खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज होणार इंदापूर शहरातील १० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे कार्यक्रमाचे अध्यक्ष, तर प्रदीप गारटकर असणार प्रमुख पाहुणे
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१७ एप्रिल) :- इंदापूर तालुक्यातील विकास कामांची बुलेट ट्रेन सुसाट चालली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज (१७ एप्रिल) इंदापूर शहरातील तब्बल १० कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडणार आहे. हा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अनेकदा संसदरत्न पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज (१७ एप्रिल) सायंकाळी ५ वा. होणाऱ्या इंदापूर शहरातील १० कोटींच्या विकास कामांमध्ये इंदापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) नवीन वर्ग खोल्यांचे आणि इंदापूर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष सेतू कार्यालयाच्या उद्घाटनाबरोबरच इंदापूर शहरातील चौक सुशोभीकरण व इंदापूर शहर अंतर्गत पथदिवे बसविणे, तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडणार आहेत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून न भूतो न भविष्यती इतका निधीचा ओघ इंदापूर तालुक्यात सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, इंदापूरच्या महिला शहराध्यक्षा उमा इंगोले, इंदापूर शहराचे युवकाध्यक्ष इम्रान शेख हे या कार्यक्रमाचे विनीत असून, या संपूर्ण कार्यक्रमासाठी, इंदापूर तालुका व शहरातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, आजी माजी नगराध्यक्ष, उप नगराध्यक्ष, नगरसेवक, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कसा असेल संपूर्ण कार्यक्रम?
तहसिल कचेरी - ५.०० वा.
आय टी आय - ५.१५ वा.
श्रीराम चौक - ५.३० वा.
राजेवली चौक - ५.४५ वा.
खुळे चौक - ६.०० वा.
मालोजीराजे चौक - ६.१५ वा.
संविधान चौक - ६.३० वा.
बाबा चौक - ६.४५ वा.
भवानी मंदिर अंबिकानगर - ७.००.वा.
टेंभुर्णी नाका - ७.१५ वा.
महात्मा फुले चौक - ७.३० वा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा