इंदापूर तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्तीकरिता २ कोटी २० लाख, तर शहरातील विविध कामांसाठी १० कोटी ४५ लाख निधी मंजूर - सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (१ एप्रिल) :- इंदापूर तालुक्यातील मुस्लिम वस्तीकरिता २ कोटी २० लाख, तर इंदापूर शहरातील दलित वस्ती तसेच दलितेतर व नगरोत्थान या निधीअंतर्गत इंदापूर शहरातील विविध विकास कामांसाठी सुमारे १० कोटी ४५ लाख इतका निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतीच दिली. राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये अल्पसंख्यांक वस्तीमध्ये रस्ते करणे, ईदगाह मैदानाकरिता संरक्षक भिंत बांधणे, जियारत सभामंडप, शादीखाना बांधणी, कब्रस्तान सुशोभीकरण करणे आदींचा समावेश आहे. तर दलितेतर व नगरोत्थान निधी व इतर निधी अंतर्गत इंदापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साठेनगर, लोकमान्य नगर येथील प्रलंबित ड्रेनेज, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, समाज मंदिर बांधण्यासारखी विविध कामे केली जाणार आहेत.
मुस्लिमांच्या प्रलंबित कामांमध्ये भिगवण येथील भिगवण स्टेशन येथे कब्रस्तान अंतर्गत रस्ता १५ लाख, भिगवण मस्जिद सुशोभीकरण करणे ५ लाख, कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे १० लाख, वडापूरी येथे कब्रस्तान दुरुस्ती करणे ३० लाख, पिंपरी बुद्रुक येथील जियारत सभा मंडप बांधणे ५ लाख, पिंपरी बुद्रुक येथे ईदगाह भिंत बांधणे ५ लाख, पिंपरी बुद्रुक येथे ओझरे रस्ता ते कब्रस्तान रोड कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, पळसदेव येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे १५ लाख, शेळगाव येथील कब्रस्तान अंतर्गत रस्ता १० लाख, निमगाव येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे 10 लक्ष, निमगाव येथे दफनभूमी कडे जाणारा रस्ता २० लाख, सणसर येथे कब्रस्तान संरक्षण भिंत १५ लाख, बेलवाडी येथे कब्रस्तान अंतर्गत रस्ता १० लाख, लासुर्णे येथे शादीखाना २० लाख, कुरवली येथे कब्रस्तान ईदगाह मैदान १० लाख, सराफवाडी येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे १५ लाख, वरकुटे येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे १५ लाख आदी कामे मंजूर निधीतून केली जाणार आहेत.
दलितेतर व नगरोत्थान निधीअंतर्गत इंदापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साठेनगर, लोकमान्य नगर येथील अंडरग्राउंड ड्रेनेजकरिता ६८ लाख ९० हजार, प्रभाग क्रमांक ७ अंतर्गत बावडा वेस येथील संत सावतामाळी मंदिरासमोर समाज मंदिर बांधण्याकरिता १ कोटी १४ लाख, तसेच इंदापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत इंदापूर शहरातील एकूण ४१ कामांना ६ कोटी ६२ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा