भिमानगर पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार; तर ६ जण गंभीर जखमी
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क भीमानगर (ता. माढा) पुलाजवळ काल (२७ नोव्हेंबर) रात्री ११ वाजता मळीचा टैंकर आणि तांदळाच्या ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन या अपघातात पाचजण जागीच ठार झाले तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूरच्या दिशेने निघालेला मळीचा टैंकर (एम. एच. १४ सी. पी. ४०२०) भीमानगर येथे सरदारजी ढाब्यासमोर आला असता पुण्याच्या दिशेने निघालेला तांदळाचा ट्रक (एम. एच. २५ यू ४०४५) दुभाजकाला धडकून टैंकरवर जोरदार आदळला. या अपघातात मळीच्या टैंकरचा चालक जागीच ठार झाला, तर ट्रक पलटी होऊन चालकाच्या केबीनमधे बसलेले चारजण देखील जागीच ठार झाले. या अपघातात ट्रकमधील लहान मुले आणि महिलांसह तीनजण गंभीर जखमी झाले असून, सरडेवाडी टोलनाक्याचे, ओंकार पणारी, रुग्णवाहिकेचे चालक पप्पू जगताप, राहुल कदम, परमेश्वर कदम, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सरक, आणि सलमान पठाण व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील मृतांचा अक्षरशः चेंदा झाल्याचे आणि एकाचे डोके धडावेगळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातातील मृतांची आणि जखमींची नांवे...