हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभा राहतेय शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन; आंदोलन ठरू शकते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सरकार विरोधातील रागाच्या उद्रेकाची ठिणगी

हर्षवर्धन पाटील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसह

आंदोलनाचा आज दुसरा दिवस; आंदोलनाच्य ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२८ नोव्हेंबर) :- थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी विजमहामंडळ इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे वीज कनेक्शन सोडवत असून, विजमहामंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात आता इंदापूर तालुक्यातील शेतकरी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर येथील महावितरणच्या कार्यालयाबाहेर एकवटू लागला असून, तोडगा निघाल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका हर्षवर्धन पाटील यांनी घेतली आहे. तालुक्यात याआधीही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून रास्ता रोको, मोर्चे, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या प्रचंड असंतोष असून राज्यमंत्र्यांच्या घराबाहेरही आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यामुळे हे आंदोलन विविध समस्यांमध्ये घेरलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सरकारविरोधातील आक्रोशाच्या उद्रेकाची ठिणगी ठरू शकतो.

काल महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा फिस्कटल्यानंतर विजमहामंडळाच्या कार्यालयाबाहेर हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या धरणे आंदोलनात इंदापूर, भिगवण, बावडा, वालचंदनगर, भवानीनगर, कांदलगाव, डाळज, पळसदेव, वडापुरी, अवसरी एकूणच ग्रामीण भागासह तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी एकवटू लागल्याने साहजिकच या आंदोलनाला आता ऐतिहासिक स्वरूप येऊ लागले आहे. काल सकाळी १० वाजल्यापासून हे आंदोलन सुरू असून, रात्री कडाक्याच्या थंडीतही हजारो शेतकरी हर्षवर्धन पाटील यांच्यासह कार्यालयाबाहेर दटून होते.

आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून, तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांची संख्या आज अधिक पटीने वाढून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे. किंतु परंतु आत्ताच आलेल्या माहितीनुसार राज्यमंत्री ददत्तात्रय भरणे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरू असून, बैठकीत तोडगा निघाल्यास हे हर्षवर्धन पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनाचेच यश म्हणावे लागेल. किंबहुना तालुक्यातील शेतकरी ऐतिहासिक संकटात असताना राज्यमंत्र्यांना लागणारी शांत झोप हर्षवर्धन पाटील यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून उडवली हे नक्की.

मागील ६० वर्षात तालुक्यातील ही सर्वात गंभीर परिस्थिती - हर्षवर्धन पाटील

इंदापूर तालुक्यातील शेतकरी सध्या हुकूमशाही अनुभवत आहेत. मागील १० दिवसांपासून तालुका अंधारात आहे. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असून, शेतकऱ्यांना थोडी मोहलत द्या, चुकीची बिले दुरुस्त करून द्या, एवढीच मागणी आमची आहे. सरकारला सत्तेची मस्ती आली असून, सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. मागील ६०-७० वर्षात अशी परिस्थिती तालुक्यात कधीच निर्माण झाली नाही. विजमहामंडळ सरकारच्या दडपणाखाली काम करत असून, लोकशाहीमध्ये हे जास्त दिवस टिकणार नाही हे नक्की.

विरोधक वायरल करत आहेत कर्मयोगीवर रडलेल्या शेतकऱ्याचा व्हिडीओ

हर्षवर्धन पाटील शेतकऱ्यांसाठी महावितरण कार्यालयाबाहेर दटून उभे असताना आता विरोधकांकडून २ ऑक्टोबर रोजी हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यावर उसाच्या बिलासाठी रडलेल्या शेतकरी युवकाचा हा व्हिडीओ वायरल केला जात आहे, ज्यामध्ये अवघ्या ५ हजारांसाठी माझा बाप मेला पण बिल मिळालं नाही, असे सांगत जेऊर येथील नितीन शिरसकर नावाचा शेतकरी ढसाढसा रडला होता.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट