महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय उन्नतीसाठी बहुजन परिषद कटिबद्ध - बिभीषण लोखंडे
| निवडीचे पत्र देताना बिभीषण लोखंडे आणि इतर |
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१९ नोव्हेंबर) :- महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उन्नतीसाठी बहुजन परिषद कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन बहुजन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांनी केले. काल (१८ नोव्हेंबर) निमगाव केतकी येथील संत सावता माळी मंदिरात बहुजन परिषदेच्या महिला तालुका आघाडीच्या अध्यक्षपदी सुरेखा राहुल मिसाळ तर अंगणवाडी कर्मचारी सेविकेच्या संघटनेच्या अध्यक्षपदी पुनमताई निंबाळकर यांची निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य मोहन दुधाळ हे होते.
या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य शालनताई भोंग, पंचायत समिती सदस्य देवा जाधव, माजी सभापती अंकुशराव जाधव, बहुजन परिषद सदस्य सचिव विजय राव गायकवाड, तालुका प्रहारचे अध्यक्ष संजय राऊत, सूर्य क्रांतीचे उपाध्यक्ष घनश्याम निंबाळकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय हेगडे गुरुजींनी, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तुळसा जाधव (मॅडम) यांनी केले.
या कार्यक्रमात बोलताना बिभीषण लोखंडे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील समस्त महिलांचे आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, तसेच अंगणवाडी सेविकांसाठी इंदापूर पंचायत समिती येथे विश्रांती कक्ष उभा करणे व या ठिकाणी जमलेल्या सर्वच महिलांनी सहकार्याची भावना ठेवल्यास त्यांच्यासाठी पतसंस्थेची निर्मिती करून देण्याची जबाबदारी बहुजन परिषदेची राहील. अंगणवाडी सेविकांचे जे प्रश्न प्रलंबित असतील ते सन्मानपूर्वक सोडवण्यासाठी पंचायत समिती स्तरावर अधिकाऱ्यांसमवेत बैठक करण्याचे अश्वासन कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन दुधाळ यांनी दिले. या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद सदस्य देवाभाऊ जाधव, पंचायत समिती सदस्य व माजी सभापती अंकुशराव जाधव, माजी उपसभापती शालनताई भोंग यांनीही महिलावर्गाच्या प्रश्नासाठी वाटेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा