चाँदतारा ग्रुपच्या वतीने लसीकरण शिबिर संपन्न; १५३ नागरिकांनी घेतला लसीकरणाचा लाभ

लसीकरणादरम्यान उपस्थित सर्व

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२७ जानेवारी) :- वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात असताना, इंदापूर शहरातील युवा वर्गही आता शासनाच्या मदतीला पुढे येताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्याकामी लसीकरण ही अतिमहत्वाची बाब ओळखून इंदापूर शहराच्या कसबा परिसरातील युवकांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत काल (२६ जानेवारी) इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या चाँदतारा ग्रुपच्या युवकांनी आयोजित केलेल्या या लसीकरण शिबिरात कोविशिल्ड लस नागरिकांना देण्यात आली. जवळपास १५३ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ या शिबिराच्या माध्यमातून घेतला. यामध्ये नागरिकांना पहिला डोस, दुसरा डोस आणि बूस्टर डोस देण्यात आला असल्याची माहिती चाँदतारा ग्रुपचे अध्यक्ष निहाल पठाण यांनी दिली आहे.

रक्तदान शिबिरांसह अनेक सामाजिक कामे करणाऱ्या चांदतारा ग्रुपच्या युवकांचा उत्साह वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे आणि इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, तसेच इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा आणि अनेक आजी माजी नगरसेवकांनी लसीकरण शिबिराला भेट दिली. याकामी आपल्याला माजी उपनगराध्यक्ष रशिदखान पठाण, माजी नगरसेवक शेरखान पठाण, अफसर पठाण, आझाद पठाण, फकीर पठाण, जाकिर पठाण, फारुख पठाण, तय्यब पठाण, अंतुल पठाण, फिरोज सय्यद यांचे मार्गदर्शन, तर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ  शेळके, आशिष देवकर यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे निहाल पठाण यांनी म्हटले.


हे लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी, अन्वर पठाण, आमिर पठाण, समीर पठाण, जुबेर पठाण, मोहसीन पठाण, वाजीद पठाण, सकलेन पठाण, मुआज पठाण, सलमान पठाण, एजाज पठाण, अक्रम पठाण, विजू भोसले, यश जाधव, नय्यूम सय्यद, मोहसीन शेख, सोहेल सय्यद यांनी विशेष मेहनत घेतली.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट