एआयएमआयएमच्या वतीने इंदापूरमध्ये रक्तदान शिबिर; सर्व जाती धर्माच्या रक्तदात्यांचे मानले आभार
इंदापूर (२७ जानेवारी) - कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी अनेकवेळा शासनाने आवाहन केल्याचे सर्वज्ञात आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत काल (२६ जानेवारी) इंदापूर शहर एआयएमआयएमच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कसबा परिसरातील संभाजी चौकात पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उदघाटन पोलीस अधिकारी (पोलीस निरीक्षक) समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा आणि अनेक पक्षांच्या आजी माजी नगरसेवकांनी हजेरी लावली.
आमचा पक्ष लोकशाही व संविधानावर दृढ विश्वास ठेवणारा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारा पक्ष असून, मोहोळच्या (जि. सोलापूर) शिवशंभो रक्त पेढीच्या सहकार्याने पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात इंदापूर शहरातील सर्वच जाती धर्माच्या युवकांनी रक्तदान केल्याचे सांगत एआयएमआयएमचे युवक अध्यक्ष आजमखान पठाण यांनी सर्व रक्तदात्यांचे, उपस्थिती दाखवून मनोधैर्य वाढवणाऱ्या सर्व पक्षाच्या नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, सर्व आजी माजी नगरसेवक सर्वांचे आभार मानले आहेत.
भिशी प्रकरण सविस्तर वाचण्यासाठी यावर क्लिक करा.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वालेद कोरबू, अरबाज पठाण, अख्तर मुलाणी, अक्रम जहागीरदार, सलीम मुलाणी, हाफिज समीर देशमुख यांनी विशेष मेहनत घेतली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा