पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदापूर शहरात वीजेचा लपंडाव; व्यापारी, नागरिक, विद्यार्थी त्रस्त

इमेज
ऑक्टोबर हीट, त्यात इंदापूर महावितरणचा नियोजनशून्य कारभारामुळे लाईटचा खोळंबा होत असल्याने इंदापूर शहरातील नागरिकांच्या रागाचा पारा चांगलाच चढू लागला आहे. न चुकता वीज बिलासाठी नागरिकांच्या मागे त्राधा लावणाऱ्या, वीजबिल थकल्यास कनेक्शन कट करण्यासाठी लगबग करणाऱ्या वीज महावितरणच्या कारभाराविरोधात इंदापूर शहरातून विशेषतः व्यापारी वर्गातून नाराजीचा सुर वाढू लागला आहे. ऑनलाईन सेवा, झेरॉक्स सेंटरसह शहरातील अनेक लहान मोठे व्यवसाय विजेवर अवलंबून आहेत. मात्र लाईटच्या अनियमित पुरवठ्यामुळे संबंधित व्यवसायांशी निगडित व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी व्यापारी हवालदिल झाले आहेत. किमान व्यापारी संघटनेने यावर लाईट बोर्डाला जाब विचारणे गरजेचे आहे. अन्यथा महावितरणची मस्ती कमी होणार नाही. इंदापूर शहरातील अनेक शासकीय कार्यालये, तसेच खाजगी व शासकीय रुग्णालय, नागरिक, विद्यार्थी असे अनेकजण विजेच्या लपंडावाने प्रभावित झाले आहेत. विशेषतः कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्या इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती, शस्त्रक्रियेसारख्या आपात्कालीन परिस्थितीतही लाईटच्या समस्येमुळे जनरेटर चालू करण्यासाठ...