पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिक्षक पतसंस्थेच्या नवनियुक्त संचालक मंडळाला विकासात्मक कामांवर भर देण्याचा राज्यमंत्र्यांचा सल्ला

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (३० एप्रिल) :- इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर निवडून गेलेल्या संचालक मंडळाने संस्थेच्या माध्यमातून विकासात्मक कामांवर भर द्यावा. त्यासाठी लागेल ती मदत करण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. काल (२९ एप्रिल) भरणेवाडी (ता. इंदापूर) शिक्षक पतसंस्थेवर निवडून आलेल्या स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भरणे यांनी वरील मत व्यक्त केले. २४ एप्रिल रोजी झालेल्या इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत भरणे समर्थक स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने सत्ताधारी हर्षवर्धन पाटील समर्थक शिक्षक विकास पॅनलला २१-० ने व्हाईट वॉश देत इतिहास घडविला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भरणे यांच्या निवासस्थानी नवनियुक्त संचालक मंडळाच्या सत्काराचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना भरणे यांनी, तालुक्यातील शिक्षकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून कोट्यावधींची उलाढाल असलेली संस्था तुमच्या हाती सोपवली असल्याचे सांगताना, संस्थेच्या माध्यमातून शहराच्या ठिकाणी असलेले व्यापार...

२०१९ मध्ये मामांना मारुतीराय पावले; त्यामुळेच मारुतीरायांना नारळांचे तोरण बांधून मामांनी त्याचे नवस फेडले

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (३० एप्रिल) :- 'मामा जोपर्यंत निवडून येऊन मारुतीराया तुला नारळांचा तोरण बांधत नाहीत तोपर्यंत मी मंदिरात पाय ठेवणार नाही' असा नवस मारुतीरायांना करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील एका सामान्य व्यक्तीचा नवस तब्बल अडीच वर्षांनी फेडण्याचा योग राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना आला. इंदापूर तालुक्यातील निंबोळी येथील राजेंद्र चव्हाण यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्व गावातील मारुती मंदिरात सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे निवडून यावेत यासाठी हा नवस केला होता. या अटीतटीच्या झालेल्या लढतीत दत्तात्रय भरणे हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले होते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त दत्तात्रय भरणे निंबोळी या ठिकाणी आले होते. दरम्यान, दिपक पंढरीनाथ खाडे व रुपेश शिवाजी घंबरे यांनी राजेंद्र सुभेदार चव्हाण यांनी गावातील मारुतीरायांना 'जो पर्यंत मामा निवडून येत नाहीत आणि मारुतीरायांच्या चरणी नारळांचे तोरण बांधत नाहीत तोपर्यंत मंदिरात पाय ठेवणार नाही' असा नवस केल्याची माहिती दत्तात्रय ...

Indapur Crime Report - आंबे विक्री करण्याच्या बहाण्याने आले आणि २८ लाखांचे दागिने चोरून पसार झाले; खडकपुऱ्यावरील साई समर्थ सोन्या चांदीच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला

इमेज
  मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (३० एप्रिल) :- आंबे विक्री करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघा जणांनी  इंदापूर शहराच्या खडकपुरा परिसरात असणाऱ्या साई समर्थ ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान फोडून तब्बल २८ लाखांचे दागिने लंपास केल्याची खळबजनक घटना २८ एप्रिलच्या मध्यरात्री घडली. या घटनेत संशयाची सुई साई समर्थ दुकानाशेजारीच आंबे विक्री करणाऱ्या सलीम शेख नूर मोहम्मद आणि त्याचा साथीदार अमित कासार यांच्याकडे जात असून, इंदापूर पोलिसांचे पथके या दोघाही संशयितांच्या मागावर रवाना झाली आहेत. साई समर्थ ज्वेलर्सचे मालक राहुल महादेव शहाणे (रा. माळवाडी नं १, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून या दोघा संशयितांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल शहाणे यांनी गुरुवारी (२८ एप्रिल) सकाळी १० वा. दुकान उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी काऊन्टरच्या शोकेस आणि डिस्प्लेमध्ये लावलेले सोन्या चांदीचे तब्बल २८ लाखांचे दागिने लंपास केले असून, यामध्ये ३०० ग्राम सोन्याचे आणि ३० किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. चोरट्यांनी दुकानात असलेल्या स्ट्राँग रुमच्या ...

इंदापूर शहरात विविध विकास कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२६ एप्रिल) :- 'वैशिष्ट्यपूर्ण' योजनेअंतर्गत तसेच विशेष रस्ता अनुदान निधीतून इंदापूर शहरातील विविध विकास कामांकरिता ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी (२५ एप्रिल) दिली. इंदापूर शहाराकरिता सन २०२१-२२ करीत लेखाशीर्ष (३०५४ ००२२ ), तसेच  सन २०२१ -२२ लेखाशीर्ष (२२१७ १३०१ ) अंतर्गत हा निधी शहरातील विविध कामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. निधीतून होणारी शहराच्या वेगवेगळ्या भागातील नियोजित कामे इंदापूर शहरातील गणेश कोथमीरे घर ते बागवान गल्ली भिसे घर ड्रेनेज व कॉंक्रिटीकरणासाठी ७० लाख रुपये, शाहू नगर येथे अंतर्गत ड्रेनेज व कॉंक्रिटीकरण ५० लाख, राजेवली नगर  येथे ड्रेनेज करणे ३० लाख, श्रीनाथ हौसिंग सोसायटी व वडरगल्ली अंडरग्राउंड ड्रेनेज व लादीकरण करणे ३० लाख, अशोक क्लॉथ स्टोअर्स ते आगलावे घर पंधारानाला पर्यंत व सिद्धेश्वर बोळ ड्रेनेज व कॉंक्रिटीकरण करणे २५ लाख, रामवेस नाका सुशोभीकरण करणे व श्रीराम मंदिर परिसरात कॉंक्रिटीकरण करणे ३० लाख,...

शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील समर्थक शिक्षक विकास पॅनलचा सुपडा साफ; आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२५ एप्रिल) :- इंदापूर तालुक्यातील विविध शिक्षक संघटनांची मूठ बांधत स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेच्या सत्ताधारी शिक्षक विकास पॅनलची १५ वर्षांची निर्विवाद सत्ता अखेर उलथवून टाकत हर्षवर्धन पाटील समर्थक शिक्षक विकास पॅनलचा सुपडा साफ केला. २१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे समर्थक स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत पाटील गटाला सपशेल व्हाईट वॉश दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तालुक्याचा कल कुठे असणार याचा अंदाज देणाऱ्या या निवडणुकीत सत्ताधारी शिक्षक विकास पॅनलचा झालेला हा एकतर्फी पराभव हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने तालुक्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, इब्टा आणि शिक्षक भारती या चार शिक्षक संघटनांची मूठ बांधत सत्ताधाऱ्यांविरोधात तगडे आव्हान उभे केले होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ११ टक्क्यांनी सी.सी. देत  असताना सत्ताधाऱ्यांनी इंदा...

शिक्षक सोसायटीच्या २१ जागांसाठी आज होणार मतदान; १५ वर्षांची सत्ता उलथवून स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनल परिवर्तन घडवणार?

इमेज
'हम करे सो कायदा' हा अहंभाव सत्ताधाऱ्यांना भोवणार? मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२४ एप्रिल) :- इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुक प्रक्रियेतील मतदानाचा महत्त्वपूर्ण टप्पा आज पार पडणार आहे. या पतसंस्थेवर मागील १५ वर्षांपासून शिक्षक विकास पॅनलची सत्ता आहे. २१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत सत्ताधारी शिक्षक विकास पॅनलला विविध शिक्षक संघटनांची मूठ बांधत स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलने तगडे आव्हान उभे केले आहे. मागील १५ वर्षांच्या कालखंडात शिक्षकांचा विकास नव्हे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान करणाऱ्या सत्ताधारी संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे तालुक्यातील शिक्षकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड रोष असून, स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आम्ही तालुक्यातील शिक्षकांसाठी उत्तम पर्याय उभा केला असल्याचे मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुहास मोरे यांनी मुत्सुद्देगिरीशी बोलताना म्हटले आहे. कोट्यावधींची उलाढाल असलेल्या इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या २१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत १५ वर्षांची भ्रष्ट ...

खा. सुप्रिया सुळे इंदापूरचा उल्लेख संसदेत करणार; नरेंद्र मोदींनाही देणार इंदापूर भेटीचे आमंत्रण

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (२१ एप्रिल) :- गुजरात हे विकासाचं मॉडेल असल्याचे सांगत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि एकूणच भाजपने २०१४ साली केंद्रात सत्ता मिळवली. 'सबका साथ सबका विकास' हा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदींनाच आता आपण विकास काय असतो हे बघण्यासाठी इंदापूर भेटीचे आमंत्रण देणार असल्याचे संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सोबतच एक आदर्श शहर आणि विकासाचं मॉडेल कसं असावं या संदर्भात आपण आवर्जून इंदापूर शहराचा उल्लेख संसदेत करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. इंदापूर शहरातील १० कोटींच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळ्या संदर्भात त्या रविवारी (१७ एप्रिल) इंदापूर येथे आल्या होत्या. जुमला ठरलेल्या 'सबका साथ सबका विकास' या नाऱ्याआधारे २०१४ साली भाजपने केंद्रातील सत्ता काबीज केली. यावेळी विकासाचं मॉडेल म्हणून गुजरातला प्रमोट करण्यात आले. गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री व आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आपण विकासाचं मॉडेल नक्की कसं असतं हे दाखवण्यासठी इंदापूर भेटीचे निमंत्रण देणार असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी म्...

महापुरुषांच्या नावांची विटंबना थांबावी यासाठी शिवधर्म फाऊंडेशनच्या हजारो कार्यकर्त्यांचा इंदापूर ते मंत्रालयापर्यंत लाँग मार्च

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१७ एप्रिल) :- दारू, गुटखा आणि गांजा या सारख्या अवैध व्यवसायाचा केंद्र असलेल्या हॉटेल, बियर बार, लॉज, पान शॉप आणि यासारख्या व्यवसायांना अथवा अशा वस्तूंना महापुरुषांची नावे देऊन पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांच्या नावांचा सर्रास दुरुपयोग होत असून, महापुरुषांची विटंबना तात्काळ थांबावी यासाठी सत्यशोधक महापुरुषांची नावे 'प्रतीकं आणि नावे (THE EMBLEMS AND NAMES PREVENTATION OF IMPROPER ACT 1950 ) कायदा १९५०' या कायद्यात समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनकडून करण्यात येत आहे. या मागणीला मूर्त स्वरूप यावे यासाठी शिवधर्म फाउंडेशनच्या हजारो कार्यकर्त्यांनी घाम फोडणाऱ्या उन्हात मुंबई येथील मंत्रालयापर्यंत लाँग मार्चला गुरुवारी (१४ एप्रिल) इंदापूर येथून सुरुवात केली. संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांसारख्या सत्यशोधक महापुरुषांची नावे वर नमूद कायद्यात समाविष्ट करावी ही मागणी ...

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज होणार इंदापूर शहरातील १० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

इमेज
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे कार्यक्रमाचे अध्यक्ष, तर प्रदीप गारटकर असणार प्रमुख पाहुणे मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१७ एप्रिल) :-  इंदापूर तालुक्यातील विकास कामांची बुलेट ट्रेन सुसाट चालली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज (१७ एप्रिल) इंदापूर शहरातील तब्बल १० कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडणार आहे. हा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अनेकदा संसदरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज (१७ एप्रिल) सायंकाळी ५ वा. होणाऱ्या इंदापूर शहरातील १० कोटींच्या विकास कामांमध्ये इंदापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) नवीन वर्ग खोल्यांचे आणि इंदापूर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष सेतू कार्यालयाच्या उद्घाटनाबरोबरच इंदापूर शहरातील चौक सुशोभीकरण व इंदाप...

गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी इंदापूर पोलीसांना ग्राम सुरक्षा दलाच्या यंत्रणेची गरज

इमेज
पोलिसांची अपुरी संख्या आणि कामाचा व्याप पाहता ग्राम सुरक्षा दल ठरेल प्रभावी मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१६ एप्रिल) :- इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा वाढलेला सुळसुळाट आणि पोलिसांची अपुरी संख्या व कामाचा व्याप पाहता इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक नागरिकांच्या मदतीने ग्राम सुरक्षा दलाची यंत्रणा कार्यरत करणे सद्यस्थितीला गरजेचे झाले आहे. मागील काही काळात चोरट्यांनी घरफोडी आणि सशस्त्र दरोड्यांसह दुचाकी वाहने, शेतातील कृषी पंप, विद्युत केबल, डिझेल, शालेय साहित्य आणि शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांवर हात साफ केला आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण देखील अत्यल्प आहे. या वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीती, असुरक्षिततेची भावना आणि तीव्र नाराजी वाढू लागली आहे. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी इंदापूर पोलिसांना ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीची गरज आहे. इंदापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात इंदापूर शहरासह जवळपास ७३ लहान मोठी गावे आणि अनेक वाड्या वस्त्या आहेत. इंद...

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज होणार २९ कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

इमेज
सायंकाळी ०६.०० वा. डाळज नं. २ येथे होणार जाहीर सभा मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१६ एप्रिल) :- सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज (१६ एप्रिल) डाळज नं. १, डाळज नं. २, डाळज नं. ३ आणि पोंधवडी भागातील तब्बल २९ कोटी ८ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, संचालक, पदाधिकारी व ग्रामस्थ डाळज नं. १,२,३ यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तर डाळज नं. २ येथे सायंकाळी ६ वाजता दत्तात्रय भरणे यांची जाहीर सभा देखील होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमात, डाळज नं. १ येथील १ कोटी २५ लाखांच्या कामांचे भूमिपूजन, डाळज नं. २ येथील १३ कोटी ६६ लाखांचे काम,  डाळज नं. ३ येथील ८३ लाखांच्या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन, पोंदवडी-भादलवाडी-डाळज रस्ता १४ कोटी, तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब घोलप, जिल्...

वालचंदनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर करणार - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१५ एप्रिल) :- वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी रुपये तातडीने मंजूर करणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल (१४ एप्रिल) दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर या ठिकाणी डॉ . बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आयोजित जयंती कार्यक्रमाप्रसंगी दत्तात्रय भरणे यांनी ग्वाही दिली. वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधील विविध विकासकामांकरीता ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर झाल्याचेही भरणे यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दत्तात्रय भरणे यांनी, माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याच्या राजकीय, सामाजिक जीवनात नेहमीच वालचंदनगरवासीय व येथील आंबेडकरप्रेमी जनता सदैव पाठीशी राहिल्याने माझ्यासारख्याला विविध पदे भुषवता आली व सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे म्हटले. कोट्यावधी लोकांचे प्रेरणास्थान असलेले विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य जागा उपलब्ध असणारे वालचंदनगर येथील ड...

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत इंदापूर शहरातील ८९७ जणांना घरकुल मंजूर - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इमेज
इंदापूर (१४ एप्रिल) :- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत इंदापूर शहरातील ८९७ जणांना घरकुल मंजूर झाल्याची माहिती नुकतीच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असून, प्रधानमंत्री आवास योजना BLC ( Beneficiary Led Construction - स्वतःच्या जागेवर बांधकाम) घटकाअंतर्गत   ३०९ लाभार्थी हे यादी क्रमांक २ - (Detailed Project Report - सविस्तर प्रकल्प अहवाल) DPR-2 मध्ये , मंजूर झाले आहेत. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना (AHP - Affordable Housing in Partnership - भागीदारी तत्त्वावर घरे) घटकाअंतर्गत एकूण ५८८ लाभार्थी यांना घरकुल मंजूर झालेले आहेत. यामध्ये इंदापूर शहरात ५ वर्ष किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असणारे भाडेकरू तसेच बांधकाम परवानगी मिळण्यात वादग्रस्त जागा असल्यामुळे अडचण असणारे किंवा लाभार्थ्यांची स्वतःची पसंती असणारे अशा सर्व लाभार्थ्यांचा समावेश आहेत. हे देखील वाचा - उजनी धरणाच्या कॅनॉलमध्ये भिमानगर येथील १५ वर्षीय युवक वाहून गेला यामध्ये ५८८ घरांचा हा भव्य प्रकल्प इंदापूर नगरपरिषद हद्दीत नियोजित असून, यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधकाम होऊन त्यात सर्व उच्च सुख सुविधा उपल...

उजनी धरणाच्या कॅनॉलमध्ये पोहताना भिमानगर येथील मुलगा गेला वाहून

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१४ एप्रिल) :- उजनी धरणाच्या कॅनॉलमध्ये पोहण्यास गेलेला भिमानगर (ता. माढा) येथील रोहन सुरेश पवार हा १५ वर्षीय मुलगा कॅनॉलमध्ये वाहून गेल्याची घटना काल (१३ एप्रिल) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या रोहनला पोहता येत नसल्याने दोरीच्या सहाय्याने पोहत असलेल्या रोहनच्या हातातून दोरी सुटल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी म्हटले आहे. घटना घडली त्यावेळी उजनीतून कॅनॉलमध्ये तीन हजार क्यूसेस एवढा पाण्याचा विसर्ग सुरू होता.  उकाडा वाढल्याने कॅनॉलमध्ये पोहण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही.  रोहन देखील आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी कॅनॉलवर गेला होता. पोहता येत नसल्याने दोरीला धरून पोहणाऱ्या रोहनच्या हातातून दोरी निसटली. त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. नागरिक व मच्छीमारांनी अनेक तास रोहनचा शोध घेतला. मात्र रोहनचा काहीच पत्ता लागला नाही. या घटनेनंतर उजनी प्रशासनाला कॅनॉलमधील पाण्याचा विसर्ग कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्य...

उजनी धरण बघण्यास आलेल्या महिलेचे तीन लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले; तिघांविरोधात गुन्हा दाखल

इमेज
संशयाच्या आधारावर इंदापूरमधून अटक; चौकशीअंती सुटका मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१३ एप्रिल) :- सहपरिवार उजनी धरण पाहण्यासाठी आलेल्या मुंबई येथील एका ५२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील तब्बल ३ लाख २० हजार रुपये किमतीचे आठ तोळ्याचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्यांनी भर गर्दीतून हिसकावून पोबारा केला. सोमवारी (११ एप्रिल) संध्याकाळी इंदापूर तालुक्यातील डाळज नं. ३ गावच्या हद्दीत घडलेल्या या घटनेसंदर्भात प्रेमा विजय सपकाळ (रा. सुभहर्श अपार्टमेंट, ए ४०४, प्लाट नं. ३२, सेक्टर ११, कामोठे, नवी मुंबई) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात मंगळवारी (१२ एप्रिल) तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. या संदर्भात संशयाच्या आधारावर इंदापूरमधून एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले. रविवारी (१० एप्रिल) आपल्या लहान मुलाच्या लग्नाच्या सुपारीच्या कार्यक्रमासाठी प्रेमा सपकाळ सहकुटुंब सांगली या ठिकाणी गेल्या होत्या. सोमवारी (११ एप्रिल) परतीच्या प्रवासात सर्वजण उजनी धरण पाहण्यासाठी भिमानगर येथे आले होते. धरण भेटीनंतर रात्री ८ वा. सपकाळ कुटुंब पुणे सोलापूर हायवेवरील डाळज...

होय क्रांतीबा ! मी तुझ्यामुळे पुरोगामी - स्वाती चव्हाण

इमेज
          होय! मी पुरोगामी!! बा क्रांतीबा,                          होय, मी तुझ्यामुळे पुरोगामी! तु साऊला दिलेल्या           अक्षरज्ञानामुळे मी पुरोगामी! तुझ्या सत्यनिष्ठेवरच्या           असीम विश्वासामुळे मी पुरोगामी! भांडवलजाद्यांवर ओढलेल्या           तुझ्या आसूडामुळे मी पुरोगामी! तु गुलामगिरीविरोधात चेतवलेल्या           आगीमुळे मी पुरोगामी!!! होय,बा क्रांतीबा,तुझ्या विचारांमुळे           मी आज पुरोगामी!!! तू लिहलेल्या पहिल्या वहिल्या           शिवबाच्या पोवाड्यामुळे मी पुरोगामी!!! तु काढलेल्या पहिल्या शाळेतल्या           पहिल्या अक्षरामुळे मी पुरोगामी!! मुक्ताच्या दबलेल्या कंठाला           तु दिलेल्या स्वरामुळे मी आज पुरोगामी!! होय, बा क्रांतीबा, तुझ्यामुळे           मी आज...

हे काय चाललंय...

इमेज
संपादकीय राज्य शासनात विलणीकरणाच्या मुद्द्यावरून एस. टी. कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओकवर केलेल्या अनपेक्षित हल्ल्यानंतर शनिवारी (९ एप्रिल) या घटनेच्या निषेधार्थ गुन्हेगारांवर कठोर कारवाईच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्याप्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी , 'जवळच असलेल्या भाजप नेत्यांच्या बंगल्यावर आम्हीही हल्ला करू शकतो', 'आम्ही हल्ले करायला सुरुवात केल्यास भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरणे देखील अवघड होईल' या चिथावणीखोर वक्तव्यानंतर भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड. शरद जमादार यांनी, 'अंगावर आला तर शिंगावर घेऊ' असे प्रत्युत्तर दिले आहे. एकमेकांना चिथावणी, आव्हाने देणारी वक्तव्ये इंदापूर तालुक्यातील राजकीय संस्कृतीची पातळी  दिवसेंदिवस खालावत चालल्याचे दर्शवत आहे. मागील पाच महिन्यांपासून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या एस. टी. कर्मचाऱ्यांनी कोर्टाच्या निकालानंतर आक्रमक होत शुक्रवारी (८ एप्रिल) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी दगडफेक व चप...

दुर्दैवी - इंदापूर अर्बनमध्ये खाते उघडण्यासाठी आलेल्या दोघा मित्रांना माने पेट्रोल पंपासमोर रेंज रोव्हरने चिरडले; एकाचा मृत्यू, तर एक मित्र गंभीर जखमी

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (८ एप्रिल) :- इंदापूर अर्बनमध्ये खाते उघडण्यासाठी येत असलेल्या दोघा मित्रांचा पुणे सोलापूर हायवेवरील गलांडवाडी नं. १ पाटीजवळ असलेल्या माने पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात येणाऱ्या रेंज रोव्हर इवॉक या चारचाकीने चिरडले असून, या अपघातात एका मित्राचा मृत्यू, तर एक मित्र गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (७ एप्रिल) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सोमनाथ चंद्रकांत पवार (रा. गुलमोहरवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, रोहित चंद्रकांत दळवी (सध्या रा. पोमल वाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर, मुळ रा. केडगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. सध्या अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सविस्तर वृत्त असे की, सोमनाथ पवार आणि रोहित दळवी हे दोघे मित्र (दोघांचे वय अंदाजे २८ वर्ष) इंदापूर अर्बन बँकेत खाते उघडण्यासाठी आपल्या एच एफ डिलक्स दुचाकीवर (MH-11-CE-4450) इंदापूर येथे निघाले होते. गुरुवारी (७ एप्रिल) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गलांडवाडी नं १ हद्दीतील माने पेट्रोल पं...

दरोड्यातील आरोपी इंदापूर पोलिसांकडून काही तासांतच जेरबंद

इमेज
  पोलीस खात्याची मान उंचवणाऱ्या या लाजवाब कामगिरीचे सर्वत्र कौतुक समीर सय्यद (उप संपादक) इंदापूर (६ एप्रिल) :- इंदापूर तालुक्यातील लोणीदेवकर गावाच्या हद्दीत डोंगरे सरपंचवस्ती येथे सोमवारी (४ एप्रिल) रात्री पडलेल्या सशस्त्र दरोड्यानंतर अवघ्या काही तासांत दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्याची दमदार कामगिरी इंदापूर पोलिसांनी केली. आनंद सहदेव डोंगरे यांच्या घरावर चार अज्ञात दरोडेखोरांनी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या या सशस्त्र दरोड्यात चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह तब्बल दीड लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लुबाडला होता. या दरोड्याची माहिती मिळताच इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत अवघ्या काही तासांतच दोघा दरोडेखोरांना बेड्या ठोकत चोरलेल्या ऐवजासह ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर अन्य दोघा आरोपींच्या बाबत 'पुलिस के हाथ जल्द ही उनकी गर्दन तक होंगे' असा विश्वास पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांनी व्यक्त केला आहे. दरोडेखोरांनी डोंगरे यांच्या घरातील सदस्यांना मारहाण करत चाकूच्या धाकाने रोख रक्कम, सोन्याचे दागिने...

इंदापूर तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्तीकरिता २ कोटी २० लाख, तर शहरातील विविध कामांसाठी १० कोटी ४५ लाख निधी मंजूर - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

इमेज
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क इंदापूर (१ एप्रिल) : - इंदापूर तालुक्यातील मुस्लिम वस्तीकरिता २ कोटी २० लाख, तर इंदापूर शहरातील दलित वस्ती तसेच दलितेतर व नगरोत्थान या निधीअंतर्गत इंदापूर शहरातील विविध विकास कामांसाठी सुमारे १० कोटी ४५ लाख इतका निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच दिली. राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये अल्पसंख्यांक वस्तीमध्ये रस्ते करणे, ईदगाह मैदानाकरिता संरक्षक भिंत बांधणे, जियारत सभामंडप, शादीखाना बांधणी, कब्रस्तान सुशोभीकरण करणे आदींचा समावेश आहे. तर दलितेतर व नगरोत्थान निधी व इतर निधी अंतर्गत इंदापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साठेनगर, लोकमान्य नगर येथील प्रलंबित ड्रेनेज, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, समाज मंदिर बांधण्यासारखी विविध कामे केली जाणार आहेत. मुस्लिमांच्या प्रलंबित कामांमध्ये भिगवण येथील भिगवण स्टेशन येथे कब्रस्तान अंतर्गत रस्ता १५ लाख, भिगवण मस्जिद सुशोभीकरण करणे ५ लाख, कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे १० लाख, वडापूरी येथे कब्रस्...