इंदापूर शहरातील महिला उरुळी कांचन येथून बेपत्ता
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१६ डिसेंबर) - इंदापूर शहरातील मेहमुना बादशाह बेपारी (रा. कासारपट्टा, इंदापूर) ही अंदाजे ८० वर्ष वय असलेली महिला सोमवारपासून (११ डिसेंबर) उरुळी कांचन येथून बेपत्ता आहे. हनीफ बेपारी यांच्या त्या आई आहेत. रविवारी (१० डिसेंबर) त्या आपल्या मुलीला भेटण्यासाठी लोणी काळभोर या ठिकाणी गेल्या होत्या. दरम्यान सोमवारी दुपारी ३.३० मिनिटांच्या सुमारास त्या इंदापूरकडे येण्यासाठी उरुळी कांचन येथील पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या वाहन थांब्यावर आल्या होत्या. सायंकाळी ६ वा. ४५ मिनिटांच्या आसपास देखील त्या त्याच ठिकाणी होत्या. मात्र तदनंतरपासून त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नसल्याचे, तथा त्यांनीही अद्याप कुटुंबीयांशी अथवा नातेवाईकांशी कोणताही संपर्क केला नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक ठिकाणची बस स्थानके आणि रुग्णालयांमध्येही त्यांचा शोध घेतला. या संदर्भात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात त्या हरवल्या असल्याची तक्रार देखील देण्यात आली आहे. या महिलेच्या अंगावर लाल रंगात जास्वंदीच्या फुलांचे चित्र असलेली अबोली रंगाची साडी असून, कोणी त्यांना पाहिले असेल, अथवा या संदर्भात कोणालाही कुठल्याही प्रकारची माहिती असेल किंवा मिळेल त्यांनी ९५६१२५१०२०, ९७६३५७९४९२ या नंबरवर संपर्क करण्याची विनंती त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा