सत्ताधाऱ्यांच्या काळात सोसायटीमध्ये घडलेली गंभीर स्वरूपाची आर्थिक अपहाराची प्रकरणे दुर्दैवी - नानासाहेब नरुटे

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२५ मार्च) :- इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या काळात सोसायटीमध्ये घडलेली गंभीर स्वरूपाची आर्थिक अपहाराची प्रकरणे दुर्दैवी आणि संस्कारी समाज घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांच्या प्रतिमा मलिन करणाऱ्या असल्याचे मत शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब नरूटे यांनी नुकतेच व्यक्त केले. काल (२४ मार्च) स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलच्या वतीने पतसंस्थेच्या सर्व २१ जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी उपस्थित स्वाभिमानी शिक्षक परिवाराचे सर्व नेते व पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना वरील मत व्यक्त केले.

यावेळी बोलताना नरुटे यांनी म्हटले, सभासदांनी विश्वासाने १५ वर्ष  सत्ताधारी संचालक मंडळाला सत्ता दिली. मात्र या विश्वासाला तडा देत संचालक मंडळाने मागील सात वर्षांमध्ये पूर्णपणे मनमानी कारभार केला. त्यामुळे सभासदांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे राज्यात सर्वात निचांकी लाभांश शिक्षकांना देण्यात आला. व्यापारी गाळे आणि कार्यालयासंदर्भात प्रचंड आर्थिक अनियमितता दिसून येत आहे. उत्पन्नात वाढ होईल असे सत्ताधाऱ्यांनी सांगितले होते, मात्र असे ना होता आर्थिक अपहाराची अनेक गंभीर प्रकरणे सोसायटीमध्ये घडून आली हे कोणत्या कारभाराचे द्योतक आहे.


सर्व पदाधिकाऱ्यांनी संयमाने प्रचार करत सत्ताधारी संचालक मंडळाचा चुकीचा कारभार सभासदांसमोर मांडायचा आहे. आपले सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील यात दुमत नाही. यावेळी इंदापूर तालुका सह.पतसंस्थेवर परिवर्तन घडणार असून, स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलचीच सत्ता येणार असल्याचे नानासाहेब नरूटे यांनी म्हटले आहे. एकूण २१ जागांसाठी होणारी ही निवडणूक २४ एप्रिल रोजी पार पडणार असून, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज (२५ मार्च) शेवटची मुदत आहे. तर अर्जांची छाननी प्रक्रिया २८ मार्च रोजी पार पडणार आहे.

स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलच्या वतीने खालील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

अनु.जाती /जमाती राखीव मतदार संघ

१) सुहास मोरे

२) नितीन मिसाळ

 इतर मागासवर्गीय राखीव मतदार संघ

 १) संतोष गदादे

भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव मतदार संघ

१) बाळासाहेब महानवर

२) सचिन देवडे

३) घोळवे सर्जेराव

महिला राखीव मतदार संघ

सौ. संगीता सुरेश पांढरे

इंदापूर सर्वसाधारण मतदार संघ

१) देवडे सचिन

२) महानवर बाळासाहेब

३) घुले प्रशांत

४) ठोंबरे दत्तात्रय

भिगवण-लोणी देवकर सर्वसाधारण

१) खारतोडे उत्तम

२) शिंदे अनिल

३) कलवले बालाजी

४) बांडे भारत

५) भोई विठ्ठल

६) दराडे सतीश

७) दगडे संजय

सणसर-निमसाखर सर्वसाधारण मतदार संघ

१) धायगुडे अदिनाथ

२) संतोष गदादे

३) रणदिवे सदाशिव

४) घोळवे अनिल

५) दराडे हरिश्चंद्र

बावडा-रेडणी  सर्वसाधारण मतदारसंघ

१) शिंदे रामचंद्र

२) तरंगे संतोष कुमार

३) गरगडे उध्दव

४) चव्हाण दत्तात्रय

लासुर्णे निमगाव सर्वसाधारण मतदार संघ

१) वणवे भाऊसो

२) गावडे सतीश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट