चौघा हॉटेल व्यावसायिकांविरोधात इंदापूर पोलीसांची कार्यवाही; रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याचा फटका
रविवार (२८ फेब्रुवारी) : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ हॉटेल सुरू ठेवणाऱ्या चार हॉटेल व्यावसायिकांविरोधात इंदापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, यामध्ये लोणी देवकर (ता.इंदापूर) येथील तीन तर काळेवाडी (ता. इंदापूर) येथील एका हॉटेल व्यावसायिकाचा समावेश आहे. या हॉटेल व्यावसायिकांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भा.दं.वि.क. १८८ सह म.पो.का.क. ३३ (डब्लू) /१३१ सह भा. साथ रोग का.क. ३ व ४ सह आपत्ती व्यवस्थापन का.क. ३०, ३३, ३४ आणि ४१ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जगभरात कोरोनाची नवी २४० पेक्षा जास्त वेगवेगळी अवतारे समोर आल्यानंतर लोकांना आता अधिक सावधानता बाळगण्याची गरज असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत रात्री उशिरापर्यंत विना परवाना निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ हॉटेल चालू ठेऊन खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील चार हॉटेल व्यावसायिकांविरोधात इंदापूर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. प्रतिक हनुमंत काळे (रा. काळेवाडी, ता. इंदापूर, हाॅटेल त्रिमूर्ती काळेवाडी), नवनाथ गोरख जाधव (रा. ...