पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदापूर शहरातून होणाऱ्या अवजड वाहतूक आणि ऊस वाहतुकीला लगाम घाला - राष्ट्रवादीची मागणी

इमेज
प्रशासनाने अपघातास कारणीभूत गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास राष्ट्रवादी आंदोलन करणार मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१६ डिसेंबर) :- इं दापूर शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांचा आणि धोकादायक ऊस वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, गुरुवारी (१४ डिसेंबर) खुळे चौकात एका अवजड वाहनाने दुचाकीवर चाललेल्या दोघा शाळकरी विद्यार्थ्यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभाग आक्रमक झाला असून, इंदापूरचे तहसीलदार, नगरपरिषद आणि पोलिसांना निवेदन देत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी करण्यासह, शहरातून जाणाऱ्या बेलगाम उसाच्या ट्रॅक्टर्सना वेगाची मर्यादा घालणे, तसेच बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इंदापूर शहरातून जाणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गावर शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये, खाजगी व शासकीय दवाखाने, बस स्थानक इ. कारणांमुळे नागरिकांची, विशेषतः विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असते. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातून होणारी अवजड वाहतूक, नियमबाह्य ...

इंदापूर शहरातील महिला उरुळी कांचन येथून बेपत्ता

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१६ डिसेंबर) - इंदापूर शहरातील मेहमुना बादशाह बेपारी (रा. कासारपट्टा, इंदापूर) ही अंदाजे ८० वर्ष वय असलेली महिला सोमवारपासून (११ डिसेंबर) उरुळी कांचन येथून बेपत्ता आहे. हनीफ बेपारी यांच्या त्या आई आहेत. रविवारी (१० डिसेंबर) त्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी लोणी काळभोर या ठिकाणी गेल्या होत्या. दरम्यान सोमवारी दुपारी ३.३० मिनिटांच्या सुमारास त्या इंदापूरकडे येण्यासाठी उरुळी कांचन येथील पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या वाहन थांब्यावर आल्या होत्या. सायंकाळी ६ वा. ४५ मिनिटांच्या आसपास देखील त्या त्याच ठिकाणी होत्या. मात्र तदनंतरपासून त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नसल्याचे, तथा त्यांनीही अद्याप कुटुंबीयांशी अथवा नातेवाईकांशी कोणताही संपर्क केला नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. हे देखील वाचा - बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा इंदापूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक ठिकाणची बस स्थानके आणि रुग्णालयांमध्येही त्यांचा शोध घेतला. या संदर्भात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात त्या हरवल्या असल्याची तक्...

सखोल चौकशी आणि शहानिशा करूनच गुन्हे दाखल करा; इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचा इंदापूर पोलिसांना सल्ला

इमेज
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; अभियंत्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१५ डिसेंबर) :- इंदापूर नगरपरिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता रविराज राऊत यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सखोल चौकशी करून मगच गुन्हे दाखल करावेत असा सल्ला/समज इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी इंदापूर पोलिसांना दिली आहे. आज (१५ डिसेंबर) या संदर्भात नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पोलिसांना लेखी निवेदन दिले असून, कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत घटनेचा निषेध नोंदवला. तसेच संबंधित अभियंत्याला आपला पाठिंबाही दर्शवला आहे. रविराज राऊत यांच्यासह अन्य पाच जणांच्या विरोधात लखन अंकुश काळे (रा. शाहूनगर, इंदापूर) या युवकाच्या फिर्यादीवरून बुधवारी (१३ डिसेंबर) ॲट्रॉसिटीसह शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याच्या धमकी देण्याशी संबंधित कलमान्वये इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.  रविराज राऊत हे चार महिन्यांपूर्वी शाहूनगर भागात नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामाची पाहणी करण्याकरिता गेले होते. परंतु तब्बल चार महिन्यांच्या अवधीनंतर पोलिसांनी या प्र...

इंदापूरात प्रशासनाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारणारं इथे कुणीच नाही...म्हणूनच

इमेज
संपादकीय इंदापूर प्रशासनाच्या बे-जबाबदार अधिकाऱ्यांनो...! बे'चा अर्थ इथे अधिक कर्तव्यदक्ष असा घ्या तुम्ही. सायनाच्या मृत्यूला कारणीभूत परिस्थितीला एका वर्षानंतरही जैसे थे ठेवण्यासाठी तुमचा निषेध करावा, का संपूर्ण देशभरात हीच परिस्थिती आहे म्हणून स्वतःची समजूत काढावी हेच कळेना. १० डिसेंबर २०२२ रोजी आय कॉलेजसमोर उसाच्या भरधाव ट्रॅक्टरने सायना लिके हिला चिरडले होते. वर्ष उलटले या दुर्दैवी घटनेला. असे कितीही चिरडले गेले तरी इंदापूरात तुमचं कुणीच काही वाकडं करू शकत नाही याचा अंदाज आल्यानेच संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करताय तुम्ही? ना कायदा, ना लोकं, ना लोक प्रतिनिधी, ना कोणता पक्ष, ना कोणती संघटना. तुम्हाला जाब विचारणारं, तुमच्या कर्तव्यात दक्षतेची मागणी करणारं इथे कुणीच नाही म्हणून फावतंय. केवळ करिअर म्हणून नव्हे तर देशसेवा करण्याच्या प्रामाणिक हेतूने प्रशासकीय सेवेत येणाऱ्यांचा काळ आता संपलाय हे तुम्हाला बघून पटू लागलंय. लाखोंची शास्ती आणि बेहिशेबी लगान घेत असल्याचे आरोप करत नागरिक नगरपरिषदेविरोधात मागील अनेक महिन्यांपासून  लोकशाही मार्गाने  लढा देत आहेत. मात्र नगरपरिषद प्रशासनाल...

अरबाज आसिफ शेख यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क  इंदापूर (१ डिसेंबर) :-  इंदापूर शहरातील अरबाज आसिफ शेख यांची नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली. रविवारी (२६ नोव्हेंबर) मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे संसदरत्न, तथा बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अरबाज शेख यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष पद भूषविले असून, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. कामाची दखल, तथा पक्ष विचारांशी एकनिष्ठ राहिल्याच्या परिणामी त्यांना पक्षाकडून थेट राज्यस्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. या फुटीनंतर राष्ट्रवादीचे इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटात सामिल झाले होते. परिण...