कांदलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने साऊ-जिजाऊंना मानवंदना
कांदलगावामध्ये बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षम होत असून, साऊ-जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असल्याची बाब गौरवास्पद आहे - जि. प. सदस्या ॠतुजा पाटील
महिलांनी साऊ-जिजाऊंसारखे निर्भीड राहावे. - माधुरी लडकत, अंमलदार, निर्भया पथक
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
कांदलगाव (१३ जानेवारी) :- कांदलगाव ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे "साऊ-जिजाऊ" यांची संयुक्त जयंती काल (१२ जानेवारी) साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात जिजाऊंची वेशभूषा करून अंजुम पठाण, श्रेया भांगे, वैष्णवी शिंदे, सुहानी राखुंडे, साक्षी राखुंडे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कार्यक्रमानिमित्ताने गर्भवती महिलांचे सामुदायिक ओटीभरण करण्यात आले. सोबतच "माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण माजी जि. प. सदस्या ॠतुजा पाटील व माधुरी लडकत यांच्या हस्ते करण्यात आले. "साऊ-जिजाऊ" महिला ग्रामसंघाच्या वर्षपूर्तीनिमित्त केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वर्धापनदिनानिमित्त साऊ-जिजाऊ ग्रामसंघाने महिलांना मास्क स्वच्छतेचे वाण म्हणून, तर ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटरी नॅपकिन व साबण स्वच्छतेचे वाण म्हणून वाटण्यात आले.
यावेळी सरपंच रविंद्र पाटील, उपसरपंच तेजमाला बाबर, रेखा बाबर, कमल राखुंडे, कोंडाबाई जाधव, आशाबाई तुपसौंदर, पोलीस पाटील शैलजा पाटील, ग्रामसेविका स्वाती चव्हाण, गावसमन्वयक निलोफर पठाण, महिला पोलीस खंडागळे, ग्रामसंघ अध्यक्षा लक्ष्मी कसबे, सचिव स्वाती ननवरे, कोषाध्यक्ष फातिमा शेख व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी केले तर आभार निलोफर पठाण यांनी मानले.
विविध स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे
किल्लेबांधणी स्पर्धा
प्रथम - प्रज्वल पांडुरंग काशिद
द्वितीय - ज्ञानेश्वरी अमोल सरडे
तृतीय - साक्षी समाधान राखुंडे
उत्तेजनार्थ - सिद्धी नवनाथ काशीद
रांगोळी स्पर्धा
खुला गट
प्रथम - मयुरी सोमनाथ सुतार
द्वितीय - सोनाली विठ्ठल साखरे
तृतीय - सायली प्रणव पाटील
उत्तेजनार्थ - नेहा बापू सर्जे, ज्ञानेश्वरी अमोल सरडे
मोठा गट
प्रथम - नेहा बापू सर्जे
द्वितीय - प्रतिक्षा पांडुरंग काशीद
तृतीय - रविना रामदास कोळी
उत्तेजनार्थ - क्षितिजा नितीन यादव
लहान गट
प्रथम - भूमिका बापू ननवरे
द्वितीय - तृप्ती तात्या तोबरे
तृतीय - अमृता सौदागर ननवरे
उत्तेजनार्थ - रामेश्वरी अमोल सरडे
निबंंध स्पर्धा
लहान गट
प्रथम - प्रेरणा निलंकठ भोसले
द्वितीय - साक्षी विजय सोनवणे
तृतीय - शंभूराजे विठ्ठल साखरे
मोठा गट
प्रथम - शुभांगी बाबासो मगर
द्वितीय -बनंदिनी भिमराव ढेपे
तृतीय - भाग्यश्री धनंजय कळमकर
उत्तेजनार्थ - साक्षी भारत तोबरे
चित्रकला स्पर्धा
मोठा गट
प्रथम - नेहा बापू सर्जे
द्वितीय - दिक्षा भारत तोबरे
तृतीय - भाग्यश्री सचिन सरडे
उत्तेजनार्थ - साक्षी विजय सोनवणे
लहान गट
प्रथम - अंजुम रज्जाक पठाण
द्वितीय - सुहानी सुर्यकांत राखुंडे
तृतीय - कशीश अजीज नायकुडे
उत्तेजनार्थ - शुभांकर शिवाजी मोरे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा