राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज होणार २९ कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन

सायंकाळी ०६.०० वा. डाळज नं. २ येथे होणार जाहीर सभा

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (१६ एप्रिल) :- सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज (१६ एप्रिल) डाळज नं. १, डाळज नं. २, डाळज नं. ३ आणि पोंधवडी भागातील तब्बल २९ कोटी ८ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, संचालक, पदाधिकारी व ग्रामस्थ डाळज नं. १,२,३ यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तर डाळज नं. २ येथे सायंकाळी ६ वाजता दत्तात्रय भरणे यांची जाहीर सभा देखील होणार आहे.

या संपूर्ण कार्यक्रमात, डाळज नं. १ येथील १ कोटी २५ लाखांच्या कामांचे भूमिपूजन, डाळज नं. २ येथील १३ कोटी ६६ लाखांचे काम,  डाळज नं. ३ येथील ८३ लाखांच्या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन, पोंदवडी-भादलवाडी-डाळज रस्ता १४ कोटी, तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब घोलप, जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप आबा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, पंचायत समिती सदस्य शीतल वणवे, राष्ट्रवादीचे नेते डी. एन. जगताप, राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार पानसरे, राष्ट्रवादीचे इंदापूर युवक तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, डाळज नं. २ चे सरपंच ॲड. प्रदिप जगताप, उपसरपंच धनश्री डोईफोडे,  डाळज नं. १ चे सरपंच विकास कुंभार, उपसरपंच प्रमिला झोळ, डाळज नं. ३ चे सरपंच प्रियंका गलांडे, उपसरपंच विश्वजित गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

असे असेल कार्यक्रमाचे एकूण स्वरूप

सायंकाळी ५ वा. भादलवाडी

सायंकाळी ०५.३० वा. डाळन नं. ३

जाहिर सभा - सायंकाळी ०६.०० वा. डाळज नं. २


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट