अभिनेत्री पल्लवी सोनोने आणि कल्याणी सोनोने यांचा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मान
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२१ मार्च) :- अभिनयाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेल्या पल्लवी आणि कल्याणी सोनोने (भिगवण, ता. इंदापूर) या दोघी अभिनेत्री बहिणींचा नुकताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. १९ मार्च रोजी तावशी (ता. इंदापूर) येथे विविध विकास कामांच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेनंतर या दोघींचा सन्मान करण्यात आला. पल्लवी सोनोने यांना महिला दिनानिमित्त भारत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या वतीने 'वूमन सिनेमा अँड आर्ट्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना राज्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी पल्लवी सोनोने यांच्या सख्या बहीण व लागीर झालं जी फेम कल्याणी सोनोने-चौधरी यांचा देखील राज्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी, सर्व सामान्य कुटुंबातील पल्लवी सोनाने व कल्याणी सोनोने या सख्या बहिणींनी कला क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी बजावत इंदापूर तालुक्याचे नाव देशात झळकवण्याचे काम केले असल्याचे म्हटले.
हे देखील वाचा - डोंगराई चौकात विचित्र अपघातात पुण्याच्या कुलकर्णी दाम्पत्याचा मृत्यू
यावेळी भिगवणचे सचिन बोगावात, आण्णा धवडे, अजिंक्य माडगे, प्रमोद बंडगर, मनोज राक्षे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा