मनोहर भोसले उर्फ मन्या मामाला अखेर १३२ दिवसानंतर जामीन मंजूर
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क सोलापूर (३० जानेवारी) :- आर्थिक फसवणूक आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेला व स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या उंदरगाव (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील मनोहर भोसले (Manohar Bhosale) या भोंदू बाबाला अखेर १३२ दिवसांनंतर जामीन मंजूर झाला आहे. बार्शीच्या सत्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला असल्याची माहिती त्याचे वकील ॲड. रोहित गायकवाड यांनी दिली आहे. (Barshi court grants bail to Manohar Bhosale in rape case) मनोहर भोसले उर्फ मन्या मामा सप्टेंबर २०२१ पासून अटकेत होता. यापूर्वी बार्शी सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. पोलीसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर बार्शी सत्र न्यायालयाने मनोहर भोसले याचा जामीन अखेर न्यायालयाने मंजूर केला आहे. या प्रकरणात सोमवारी (२३ जानेवारी) युक्तिवाद झाला होता. ॲड. गायकवाड यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायाधीश जयंद्र जगदाळे यांनी जमीन मंजूर केला आहे. फिर्याद देणाऱ्या महिलेच्या जिल्ह्यात प्रवेश न करणे, पुराव्याच्या कामात हस्तक्षेप न करणे, न्यायालयाला कळवल्याशिवाय पत...