी गोखळी येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी, निधीच्या संबंधित राज्यमंत्र्यांची प्रशंसा करताना, निधी कसा आणायचा, कुठून आणायचा, यासाठी कोणाला भेटायचे याची हातोटी दत्तात्रय भरणे यांना बखुबी असल्याचे म्हटले होते. याचाच अनुभव इंदापूरकरांना येत आहे. मंत्रिपदाच्या अवघ्या दोन वर्षांच्या कार्यकाळात दत्तात्रय भरणे यांन...

सत्ताधाऱ्यांच्या काळात सोसायटीमध्ये घडलेली गंभीर स्वरूपाची आर्थिक अपहाराची प्रकरणे दुर्दैवी - नानासाहेब नरुटे

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२५ मार्च) :- इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या काळात सोसायटीमध्ये घडलेली गंभीर स्वरूपाची आर्थिक अपहाराची प्रकरणे दुर्दैवी आणि संस्कारी समाज घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांच्या प्रतिमा मलिन करणाऱ्या असल्याचे मत शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब नरूटे यांनी नुकतेच व्यक्त केले. काल (२४ मार्च) स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलच्या वतीने पतसंस्थेच्या सर्व २१ जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी उपस्थित स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे सर्व नेते व पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना वरील मत व्यक्त केले. यावेळी बोलताना नरुटे यांनी म्हटले, सभासदांनी विश्वासाने १५ वर्ष  सत्ताधारी संचालक मंडळाला सत्ता दिली. मात्र या विश्वासाला तडा देत संचालक मंडळाने मागील सात वर्षांमध्ये पूर्णपणे मनमानी कारभार केला. त्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे राज्यात सर्वात निचांकी लाभांश शिक्षकांना देण्यात आला. व्यापारी गाळे आणि कार्यालयासंदर्भात प्रचंड आर्थिक अनियमितता दिसून येत आहे. उ...

अभिनेत्री पल्लवी सोनोने आणि कल्याणी सोनोने यांचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मान

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२१ मार्च) :- अभिनयाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेल्या पल्लवी आणि कल्याणी सोनोने  (भिगवण, ता. इंदापूर) या दोघी अभिनेत्री बहिणींचा नुकताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. १९ मार्च रोजी तावशी (ता. इंदापूर) येथे विविध विकास कामांच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेनंतर या दोघींचा सन्मान करण्यात आला. पल्लवी सोनोने यांना महिला दिनानिमित्त भारत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या वतीने 'वूमन सिनेमा अँड आर्ट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना राज्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी पल्लवी सोनोने यांच्या सख्या बहीण व लागीर झालं जी फेम कल्याणी सोनोने-चौधरी यांचा देखील राज्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी, सर्व सामान्य कुटुंबातील पल्लवी सोनाने व कल्याणी सोनोने या सख्या बहिणींनी कला क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावत इंदापूर तालुक्याचे नाव देशात झळकवण्याचे काम केले असल्याचे म्हटले...

डोंगराई चौकात विचित्र अपघात; अचानक ब्रेक दाबल्याने आयशर टेम्पो आणि ट्रकच्या मध्ये सापडल्याने चारचाकीचा चुराडा; एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२० मार्च) :- इंदापूर शहराच्या बायपास वरील डोंगराई चौकात शनिवारी रात्री ९ वा. ३० मिनिटांच्या आसपास भीषण अपघात झाला असून, या विचित्र व भीषण अपघातात संजीव दत्तात्रय कुलकर्णी हे जागीच ठार, तर त्यांच्या पत्नी सुखदा संजीव कुलकर्णी (५३ वर्ष) या गंभीर जखमी झाल्या आहेत. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुण्याच्या मोशी येथील रहिवाशी असलेले संजीव दत्तात्रय कुलकर्णी, सुखदा संजीव कुलकर्णी आणि त्यांची मुलगी असे तिघे जण आपल्या (MH 14 HW 6140) किया कंपनीच्या सेल्टॉस या खाजगी वाहनातून सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेले असताना डोंगराई चौकातील गती रोधक असलेल्या ठिकाणी हा अपघात झाला. वेगात असलेल्या आपल्या वाहनाचा कुलकर्णी यांनी अचानक दाबलेला ब्रेक आणि चुकीच्या पद्धतीने हायवेच्या डाव्या लेनवर उभा असलेला आयशर टेम्पो ही दोन अपघाताची कारणे असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी म्हटले आहे. हा अपघात इतका भयानक होता की अपघातानंतर कुलकर्णी यांच्या वाहनाने पेट घेतला होता. सुदैवाने या अपघातात संजीव ...

राज्यमंत्र्यांच्या विकास कामांची गाडी सुसाट; तरंगवाडी गोखळी येथील ८ कोटी ७५ लाखांच्या विविध विकास कामांचे उद्या होणार उद्घाटन व भूमिपूजन

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१८ मार्च)  :- दत्तात्रय भरणे यांच्या विकास कामांची गाडी अजूनही सुसाट असून, या गाडीला ब्रेक लागणार नसल्याचे सध्या दिसत आहे. शुक्रवारी (१८ मार्च) तरंगवाडी गोखळी भागातील जवळपास ८ कोटी ७५ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम भरणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. सायंकाळी ५ वा. होणाऱ्या या कार्यक्रमानंतर ६ वाजता गोखळीमध्ये होणाऱ्या सभेमध्ये राज्यमंत्री भरणे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. शहा (ता. इंदापूर) येथे ६ मार्च रोजी झालेल्या जाहीर सभेत बोलताना भरणे यांनी विरोधकांच्या पेनातील शाई संपेल परंतु विकास कामांची यादी संपणार नाही असे वक्तव्य केले होते. उद्या होणाऱ्या व एकूणच होत असलेल्या व झालेल्या विकास कामांच्या जोरावर भरणेंच्या वरील वक्तव्याला वजन प्राप्त झाले आहे. नुकतेच राज्यमंत्री भरणे यांनी ६० कोटींच्या जवळपास विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन वडापुरी पंचायत समिती गणासह इंदापूर तालुक्यातील चाकाटी, कुंभारगाव अशा विविध ठिकाणी केले होते. तर मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून जवळपास १०० किलोमिटर अंतराचे पाणंद रस्...

इंदापूर तालुक्यात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून होणार १०० किलोमिटर अंतराचे पाणंद रस्ते - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

इमेज
इंदापूर तालुक्यातील रस्त्यांचा होत आहे कायापालट मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (९ मार्च) :- अनेक वर्ष मंत्रीपद भोगणारा मात्र विकासापासून वंचित राहिलेल्या इंदापूर तालुक्यात आता विकासाची गंगा वाहू लागली असून, मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ते योजनेतून जवळपास १०० किलोमिटर अंतराचे पाणंद रस्ते मंजूर झाले असल्याची माहिती इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. या योजनेतून इंदापूर तालुक्यातील विविध गावांमधील जवळपास ७२ ठिकाणच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल तालुक्याच्या ठिकाणी व मुख्य बाजारपेठांमध्ये पोहोचवणे सहज शक्य होणार आहे. पुणे सोलापूर महामार्गावर स्थित इंदापूर तालुक्यात आर्थिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि राजकीय श्रीमंती लाभली असतानाही विकासाच्या बाबतीत मात्र इंदापूर तालुका गरीब राहिला हे दुर्दैव. विशेष म्हणजे अनेक वर्ष मंत्रीपद भोगलेल्या इंदापूर तालुक्यात नागरिकांची मुख्य गरज व दळणवळणासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांची दुरावस्था सर्वश्रुत आहे. स्वातंत्र्यापासून आजतागायत न झालेले अनेक ...

शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या वीज तोडणी विरोधात डोंगराई चौकात आज हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा रास्ता रोको

इमेज
आप्पासाहेब जगदाळे, पृथ्वीराज जाचक, अविनाश घोलप हे देखील होणार आंदोलनात सामील मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (८ मार्च) :- ऐन उन्हाळ्यात पिके तहानलेली असताना थकीत वीज बिलांच्या वसुलीचे नाटक महावितरणने पुन्हा सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असून, वीजे अभावी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने शेती पंपांचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा, या रास्त मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील डोंगराई चौकात आज सकाळी १०.३० वा. रास्ता रोको करून महावितरण आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप हे देखील सामिल होणार आहेत. निवडणुकीपूर्व शेतकऱ्यांना मोफत वीज द्या म्हणणारे सध्या सत्तेवर असूनही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा चुकीच्या पद्धतीने  खंडित केला जात आहे. त्याम...

स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे कार्य कौतुकास्पद - मधुकर (मामा) भरणे

इमेज
सात वर्षे आमदार आणि दोन वर्षे मंत्री असूनही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा फोटो शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात नाही - अमोल (शेठ) भिसे समीर सय्यद (उप संपादक) इंदापूर (६ मार्च) - स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे कार्य कौतुकास्पद असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वाभिमानी शिक्षक परिवारातील पदाधिकारी घेत असलेली मेहनत उल्लेखनीय असल्याचे मत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक मधुकर भरणे यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्या वतीने शैक्षणिक आणि शिक्षक संघटना क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षक बांधवांचा व शिक्षक भारती संघटनेच्या नुतन तालुका कार्यकारणी आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी इंदापूर येथील आय.एम.ई.आय. हॉलमध्ये शनिवारी (५ मार्च) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मधुकर भरणे व माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल (शेठ) भिसे यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. स्वाभिमानी शिक्षक परिवारामध्ये वेगवेगळ्या शिक्षक संघटना अंतर्भूत असून, स्वाभिमानी परिवाराचा हिस्सा असलेल्या शिक्षकांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित...

राज्यमंत्र्यांचा विकास कामांचा धडाका सुरूच; शहामध्ये उद्या होणार १२ कोटी १५ लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (५ मार्च) - विकास कामांच्या श्रेयवादाला फाटा देत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकास कामांचा धडाका सुरूच असून,  शहा- महादेवनगर (ता. इंदापूर) येथील तब्बल १२ कोटी १५ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ रविवारी (६ मार्च) इंदापूर तालुक्याचे आमदार व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडणार आहे. हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी ६ वाजता पार पडणार असून, या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र तांबिले, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, माजी सभापती बांधकाम विभाग पंचायत समिती प्रवीण माने, पंचायत समिती सदस्य अभिजीत तांबिले, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे तसेच वडापुरी गणातील कार्यकर्ते पदाधिकारी, इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी दत्तात्रय भरणे यांची जाहीर सभा देख...