चौघा हॉटेल व्यावसायिकांविरोधात इंदापूर पोलीसांची कार्यवाही; रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याचा फटका
जगभरात कोरोनाची नवी २४० पेक्षा जास्त वेगवेगळी अवतारे समोर आल्यानंतर लोकांना आता अधिक सावधानता बाळगण्याची गरज असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत रात्री उशिरापर्यंत विना परवाना निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ हॉटेल चालू ठेऊन खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील चार हॉटेल व्यावसायिकांविरोधात इंदापूर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. प्रतिक हनुमंत काळे (रा. काळेवाडी, ता. इंदापूर, हाॅटेल त्रिमूर्ती काळेवाडी), नवनाथ गोरख जाधव (रा. लोणी देवकर, ता. इंदापूर, हाॅटेल माऊली, लोणी देवकर), सोहम आण्णासाहेब दुरगुडे (रा. लोणी देवकर, राॅयल टि सेंटर, लोणी देवकर) आणि अक्षय बाळासाहेब थोरात (रा. एमआयडीसी, बारामती हाॅटेल, रोकडे फुड हब, लोणी देवकर) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या हॉटेल व्यावसायिकांची नांवे आहेत.
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता यापूढे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल झाल्यास अशा हॉटेल व्यवसायिकांविरोधात कठोर कार्यवाही करून त्यांचा हॉटेल परवाना रद्द करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन यांना अहवाल पाठवण्यात येईल. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी शासनाने निर्धारित केलेल्या वेळेतच हाॅटेल चालू व बंद करावे - धन्यकुमार गोडसे, पोलीस निरीक्षक, इंदापूर पोलीस ठाणे.






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा